||श्री नथू रामय नमः||
माझ्या मित्राने आठवड्या भरापुर्वी
राष्ट्रीय कीर्तनकार श्री .चारुदत्त आफळे यांनी कीर्तन केलेली
श्री.नथूरामजीं वरची एक सीडी ऐकायला दिली आणि मी दोन दिवस झोपलो नाही. त्या माझ्या मित्राचे आभार कसे मानावे हेच कळत नाही त्यासाठी हा केलेला छोटासा प्रयोग
आफळेजीचं त्यांनी जसा सांगितलं तस हे कीर्तन
"नथुरामायण" हे जर वाचल नाही तर ,,,,,,,,,?मी काय सांगणार ,,?
बस्स ईतकच सांगेन नथूरामजींच
अखंड भारतच स्वप्न साकार कारण हे आपल आद्य कर्तव्य ठराव.
हीच माफक अपेक्षा स्वर्गाची दार आपल्यासाठी उघडली जातील.
गोष्ट झाली होती अशी,,,,,,,,,,, देश फाडून मागितला इथवर ठीक पण,
१४ ऑगस्ट म्हणजे १५ऑगस्ट च्या अलीकडचा दिवस हा त्यांनी
त्यांचा क्रांती दिवस मानला....
दिल्लीमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळाली ती,
न्यायमूर्ती कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलीय....
न्यायमूर्ती लिहतात पाकिस्तानहून दिल्लीला ज्या आगगाड्या यायला लागल्या....त्यात मालाची पोति रचावीत अशी माणसा रचून भारतात यायला लागली..
त्यातली पुष्कळशी आत मेलेलीच होती....
गळा चिरलेली ,,,,,,,,,
आगगाडीच्या छप्रावरती बसून कित्येक माणस आली. त्या आगगाडीच्या डब्ब्यात फक्त श्वास घेण्यापुरती जागा असायची.....
बैलगाड्या ट्रक हिंदूंच्या माणसांनी भरून येत होत्या..
त्या आगगाडीवर लिहून पाठवल होत "आझादी का तोफा"....
हि प्रेत उचलणं अशक्य होत..
दिल्ली पोलिसांनी खोर्या फाव्ड्यांनी ती प्रेत आगगाडीतून बाहेर काढावीत
ट्रक मध्ये भरावीत आणि कुठल्यातरी लांब असलेल्या पटांगणात जाऊन ,
ती प्रेते रचावीत वरून पेट्रोल चे फवारे लाऊन ती प्रेते पेटवावीत इतकी बिकट अवस्था झाली होती..
प्रचंड दुर्गंधी..
सियालकोटपासून बातम्या अशा येत होत्या कि तिथल्या लोकांना ते धाक दाखून ते बाहेर काढतात... नुसते बाहेर काढत नाहीत जी माणस जीव मुठीत घेऊन निघालीत त्यांची घर त्यांनी लुबड्लीत...
त्यांचे दागिने ताब्यात घेतले..
त्यांची शेती मुसलमानांनी त्यांचा ताब्यात घेतली...
मुस्लीम लीग कपड्यापलीकडे हिंदुना काहीही घेऊन जाऊ देत नवते.
आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीवर्ती हल्ला करून जमतील
तेवढ्या बाईका ते पळवत.
छोट्या मुलीसुद्धा पळवल्या जात बलात्कार झाल्याशिवाय एकाही हिन्दू
स्त्रीची तिथून सुटका होत नव्हती, बलात्कार झाल्याशिवाय ,,,,,,,?
न्यायमूर्ती कपुरांनी त्यांचा पुस्तकात लिहलय...
ज्या बाईका शिल्लक राहून आल्या त्या डॉक्टरी तपासणी करायला घाबरत होत्या.त्यांना विचारला तुम्ही का घाबरता?
"त्या म्हणाल्या आम्ही की सांगणार आम्हाला काय झाला ते...." आमच्यावर किती बलात्कार झालेत हे आम्हालाही माहित नाहीये.
कपूर लिहतात त्यांचा सगळ्या अंगावरती गोंदून पाठवलं होत
"आझादी का तोफा".ते सांगतात ज्या भागातून आम्ही जाणार नाही असे म्हणतो
कि तिथे हिंदूंच्या बायकांना पकडून त्यांची धिंड काढली जाते.
हिंदू बायकांचा तिथे बाजार सारखा लिलाव केला जातो..
१९४७ च्या नंतर दिल्लीमध्ये ४००००० निर्वासित आले...
आणि ह्या ४००००० हिंदुना ज्या पद्धतीने पाठवलं होत
अन्याय करून आमची माणसे परत पाठवतोय म्हंटल्यावर तरीही त्या पाकिस्तानला
५५ कोटी रुपये दिले पाहिजेत असा महात्माजींचा,,? आग्रह होतां..
कारण एक तृतीयांश भारत जर तुटला असेल तर,,,, भारताच्या खजिन्याताला एक तृतीयांश भागावर त्यांचा अधिकार आहे...
हि नैतिकता त्यात येणार होती....
आणि मग जर खाजिन्यावर हक्क ते सांगत असतील तर ,,,,,,
सगळ्या विधीमंडळाने पूर्ण निषेध केला. पाकिस्तानला पैसा देणार नाही.
आणि हे ऐकल्यावर,,,
बिर्ला भवनातल्या पटांगणावर महात्माजी उपोषणाला बसले..
त्यांना पैसे द्या नाही तर मी मरीन....
एका बाजूला गांधी तोंडाने सांगतात मला हिंसा आवडत नाही आणि दुसर्या बाजूला जे हिंसा करतात त्यांना पैसे देण्यासाठी त्यांचा उपोषण आहे...
एका बाजूला म्हणतात अहिंसा आवडते
तर जे हिन्दू अहिंसेने वागले त्यांचा आयुष्य उडून लावायचे प्रयत्न चाललेत..
या ४००००० निर्वासितांची दिल्ली मध्ये कोणतीही व्यवस्था केली नव्हती .ह्यापेक्षा फार वाईट परिस्थिती अशी झाली कि
दिल्ली मध्ये मोकळ्या असलेल्या मशिदींचा आश्रय हिंदू कुटुंबांनी घेतला...
तेव्हा गांधीनी बिर्ला भावातील भाषणातून सांगायला सुरवात केली
"दिल्ली पोलिसांना माझी आज्ञा राहील माशिदिन सारख्या गोष्टींचा ताबा हिंदूंच्या निर्वासितांनी घेता कामा नये.
निर्वासितांना बाहेर काढून मशिदी मोकळ्या करा".
कारण मित्रानो त्यांच्या लेखी
जीव फक्त मुसलमानांना होता हिंदूंना जीव नव्हता ,,,,,,.
जानेवारीच्या थंडी मध्ये हिंदूंची बाईका पोर ६ ७ महिन्यांची कच्ची बच्ची
हाताला धरून पोलिसांनी बाहेर काढली रस्त्यात गटाराच्या कडेला राहा
तुम्ही छप्राखाली नाही राहायच कारण तुम्ही हिंदू आहात..
४००००० माणस भारतच्या बाहेरून आली होती भारतामध्ये.ह माझा आहे भारत हे कळण्यासाठी...
हि सगळी माणसं गांधीना भेटायला बिर्ला भावनावर गेली
कि गांधींचं माईक लाऊन भाषण चाललेलं असायचा "
हे आले कशाला इथे तिथेच अहिंसात्मक प्रतिकार करून मेले का नाहीत???
हे शब्द आहेत त्या अहिंसेच्या पुजर्याचे ,,,,,,,,
तुम्ही तुमची घर दार विकून इथे निघून आलात वेड्या सारखे
हाच अपराध केलात अजूनही तिकडे जा.....
कुठल्या आशेवरती आणि वर ५५ कोटींची दक्षिणा द्यायची पाकिस्तानला?????
बर वल्लभ भाईंनी हे सुद्धा सांगितल होत गांधीजी खजिन्यतला भाग द्यायला हरकत नसते.
पण भावाला जर इस्टेटितला हिस्सा हवा असेल तर ,,,
कर्जाचा हि हिस्सा घ्यावा लागतो.
गांधीजी म्हणाले बरोबर , वल्लभ भाई म्हणाले मग गांधीजी,,,?
दुसर्या महायुद्धाच्या वेळेला आपल्या देशानी ११० कोटी कर्जरुपी उभे केले होते.
त्यातल एक तृतीयांश कर्ज पाकिस्तानला द्यायला सांगा...
जर तुम्ही ब्यारीस्टर आहात कायदेतज्ञ आहात.
तुम्हाला कायदा कळतो...
गांधीजी म्हणाले मी ऐकणार नाही...
सिंधू नदी फाडून सगळ प्रकरण संपल्यावर मात्र मग,,,,,,,,,नथुरामजी म्हणाले मीच ठरवल ह्याला आता जगू द्यायचा नाही.
कारण आतंकवादी दुसर्याचा शरीराची भीती दाखवतात गुन्हेगार सोडा नाहीतर यांना मारीन...
हा दुसर्या प्रकारचा आतंकवाद होता गुन्हेगारांना पैसे द्या नाही तर मी मरीन.
नथुरामजिनी त्याच वेळी ठरवल ह्याला आता जगू द्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत..
अनेकांची कल्पना अशी आहे की सावरकरांच्या आशीर्वादाने हे झालं
पण तो नथुरामजीनचा अपमान होईल...
कोणाचाही आदेश नाही नथुराम स्वतः सांगतात मी दिल्लीला असताना जे पाहत होतो
जे अनुभवत होतो त्याच वेळी ठरवल होत.
लक्षात ठेवा वाईट पण फक्त नथुरामजींच्या डोक्यावर आल पण
त्या काळात पटेल नेहरूच नवे तर सगळ्यांचा घोषणा देऊन मोर्चे चाललेले
"गांधी को मरने दो हमे हमारा राज्य देदो".
सगळ्यांची इच्छा त्यावेळेला तीच होती. आणि नथुरामजी तेव्हाही सांगत होते;
"ते भीष्माचार्य आहेत ते द्रोणाचार्य आहेत त्यांचं काम मोठ आहे ते पवित्र आहेत पण,,
दुर्दैवाने ते कौरवांना संवरक्षण देतात म्हणून थांबवायला लागतंय."
आणि त्यानी स्वतः पिस्तुल ६ जणांनी मिळवलं
(नथुराम गोडसे, नाना आपटे, गोपाळ गोडसे, करकरे, मदनलाल पाहावा, शंकर किस्तया .)
ह्यातल्या मदनलाल वर काम अस दिल होत २० जानेवारीला
त्यांनी बिर्ला भवनातल्या बागेमध्ये बॉम्बस्फोट करायचा
आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन गोळ्या घातल्या जाव्यात.
२० जानेवारीला बॉम्बस्फोट झाला पण जेवढी हवी तेवढी गडबड झाली नाही तो दिवस तसाच गेला...
आणि मग दिवस ठरला ३० जानेवारी....
आता लोकांनी त्यावेळेला इच्छा प्रकट केली नथुराम ३० जानेवारीच का???
आणि नथुरामनी दिलेल वक्तव्य ऐका कोर्टाने सुद्धा ते मान्य केलय कि नथुराम खर बोलतोय.
नथुराम म्हणाले
" जानेवारीच्या मध्याला हैदराबादच्या निजामाचे मंत्री गांधीना भेटले..
आणि हैद्राबाद संस्थान आम्हीच भारतात विलीन करणार नाही
आम्हाला भारतात राहून स्वायत्त राज्य बनवण्याची मागणी केलीये...
आता पर्यंतच्या इतिहासप्रमाणे हि जर मागणी शासनाने नाकारली तर,,,,,
फेब्रुवारीमध्ये पुन्हा गांधींचं दुसरं उपोषण सुरु होणार आणि ,,,
दुसरं पाकिस्तान आपल्या पोटात जन्माला येणार हैदराबाद...?
आता पर्यंतचा इतिहास पाहता हैद्राबादला ते नाही म्हणतील हे शक्यच नव्हत .....
हे सगळा नथुराम सांगू शकले कारण हैदराबादचा मुक्ती संग्राम नथुरामनी भोगला होता...
३८ साली जेव्हा हैद्राबाद म्हणजे पूर्वीचे भागानागर..
ह्या भागानागारात जेव्हा हिंदूंवरती प्रचंड अत्याचार चालले होते
तेव्हा सावरकरांनी आदेश दिल्यानंतर १२०० स्वयंसेवकांच पथक घेऊन हैद्रबाद मध्ये घुसणारी हिंदूंची पहिली तुकडी नथुराम गोडसेंची होती...
नुसती तुकडी घुसवली असा नव्हे तर तिकडच्या हिंदू राष्ट्र दलाच्या कार्यकर्त्यांनी हैद्राबाद मध्ये प्रचंड मोर्चे काढले..
वंदे मातरम हा शब्द म्हटल्या नंतर वेताच्या फटक्यांची शिक्षा होती हैद्राबाद मध्ये निजामाने केलेली....
वंदे मातरम म्हटल्याबद्दल २७ वेताचे फटके स्वतः नथुरामजिनी खाल्येत
डॉक्टर रिपोर्ट मध्ये २७ ठिकाणी वळ आहेत...
बर तो तुरुंगातला वेत आहे घरातला नाही..
ज्याला धार लावलेली असते जो चामाडीत घुसतो आणि ओढून काढावा लागतो
अशा वेताच्या छड्या खाल्ल्यात...
नेता कसा असावा हे त्यावेळेला कळलं
पण कुठल्याच बाजूने पाठींबा मिळाला नाही तेव्हा आंदोलन मागे घ्याव लागल.
आता पर्यंतचा इतिहासाचा विचार केला असता फेब्रुवारीमध्ये दुसरं पाकिस्तान जन्म घेणार
आता घाई केली पाहिजे म्हणून संपूर्ण तयारीनिशी ३० जानेवारीला
बिर्ला भवनापाशी आलेले आहेत नथुरामजी...
आधी बिर्ला मंदिरात जाऊन देवच दर्शन घेतल...
पिस्तुल हातात घेऊन गर्दी मध्ये थांबून राहिले गांधीजी येईपर्यंत...
दोन मुलींच्या खांद्यावर हात ठेऊन गांधीजी आले...
भाषणं साठी काम सुरु व्हायचं होत.
नाना आपटे आणि करकरे हे तिथेच उभे राहिले रस्त्यावरती कारण लोकांना बाजूला करायचा काम त्यांचाकडे होत.
नाना आपटे उत्तम गुजराती बोलू शकत होते त्यांची तिथे गरज होती कारण गुजराती जमाव बराच होता.....
नथुरामजिनी पिस्तुलसुद्धा असा घेतल होता की फार काम कराव लागणार नाही
एक खटका ओढला कि सलग ३ गोळ्या सुटल्या पाहिजेत....
गांधीजी समोर आले तसे नथुरामजिनी नमस्कार केला खाली वाकून...
आपल्या राष्ट्रसेवेला वंदन पण देशाच्या फाळणी मध्ये झालेल्या लोकांची
अवहेलना करून शत्रूला ५५ कोटी रुपये देण्याच्या मागे आहात
ह्या राष्ट्रद्रोहा बद्दल कोणीही भारतीय नागरिक सहन करू शकणार नाही...
क्षमा करा म्हणून दोन पाउल मागे जाऊन
खटकन खटका ओढला ३ गोळ्या सटसट काळजात घुसल्या...
लोक सांगतात ते "हे राम" म्हणाले पण नथुराम म्हणतात त्यांना काहीच बोलायला वेळच मिळाला नाही.... अशा प्रकारे गांधीचावध झाला....हो वधच ह खुन नव्हे
आणि भारता वरच मोठ अरिष्ट नथुरामजिनी दूर केल.... सकाळी ७.३० उठवल फाशीच्या तख्तावर उभं केल
मरतानाची शेवटची इच्छा होती त्त्यांची,,,,
हातात अखंड भारताचा नकाशा भगवा ध्वज घेऊन मरायचंय त्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या गेल्या...
फाशी शिक्षा होतेय हे माहित असतानाही नथुरामजींच्या डोळ्यात भीतीचा लवलेश नव्हता
पाणी नव्हते..... ८.०० वर काटा आल्याक्षणी
खटका ओढला दोर्या आवळल्या गेल्या धप्पदिशी खड्डयात गेले आणि
नथुरामजीनचा देह फाशीचा हिसका बसल्यानंतरही शेवटची घोषणा करून गेला
"अखंड भारत अमर रहे"......
अगर काश्मीर का भी दान होगा तो निश्चय हे और एक नथुराम होगा.....
हे गांधीवधाच सत्य होत... गांधीजींना त्यांचा चुकांची शिक्षा आपला जीव गमावून करावी लागली...
देशभक्ती हे पाप असे जर तर मी पापी घोर भयंकर मात्र पुण्य ते असेल माझा नम्र तरी अधिकार तयावर ,,,,,,
लक्षात ठेवा आजही नथू रामजिंच्या अस्थि अजूनही
सिन्धु नदीत विसर्जित करायच्या शिल्लक आहेत
हे पाप घेवुन आपण स्वातंत्र्य उपभोगायच,,,,,,,,,?
||नथू रामाय नमः||
dhanyawad, chaan aahe....ashru aale
ReplyDeleteजय महाराष्ट्र!
ReplyDeleteनथुरामायणच्या निमित्ताने य दि फडके यांनी केलेल्या विपर्यस्त लेखनाचा समाचार अरुण सारथी यांनी "नथुरामायण की गांधी संमोहन"या पुस्तकाद्वारे घेतला आहे ....सदरचे पुस्तक आपण नक्कीच वाचावे....भारतवर्षाला ब्रिटिशांच्या जोखडातुन सोडवण्यात एकट्या गांधींचा हात होता अश्या प्रकारचा गोबेल्स प्रचार कित्येक दशके सुरळीत पणे काँग्रेसद्वारे केला जातोय्.....आफळे गुरुजींचे व्याख्यान म्हणजे ज्वलंत राष्ट्रवादाच्या स्पुर्तिदायक विचारांचे सोने लुटण्यासारखे असते.....गांधीचा वध करुन पुढच्या अनेक फाळ्ण्यांना गोडसेंनी पुर्णविराम दिला
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"Fashi ani Nathuram Godse" he pustak aapan jarur vachave,
ReplyDeleteTyat Nathuramji ani tyanche anuyayi jail madhe bolat astat tevha tyana ek prashna vicharla jato ki tumchya "Astya" kontya nadit vahavyat?
Tevha Nathuramji hasun uttar detat "Fakt Sindhu naditach" sagle jan hastat.
karan deshatlya sarv nadyanmadhe Gandhijinchya astya visarjit kelya aslya tari Pakistanane Sindhu nadimadhe tya visarjan karnyas nakar dila hota.
"pan majhya astya tevhach vaha jevha Sindhu nadicha ugam Bhartat asel ani antahi bhartatach asel"
He dekhil tyamagil ek satya aahe.
Akhand Bharat Jai ho.
vande bhartam
ReplyDeletepativratechya galyat dhonda
veshyela manihar ,,,,,,
udhhava ajab tuze sarkar
aaplya deshachi aani aaplihi avstha ashich aahe.
महात्मा गांधी नव्हे, महात्मा नथुराम गोडसे च !!!
ReplyDeleteकुणाला जर ते कीर्तन हवे असेल तर त्यांनी मला खालील Email id ला स्वतः चा Email id मैल करावा.
ReplyDeletesameers.k1@gmail.com
भारत माता कि जय !!!
थोर हिंदुत्व वादी,कट्टर राष्ट्रभक्त ,थोर पत्रकार हुतात्मा पंडित नथुराम गोडसे यांना त्रिवार वंदन
ReplyDeleteथोर हिंदुत्व वादी,कट्टर राष्ट्रभक्त ,थोर पत्रकार हुतात्मा पंडित नथुराम गोडसे यांना त्रिवार वंदन
ReplyDelete