Thursday, February 24, 2011

मोदी पुराण

मटा,चे वार्ताहर
प्रकाश आकोलकर 
पहा जरा गुजरात कडे ! अस,
मोदी पुराण सध्या महाराष्ट्रात चालू आहे ,,
आपल्याकडे हे खूप चालत एक बोलला कि दुसरा त्याची री लगेच ओढतो ,
त्याला कारणही तशीच आहेत आणि
तुमच्या सारखे टुकार पत्रकार हि ह्या वाहत्या गंगेत हात धूवून घेवू
म्हणत मोदींवर दुगन्या झाडायचं प्रयत्न करतात ,
वास्तविक तुमच्या हिमतीची दाद द्यावी तेव्हडी कमी ,
एक साधा पत्रकार
मोदींना सुनावतो, कि,
"सामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही मोदींना प्रश्न विचारता ?
आपोआप तुमची दोन ईंच छाती चार ईंच होते अस वाटत काय?
बर प्रश्न काय तर म्हणे ,
शांतता आणि सुव्यव्स्थे बद्दल तुमच असणार प्रेम नेमक ,
२८ फेब.२००२ नंतर म्हणजे गोध्र हत्याकांड नंतर का नाही दिसलं?
तास केल असत तर निदान १००० भर लोकांचे प्राण तरी नक्की वाचले असते .
मग मी देखील मोदींच्या प्रशासकीय कौशल्याच्या गोड गाण्यां मध्ये 
सहभागी झालो असतो,,,,,,,वगेरे वगेरे ,
खरतर मोदींची पाठ थोपटायला तू कोण मोठा
टिक्कोजीराव लागून गेलास अस विचारू शकतो पण ,,,,
काय आहे तुमच्या सारखे टुकार पत्रकार जे मुंबईची वेस हि ओलांडत नाहीत
ते अयोध्या, गोध्रा,मंदिर आणि कसाब,,,,यावर लिहायला लागले कि
तुमच्या सार्ख्याची किती गुडघ्यात आहे (अक्कल)ते कळत.
पुढे मी मोदी पुराण तर सांगणार आहे पण एक गमतीशीर sms
आला होता त्याविषयी, बोलतो मग
तर,
चित्ता सिगारेट फुंकत होता, एक उंदीर तिकडून येतो आणि म्हणतो,
भावा सोड ती सिगारेट ,हे जग खूप सुंदर आहे चल तुला दाखवतो,
चित्ता बरोबर निघतो.
पुढे हत्ती भेटतो, हत्ती ड्रग्स घेत असतो, उंदीर,,,,
भावा सोड ते ड्रग्स ,हे जग खूप सुंदर चल तुला दाखवतो,
हत्ती बरोबर निघतो,
पुढे वाघ व्हिस्की पीत असतो ,परत उंदीर त्याला
म्हणतो मित्र सोड ती व्हिस्की ,हे जग खूप सुंदर आहे
वाघ तो व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवतो आणि
उंदराच्या ४\५ मुस्कटात मारतो,
हत्ती अरे अरे त्या गरिब बिचार्याला का मारतोस
तो चांगलच सांगतोय ना ?
वाघ त्यावर म्हणतो ,,,,,,,,
हा हरामखोर जेव्हा जेव्हा जेव्हा भांग पितो
तेव्हा तेव्हा हा असाच बोलतो मी याआधी याच्या
बोलण्याला फासून ३ वेळा जंगल फिरून आलोय,,,,,,,,,,,
काही समजला का? काहि प्रकाश पडला का अकोल्या ?
तुझ्या सारखे उंदीर वृत्तपत्र आड बसून पत्रकारीकेची झूल पांघरून
आम जनतेला च्युतीया बनवत असतात हे त्यासाठी होत आता ऎक
मोदी पुराण ,,,
खरतर हेही मी एका वाक्यात सांगेन
मोदींचा कारभार म्हणजे
"सीधीबात नो बकवास फैसला ऑन द स्पॉट"
पण तुला नाही कळायचं  म्हणू सविस्तर सांगतो
मी स्वतः गेली १५ वर्षे गुजरातला "मां आशा पुराच्या" निमित्ताने
दसर्याच्या दिवसात आपले जसे वारकरी पायी पंढरपूरला जातात
तसे हे कच्छी लोक मां आशापुराला जातात
मी ५-६ दिवस तिथे मेडिकल कॅम्प  मध्ये असतो काम करतो.
आणि हो कच्छ गुजरात मध्ये येत बरका.तर,,,
संध्यकाळी गाडीत बसलो कि सकाळी ९\१० पर्यंत गांधीधामला पोहचते .
स्टेशनच्या बाहेर आम्हाला घ्यायला  गाडी आलेली असते
मस्त सुंदर चकाचक रस्ते कुठेही सरकारी  अथवा खाजगी
ब्यानर बाजी नाही, मोदींचा फोटो तर नाहीच नाही ,,,,,,
तुमच्या महितीसाठी सागतो सध्या
गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरु आहे.
हे पाचवं जागतिक संमेलन.जवळपास ८० देशातून उद्योगपती गांधीनगरला
तीन दिवसांसाठी एकत्र आलेत.
गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरु केलेलं हे संमेलन दरवर्षी भरतं.
एका व्यासपीठावर येण्याचं टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजूला बसलेले दिसतायत.
एवढंच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत.
त्यांच्यासोबत देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत.
मोदींना हे जे जमलंय ते केंद्राला तरी जमेल?
ह्यावेळी मी गेलो तेव्हा तिथं मोदींच्या ‘स्वागतम’ची चर्चा सुरु होती.
मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.
स्वागतमची आय़डिया अशी.
समजा तुमचं एखादं काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी तो करत नसेल
तर ते काम घेऊन तुम्ही तालुका ‘स्वागतम’मध्ये जायचं.
तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची.
समजा त्यानंही काम नाही केलं तर ‘जिल्हा स्वागतम’मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं.
जिल्हाधिकाऱ्यानेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचं.
मोदी ‘स्वागतम’मध्ये आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठवल्या जातात.
संबंधीत अधिकाऱ्यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात.
व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतंच.
तक्रारदाराला मोदी बाजूच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधीत अधिकाऱ्याला जाब विचारतात,
का रे बाबा या व्यक्तीचं काम का नाही झालं?
अधिकाऱ्यानं जर सांगितलं की तक्रारदारानं आवश्यक असलेले कागदपत्रं पुरवली नाहीत
तर मोदी तक्रारदाराला विचारतात..
समजा चूक अधिकाऱ्याची असेल तर मोदी तिथंच आदेश जारी करतात.
आणि समजा तक्रारदारानं आवश्यकबाबींची पूर्तता केलेली नसेल
तर त्याला तसं सांगतात. पण मोदी निर्णय देतात हे नक्की.
विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकाऱ्यांना झापत नाहीत.
स्वागतममध्ये जाऊन आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलेलं अनुभव अधिक बोलका आहे.
एक जण मोदी स्वागतममध्ये एका अनाधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला.
बिल्डींग तर अनाधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार.
मोदीनं संबंधीत शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना
विचारलं की तक्रारीत किती तथ्य आहे? अधिकाऱ्याला स्पष्ट उत्तर देता येईना?
त्याची तारांबळ उडाली? मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डींग अनाधिकृत आहे की नाही?
अधिकाऱ्यानं अखेर सांगितलं हो..अनाधिकृत आहे..
मग पाडली का गेली नाही? मोदींचा पुढचा प्रश्न.
कारण बिल्डींगमध्ये सगळे दादा लोक राहतात.
अधिकाऱ्याचं उत्तर..मोदींनी फॅक्सवरून बिल्डींगचे सगळी कागदपत्रं लगेचच मागवून घेतली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती तिथंच तपासली आणि बिल्डींग अनाधिकृत असल्याचं सांगितलं.
मोदींनी आदेश दिला की ही बिल्डींग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे
मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा... मोदींचा झटपट निर्णय.
या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचं टाळू शकत नाही.
कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती.
त्यातून अधिकाऱ्यांना तक्रारदारांची फक्त भेटच घ्यायचीय असं नाही तर तक्रारीचं निवारणंही करायचंय
म्हणजेच काहीही करून कामातून सुटका नाही.  
पल्याकडे कधी हे होईल?
आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारीही तिकडं फिरकत नाहीत.
पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल.
मोदींनी ‘गुणोत्सव’ नावाचा कार्यक्रम राबवला.
म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन.
प्रत्येक दिवशी पाच असं तीन दिवस १५ शाळांमध्ये जाऊन शिकवायचं.
तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही.
काय शिकवलं त्याचा अहवाल सादर करायचा.
कुठल्या अधिकाऱ्यानं कुठल्या शाळेत शिकवायचं याची अधिकृत लिस्ट दिली जाते.
कुणीही उठून कुठेही जायचं नाही आणि पाट्या टाकून यायचं नाही.
गावात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी बोलायचं.
समस्या जाणून घ्यायच्या. एखाद्या घरातले जर मुलीला शाळेत पाठवत नसतील तर त्यांच्याशी बोलायचं.
पुस्तक, गणवेशाचा प्रश्न असेल तर तो तिथंच सोडवायचा.
परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळतं
आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येतं याचं समाधान वाटतं.
परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या.
मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.
लोक आणि प्रशासन यांच्यातलं अंतर मिटवायचं? काय करावं?
मोदींनी सांगितलं ‘खेलोत्सव’ म्हणजे अख्ख्या गुजरातनं खेळायचं.
कल्पना चांगली आहे पण वाटतं तितकी सोपी नाही.
पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली.
खेलोत्सवमध्ये अगोदर गाव पातळीवर लोका, स्थानिक नेते, अधिकाऱ्यांनी खेळायचं.
खेळ कुठलाही असो. खेळायचं. नंतर तालुक्यावर खेळायचं
त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर.
इथंही सगळं अधिकृत...
खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करतं.
खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी तशा लावल्या जातात.
गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदानं तयार झाली,
असलेली सुधारली, नवीन खेळाडू मिळाले.
अधिकाऱ्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली.
काय पडला का काही प्रकाश,,,,,? आकोलकर लोक उगाचच मोदींची पाठ नाही थोपटत .
त्यामुळे मोदींची पाठ थोपटायला तुम्ही कित्ती खुजे आहात ते लक्षात आल असेलच
आणि सर्वात महत्वाच
आधी गोध्रा झाल मग गुजरात
आणि गोध्रा हे स्वातंत्र्य पूर्व काळापासून हे सार सहन करतय
वार्ताहर आहात हवा तर तपासून पहा
गोध्रात हिंदुनी किती वेळा मार खाल्ला आहे ते .
एकदा कुठे गुजरात झाल तर ईतका पोटशूळ?

5 comments:

  1. जयमहाराष्ट्र!
    एकदम तडाखेबंद लिहिले आहेत्........मोदी नावाची ज्यांना ज्यांना काविळ झाली आहे अश्या गल्लाभरू पत्रकारांच्या मुरलेल्या काविळीवर हाच जालिम उतारा आहे.....अकोलकरांचा हिंदुस्वेष सर्वश्रूत आहे .

    ReplyDelete
  2. नरेंद्र मोदींवर उडण्याची घाणेरडी सवय अनेक राजकीय पक्षांना, माध्यमांना अगदी पहिल्या पासून आहे. मोदींनी BRT चालू केली कि लगेच पुण्यात यांची ते चोरण्याची धडपड. 'हिंदुत्ववादी' म्हणून बोंब मारणार्यांना एक सवाल आहे, 'आम्ही हिंदू, हिंदू म्हणून पाकिस्तानात तर बोंबलत नाही ना? ही भरतभूमी आमचीच आहे. हिंदुत्वाचे संस्कार आमच्यावर गेली ५,००० वर्ष आहेत. मग फक्त आजच मत-पेटीच्या राजकारणासाठी तुम्ही आमचा आणि पर्यायाने स्वतःचा गळा का घोटात आहात?' धर्मनिरपेक्षता आम्ही सुद्धा जाणतो, किंबहुना आपल्याहून अधिक जाणतो. पण आपण मात्र सोयीस्कारीत्या राजकारण करता. तो उत्तरेचा 'राजकुमार' राहुल गांधी म्हणतो, 'माझ्या देशात आनुवंशिक राजकारण चालणार नाही.' अरे राजा, मग तू काय वरून पडलास का? किती हास्यास्पद बोलावं माणसानी. नरेंद्र मोदींना शिव्या घालताना यांना एक गोष्ट कळत नाही कि त्या माणसानी आज गुजरात कुठे नेऊन ठेवला आहे. लोक गुंतवणूक करायला तुमच्या कडे ढुंकून पण बघत नाहीत, सरळ गुजरात गाठतात. ही चूक तुमची का मोदींची? तुम्ही स्वतः कितीही डोळे झाकून घेतले तरी जगाला आंधळ ठेवू शकत नाही कॉंग्रेसवाल्यांनो! आणि हीच गोष्ट तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. ही पुण्यापुरातन भरतभूमी पुन्हा जागी होत आहे, हे लक्षात असू द्या.

    ReplyDelete
  3. मनाली ताई हा लेख मी आकोल्काराना पाठवला परंतु त्याचा उत्तर नाही आल

    ReplyDelete
  4. ही चूक तुमची का मोदींची? तुम्ही स्वतः कितीही डोळे झाकून घेतले तरी जगाला आंधळ ठेवू शकत नाही कॉंग्रेसवाल्यांनो! आणि हीच गोष्ट तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. ही पुण्यापुरातन भरतभूमी पुन्हा जागी होत आहे, हे लक्षात असू द्या. अगदी बरोबर आशय मित्रा .

    ReplyDelete