8 नोव्हेंबर चे ठग्स ऑफ हिंदुस्थान
केवळ आणि निव्वळ सत्तेच्या हव्यासापायी अर्थकारण कसे आणि किती वेठीला धरले जाते याचा उत्तम नमुना म्हणून नोटबंदित नोट बदली कशी योग्य होती हे बोकील आणि भक्तांच्या तोंडून
ऐकलं की एका अतार्किक निर्णयाची नोंद इतिहासाला करावी लागेल हे लक्षात येत
पूर्वी अकबराच्या दरबारी जो चतुर बिरबल च्या नावाने प्रसिद्द असलेलाच आज पुन्हा भक्तांच्या रूपाने जन्माला आला आहे
बादशहा कसा खूष होईल हेच त्याच ध्येय होत
आज ही आहे
अशाच या नव्या अकबराच्या दरबारात घडलेली गोष्ट,,,
नेहमी प्रमाणे लहरी अकबरला स्वप्न पडत
की राज्यात जमा होणारा कर रुपी पैसा हा तिजोरीत जमा होतो पण जनते पर्यंत पोहचत नाही
मी तर जनते पर्यंत पोहचवतो पण जातो कुठे कळत नाही????
जबाबदारी अर्थातच बिरबलावर येते
मग बिरबल राजाला भर दरबारात प्रात्यक्षिक करवून समजावतो
सगळे अकबराचे मित्र व्यवसायिक त्यांना बोलावतो दरबार सुरू होतो तसा बिरबल
एक 5 किलोचा बर्फाचा गोळा मागवतो
दरबारात मग प्रथम मल्ल्या अंबानी अदानी अस एक एक करत तो बर्फाचा गोळा बादशाह हातात येतो तेव्हा तो एक किलोचा झालेला असतो
मग बिरबल दुसरा प्रयोग राबवतो
आता तो पुन्हा 5 किलोचा बर्फाचा गोळा बादशहा च्या हाती सोपवतो आणि सांगतो आता तो जनतेच्या हाती सोपवा
बादशहा अर्थातच आधी मल्ल्या अदानी अंबानी च्या हाती सोपवतो जनते पर्यंत जाण्यासाठी
आणि जनतेच्या प्रतिनिधींच्या हाती जेव्हा तो बर्फाचा गोळा पडतो तेव्हा जवळ पास 5 किलोचा बर्फ केवळ 100 gm उरलेला असतो,,,
त्यावर बिरबल सफाई देतो
बघा बादशहा
सगळे किती प्रामाणिक आहेत
कुणीही काही घेतलं नाही कुणीही काही खाल्लं नाही कुणी काही लपवल नाही तरीही
बर्फ कमी झालाच ना? कारभार हा असाच असतो
असाच होतो कुणीही दोषी नाही
तात्पर्य--- आजचे हे बिरबल त्या बिरबल पेक्षा ही चतुर आहेत जो तळ राखी तो पाणी चाखी हे ते जाणून बुजून विसरतात बर्फ हाताळताना त्या प्रत्येकाच्या हाताला पाणी लागलेलंच असत ते अत्यन्त चतुरपणे लपवतात
पण कितीही लपवल तरी जो बंद से गयी वो हौद से नही आने वाली
No comments:
Post a Comment