Tuesday, August 16, 2011

सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,

||श्री नथू रामाय नमः||
सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,अस भीम ध्युतात हरलेल्या धर्माकडे पाहून
खूप रागाने बोलतो कारण जुगारात धर्माने सार राज्य ,धन दौलत,
हे तर गमावलाच पण पंचालीलाही जुगारात पणाला लावलं आणि
बलशाली पांडवांची पत्नी एका क्षणात कौरवांची दासी झाली आणि ,,,,,,
मग रागाने वेडा-पिसा झालेला भीम बोलतो सहदेव थोडा अग्नी आण
जेणे करून तो खाल्ला तर माझा राग थोडा तरी कमी होईल,,,,,,,,,
कारण या परीस्थित मी आणखी काही वेगळ करू शकत नाही,,,,,,,,,,
आज अण्णा हजारे सकाळ पासून उपोषणाला बसणार होते तसे ते काल पासूनच बसले होते.
पण एकंदरीत वातावणर सारच अण्णांच्या बाजूने होत आहे.
सारा देश एका नव्या तारणहाराच्या प्रतीक्षेत होता .
तो अण्णा हजारेंच्या रूपाने मिळालेला दिसत होता .
सकाळी टीव्ही लावला आणि उडालोच अण्णांना अटक करण्यात आली
ह्या बातमीने स्वागत केल,,,,
आणि माझी हि अवस्था त्या भीमा सारखीच झाली
अण्णांचा काय अपराध?
जन लोकपाल विधेयक ते सत्ताधार्यांच्या हलगर्जी पणामुळे
१९७३ पासून फक्त पास व्हयाच राहील होत ते बिल पास करा म्हणन
हा अपराध आहे,,,,,,,,?
उपोषणाला बसायच्या आधीच अटक?
सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
काल परवा पासून दिल्लीतील परिस्थिती पाहतोय
अगदी मुल्ला मुलायम सिंग याने अयोध्येच्या वेळी जसा बंदोबस्त लावला होता
किंबहुना त्याही पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त कुणासाठी तर
अण्णा आणि त्यांच्या सहकार्यांसाठी जे उपोषणाला बसणार होते,
सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
आज अण्णा लढत आहे ते स्वतः साठी नाही
तुमच्या आमच्या भवितव्यासाठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी
आणि सरकार अटक करत ,,,,,,,,,,,?
आणि पकडून कुठे ठेवत ? तिहार जेल,,,?
जिथे गुंड पुंड आणि बदमाश कलमाडी आहे तिथे?

या देशात या पेक्षा मोठ्ठा अपमान कुणाचा केला गेला नसेल.
सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
अग्नी आण म्हणजे ज्या सरकारी हातांनी आणि
कोन्ग्रेसी बाजार बुनग्यानी अण्णांना अटक करणार्यांचे धारिष्ट्य दाखवले
ते हातच जाळून टाकतो,,,,,,,,
भ्रष्टाचाराच्या आदर्श कलेवराचे निर्लज्ज समर्थन करणार्यांचे
थोबाड रंगवण्यासाठी ,,,,,

सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
अग्नी आण कारण भ्रष्टाचाराचा कैफ चढलेल्या या मंद बुद्धी
मन मोहनला सरकारला सणसणीत कानाखाली मारता येईल,,,,,,
सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
ह्यांच्या नाकर्ते पणाचा प्रतिकार करायची ताकद मिळू दे.
अण्णांना पकडणारे ह्याच पातकी हात आज मला जाळून टाकावेसे वाटतात.
म्हणून म्हणतो सहदेवा त्वरित थोडा अग्नी आण,,,,,,,,
रामदेव बाबा आणि अण्णा हजारे यांच्या विद्वेषाने हे पछाडलेले सारे
त्यांच्या घाताचीच आणि कलमाडी ,ए राजा ,कानिमोळी 
यांच्या बचावाचीच  कृती करणार जनलोकपालच्या  नावावर ईतका
गहजब,,,,,,,,,,,,,,,,?
सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
कारण या देशात भ्रष्टाचार माजवून आमच्या नाशाला कारणीभूत
असणारे कोन्ग्रेस सरकार आमचे वैरीच आहेत .
परंतु या सार्यांना निवडून देणारे आम्ही सारे मूर्खच
तेव्हा सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
भ्रष्टाचाराला वश होणारे आम्ही सारेच आज अण्णांचा अटकेला कारणीभूत आहोत
पण सोनिया चरणी निष्ठा वाहिलेल्या सर्वस्वी आहारी गेलेल्या
मन मोहनापासून अपेक्षा ती काय ठेवावी ?
तेव्हा सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
एका बाईच्या पदराआडून राजकारण करणाऱ्या आपले पौरुष विसणाऱ्या
मन मोहनापासून अपेक्षा ती काय ठेवावी????
राज्य चालवण्यासाठी आमदार खासदार यांच्या लोभाचे
शमन करण्यासाठी त्यांच्या {लाज सत्तेसाठी }
मुर्ख्नाच्या संगतीने स्वच्छ चारित्र्याची आहुती मागून आहुती देणाऱ्या .
माझ्या रागाची धार अधिकच बळकट केली आहे म्हणून ,,,
सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,
ओसामाला ओसमाजी म्हणणाऱ्या दिग्विजयाला फासावर
लटकवायची ताकद यावी म्हणून,,,
जनसेवेस मुकलेल्या,,आपल्या हक्कांचा विसर पडलेल्या
 जनतेला जाग करण्यासाठी मतीमंद मन मोहनला
जाळून टाकण्यास्ठी 
सहदेवा थोडा अग्नी आणि,,,,,,,,,,,
देशाच्या ह्या विटंबनेला,,पूर्वजांच्या पराक्रमाला साक्ष ठेवून सांगतो
नव्हे सार्यांनी शपथ घ्या अस मी म्हणेन ,,
या पुढे कोन्ग्रेस्सला मत देणार नाही ,,
भ्रष्टाचार करणार नाही करू देणार नाही ,,
माझ्या गरजा अत्यंत सीमित ठेवीन,,,
कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही ,,,,,

परवाच सिंघम पहिला त्या एक डायलॉग खूप छान आहे
अशोक सराफ म्हणतो ,
ईस देश कि राजनीती मे सिस्टीम हो ना हो,
ईस देश कि सिस्टीम मे राजनीती जरूर है

हे बदलायचं असेल तर प्रथम ,,,,,,,,,,,
सहदेवा थोडा अग्नी आण ,,
हो मात्र सरकारला एक सल्ला आहे ईतका उपद्व्याप
केलाच आहे अण्णांना पकडायचा तर,,,,,,,,,,,,
आता सरकारने एक कराव अण्णांना एवीतेवी पकडलच आहे तर
त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा लावावा ,,,,,,

कारण,,,
त्यांनी लोकशाहीची झूल पांघरलेल्या भारतीयांच्या हातून 
भ्रष्टाचाराचा  खून करायचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे त्यांना मरे पर्यंत फाशी देण्यात यावी
HANGED TILL DETH हो पण आधी कसब आणि
अफझल गुरु यांची परवानगी जरूर घ्यावी बर का!!!

सहदेवा थोडा अग्नी आण,,,,,,,


4 comments:

  1. ईस देश कि राजनीती मे सिस्टीम हो ना हो,
    ईस देश कि सिस्टीम मे राजनीती जरूर है
    ***********************
    प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण आणि प्रत्येक कृतीला राजकीय ढापण्या लावुन पाहाण्याची घातक सवय देशाच वाटोळ केल्या शिवाय राहाणार नाही.

    ReplyDelete
  2. mitra tuzya sarkhe vachak khup kamich barobar vakya nivadalas abhipray dyayala mhanun tar aapan mitr aahot .

    ReplyDelete
  3. आता सरकारने एक कराव अण्णांना एवीतेवी पकडलच आहे तर
    त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा लावावा ,,,,,,
    कारण,,,
    त्यांनी लोकशाहीची झूल पांघरलेल्या भारतीयांच्या हातून
    भ्रष्टाचाराचा खून करायचा प्रयत्न केला आहे.
    त्यामुळे त्यांना मरे पर्यंत फाशी देण्यात यावी
    HANGED TILL DETH हो पण आधी कसब आणि
    अफझल गुरु यांची परवानगी जरूर घ्यावी बर का!!!

    ReplyDelete
  4. या पुढे कोन्ग्रेस्सला मत देणार नाही ,,
    भ्रष्टाचार करणार नाही करू देणार नाही ,,
    माझ्या गरजा अत्यंत सीमित ठेवीन,,,
    कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही ,,,,,

    ReplyDelete