Thursday, September 1, 2016

ती देवळाची घंटा काढून टाकावी

||श्री नथुरामाय नमः ||
राज्य सरकारला एक विन्नती
काल जनाष्टमी निमित्त
मी देवळात पाया पाडायला गेलो होतो
माझ्या मागे एक लहानगा आणि त्याचे आई वडील हि सोबत होते
मी आत शिरताना उडी मारून
ती देवळाची घंटा वाजवली
त्यांनतर त्या मुलाच्या आई वडिलांनी
देखील वाजवली,
तो लहानगा राहील कसा??
त्याने हट्ट धरला आणि वडिलांनी
त्याला उचललं आनि घंटा वाजवायला अस उंच उचलून धरणार
तर तितक्यात खाली
पायाखाली नारळाचं पाणी वाहत आले आणि दोघेही घसरून पडले
वडिलांनी प्रसंगावधान दाखवून मुलाला तर वाचवलं पण त्यांना दुखापत झाली,,
आणि या देवळाच्या घंटा प्रकरणाने
मी व्यथित झालो आहे,,
तेव्हा राज्य सरकार आणि केंद्र
सरकार याना विन्नती आहे की,,,,,
त्वरित
या सर्व देवलावरच्या सर्व प्राणघातक घंटा काढून टाकाव्यत आणि त्या ठिकाणी सध्या डोअरबेल बसवाव्यात त्यामुळे घंटेच्या त्या कर्णकर्कश आवाजाचा ना आंम्हला नाही देवाला त्रास होईल आणि लोकांचा हि असा अनावश्यक प्राणहानि टळेल अपघात टळतील,,,
त्यातूनही उद्या कदाचित देऊळ कोसळून शकत कारण घंटा वाजवताना ती जी साखळी असते तिला हेलकावे बसतात आणि हे जीवित हांनी होऊ शकते ती साखळी हलून हलून आधी छत आणि सगळं देऊळ पडू शकत
त्यामुळे
तातडीनं अशा सर्व देवळांवर कारवाई करावी आणि तुम्हला काही अडचण देखील येणार नाही कारण,,
हिंदूंचा पर्सलन लॉ नाही आणि त्यांना वाली हि नाही
त्यामुळे कठीण अस नाहीच हि एकमेव अशी जमात आहे जीला तिच्याच देवा धर्माचा सण उत्सव रितीरिवाज यांचा त्रास होतो हा त्रास टाळण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात
गोरक्षकांना गुंड हिंदूंना षंढ ठरवू शकतात,,,
पुरषोत्तमाला पावून करून घेऊ शकतात,,,,
इस्लासमला शांतीचा धर्म ठरवू शकतात,,,
सक्काळी सक्काळी ते अजाण ऐकू शकतात,,,
पाच वेळची नमाज रस्ता अडवून केलेली ते सहन करतील,,,
तेव्हा काळजी न करता ( तुम्ही ती करत नाहीच म्हणा)
हि कारवाई लकवरात लवकर
करावी सारा तथाकथित हिंदू तुमच्या मागे हिमालयाचे सारखा उभा राहील
जय भारत
आपलाच
अधर्मी सत्यशोधक




2 comments:

  1. खूप छान
    गोविंदा मध्ये 18 वर्षा पेक्षा लहान मुलं नको हे मान्य
    पण थरांची बंदी पटत नाही

    कारण या मुळे दहीहंडी मधला जोश निघून गेला आहे
    सांघिक भावना अश्याच खेळां मधून वाढत असते
    एकीकडे virtual world मध्ये रमणारी तरुण पिढी दिसते तर दुसरी कडे जोश आणि साहस यातून व्यक्त होणारी दहीहंडी मधली तरुणाई
    अर्थात जायबंदी होणारे गोविंदा हा दुर्लक्ष न करता येणारा मुद्दा आहे हे नाकारता येत नाही
    अश्या वेळी सरकार परंपरा आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी गोविंदांचा विमा काढू शकते आणि सुरक्षा साधनं उपलब्ध करून देऊ शकते

    समाज प्रबोधन वा समाजातील चालीरीती यांना कायद्याच्या मदतीने बदलता येतील हा भ्रम आणि shortcut झाला

    समाज हळूहळू आणि सकारात्मक रीतीने बदलतो आहे गणेशोत्सवा मधून जाणवतं आहे. शाडूच्या मूर्ती महाग असूनही त्यांची मागणी वाढत आहे हे वास्तव आहे
    कोणत्याही बदलांना पुरेसा वेळ दिला की कायदा न करताही फरक पडतो हे दिवाळी मधील फटाक्यांच्या आवाजात झालेली घट यातून सिद्ध होत आहे

    हिंदू धर्म हा बदल सहजतेने स्वीकारणारा धर्म आहे
    साडे तीनशे चारशे वर्षा पूर्वी atracity कायदा नसताना ज्ञानेश्वर आदी संतांनी धर्म जागृती केली आणि जात पात धर्म हे भेदाभेद विसरून पंढरीची वारी सुरु केली जी आजही त्याच श्रद्धेने सुरु आहे

    जे विचारजंत कायद्याच्या दडपणाने त्यांचे विचार लादू पाहातात ते समाज प्रबोधन करण्याची त्यांची ताकद आणि हिम्मत नाही हे जाणून असतात

    म्हणूनच
    दहीहंडी हा एक साहसी खेळ आहे. त्या मध्ये बराच सराव आणि सांघिकवृत्ती असल्या शिवाय थरांचे विक्रम करता येत नाही
    यात match fixing करता येत नाही कारण जे होत असत ते सरळ साधं आणि जोश पूर्ण असतं
    अठरा वर्षांचा तरुण देशाचं नेतृत्व कोणी करायचं ते निर्णय घेण्यास सक्षम असेल तर दहीहंडीच्या थरांच्या स्पर्धेत भाग घ्यावा किंवा नाही हा हि निर्णय घेण्यास तितकाच सक्षम आहे हे मी मानतो

    सरकारने गोविंदाच्या पाठीशी उभी राहण्याची गरज आहे आणि जागतिक विक्रम करणाऱ्या तरुणाईला विम्याचे संरक्षण आणि सुरक्षा साधन उपलब्ध करून देऊन स्थानिकांच्या भाषा आणि संस्कृतीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं हि मायबाप सरकार कडे विनम्र विनंती

    🚩जय महाराष्ट्र जय मराठी🚩देवेंद्र मराठे

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या दिवशी प्रत्येक मराठी माणूस रोज दहिहंडी असल्या प्रमाणे मराठी माणसाला वर जाण्यासाठी (प्रगति करण्यासाठी) मदत करेल तो दिवस खरोखरच भाग्याचा असेल..

      Delete