Saturday, February 16, 2019

पाकिस्तान नसता तर तुझं देशप्रेम ?---१

काल एका मित्राने सहजच प्रश्न विचारला की पाकिस्तान नसता तर तुझं देशप्रेम तेव्हडच असत का जितकं आज आहे????
मी देखील सहज त्याला सांगितलं देशभक्ती दाखवण्यासाठी पाकिस्तान असण्याची काय गरज ती अशीही माझ्यात असतीच,,,,
परंतु त्याच्या प्रश्नात खोच होती,,,
की आपण मुसलमान म्हंटल की चवताळून उठतो , उठत असतो,,
पण खरच मनापासून कुणीही उत्तर द्यावं
एक साधा दळणाचा डब्बा कधी आईने बायकोने आणायला सांगितला तर चार जिने चढून जाताना किती दमछाक होते????
आपल्यासाठी ते खूप अवघड काम असत
नाईलाजाने करतो देखील मग झोपताना मस्त पैकी बायको कडून कम्बर दाबून घेतो,,
एखादा स्टूल फ
घेऊन माळ्यावरच एखादं सामान आपण नीट काढू शकत नाही आणि पाकिस्तान मध्ये घुसून राडा करायच्या गोष्टी करत असतो,,
किती सक्षम आहोत आपण???
किमान 5 किलो सामान घेऊन आपण 5 km धावत किंवा चालत जाऊ शकत नाही देशप्रेम हे फक्त
लांडयांना शिव्या देण्यापूरत,,
आणि ते देशप्रेम तसच राहावं याची खबरदारी सरकार योग्य रित्या घेत असत
कारण आपण सारे आज गुगलाधीन गुगलेश्वर झालो आहोत एप वर जगणारे आपण,,
सरकारे सुविधा पुरवत आपल्याला पंगू केलंय हे आपल्या गावी ही नसत
तरीही आम्ही इतके हापालेले की अजून विकास हवाच असतो,,, अरे बाबांनो विकासाचा भसम्या
झालाय रे वेळीच आवरा स्वतःला एप मुळे सतत कुणी तरी दुसर्याने आपल्यासाठी राबवा ही मानसिकता तयार केलीय सरकारने
राशनच्या काय आता पैशांच्या रांगेत उभे राहिलो तरी जीव जातो आपला,, बाबांनो पंगू केलंय सरकारने आधी आहे ते नीट सांभाळा त्याचा नीट सांभाळ करा मग हवं तर पुलावर पूल नन्तर बांधा,,
पण आधी
प्रत्यक्ष किमान स्वतःचा जीववाचण्यासाठी सलग 5 km धावू शकत नाही तिथेच देशाला अर्पण वैगेरे च्या पोस्ट ,, आता लाहोर पार चलो , दुष्मन को खदेड दो वैग्रे वैग्रे,,,, नका रे टाकू
Fb हे संपर्काच साधन आहे साध्य नाही हे कळलं तरी पुरेसे आहे
बाकी राग येणं हे साहजिकच परंतु तो राग पाळा सांभाळा तो व्यक्त करण्या आधी किमान
रोज 10 सूर्यनमस्कार 10 बैठका आज आत्ता पासून मारायला सुरवात करा आधी किमान 1 km नन्तर 10/20 km जे जस धावता येईल तस धावायला सुरवात करा,,
कुठली तरी निशस्त्र युद्धकला शिका, रायफल शूटिंग शिका, मुष्टि युद्ध, कराटे, जुडो काही तरी शिका
किमान अर्धा तास व्यायामाला द्या,
आणि हो आधी देवा धर्मावर विश्वास ठेवा जिथे धर्म आहे तिथे विजय निश्चितच असतो या श्रीकृष्ण वचनावर विश्वास ठेवा बघा लाहोर काय पुन्हा अटक पार जरीपटका फडकल्याशिवाय राहणार नाही,,
क्रमशः,,,,,,,

No comments:

Post a Comment