Monday, March 1, 2010

"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? " ....

||श्री नथू रामाय नमः ||
१५ ऑगस्ट १९४७ - राष्ट्रजन्म ? 
येणार येणार म्हणता म्हणता एकविसावे शतक आले. 
चिरप्रतिक्षीत असलेले हे एकविसावे शतक येऊन साडे नऊ वर्षे उलटून गेली. 
जेव्हा एकविसाव्या शतकाची चर्चा होते, 
तेव्हा ईसाची चर्चा होणे आवश्यक आहे ! हे जे एकविसावे शतक आहे, 
ते आमचे एकविसावे शतक नाही. हे ईसाचे एकविसावे शतक आहे. 
स्वातंत्र्यप्राप्तिनंतर आम्ही कायम एकविसाव्या शतकातच जगत आलेलो आहोत. 
हजरत ईसा मसीह जेव्हा कृसवर लटकवले गेलेले नव्हते, 
त्याच्या ५७ वर्षापूर्वी, उज्जैनी येथील अवंतिका नगरीत 
भगवान महाकालाच्या पवित्र चरणांच्या सावलीत, 
आर्य सम्राट महाराज विक्रमादित्य यांनी, 
विदेशी शकांना बदडून - हाकलून, आर्य संस्कृतीची विजयपताका डौलाने फडकावीत, 
आपल्या नावाचे नविन संवत्सर प्रारंभीत केलेले होते.

विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे आम्ही उत्तराधिकारी आहोत. 
आडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांचा प्रादुर्भाव झाला, 
आणि भगवान बुद्ध व महावीर यांच्याही आडिच हजार वर्षापूर्वी कुरूक्षेत्राच्या समरांगणात, मानवतेच्या कल्याणाकरीता, भगवान श्रीकृष्णांनी भगवतगीतेचा उपदेश केलेला होता. 
अजुनही पुरातन इतिहास आहे आमचा. लोक आम्हांला समजावतात, की हिंदुस्थानची "हिस्टरी" गांधींपासून सुरू होते व गांधींपर्यंत दम तोडते. १९४७ साली राष्ट्राचा जन्म झाला. राष्ट्रपित्याने जन्म दिला. जर या राष्ट्राचे कोणी पिता असतील, तर या राष्ट्राच्या कोणी माताही असल्या पाहिजेत ! गांधीजी जर या राष्ट्राचे पिता असतील तर कस्तुरबा या राष्ट्राच्या माता आहेत. पण या राष्ट्राचा जेव्हा तथाकथीत जन्म झाला, तेव्हा कस्तुरबा गांधींसोबत नव्हत्या. त्यांचा पुर्वीच देहांत झाला होता तरी गांधीजींनी विना कुणा मातेच्या सहाय्याने या राष्ट्राला जन्म दिला. स्वातंत्र्यप्राप्तीचा हा इतिहास आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण
वस्तुथिती ही आहे की,
हे राष्ट्र कुणा गांधीजींच्या द्वारा जन्मास आलेले नाही हे राष्ट्र, गांधीजींनी राजनितीत येण्यापूर्वी पुष्कळ वर्षे आधी, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आधिकार आहे व तो मी मिळवणारच!"
असे सिंहघोष करणार्‍या लोकमान्य भगवान टिळकांचे राष्ट्र आहे.
हे राष्ट्र, घोड्यावर मांड टाकून, घोड्याचा लगाम तोंडात पकडून, दोन्ही हातात नग्न तरवारी धारण करून, १२०० इंग्रजांच्या नरमुंडमाला काप कापून भारत मातेची ओटी भरणार्‍या, राष्ट्रलक्ष्मी महाराणी लक्ष्मीबाईंचे राष्ट्र आहे.
विदेशी आक्रमकारी लुटारूंना भारतातून हाकलविण्यासाठी क्रांतिची ठिणगी पेटविणार्‍या अमर हुतात्मा मंगल पांडेंचे राष्ट्र आहे.
चरखा व टकळीने आरंभित नाही झालेला आमचा इतिहास. जगातील कुठल्याच राष्ट्राला चरखा व टकळीने स्वातंत्र्य मिळवून दिलेलेच नाही.
फारच जरूरी आहे वस्तु -
चरखा ! फारच आवश्यक आहे उपकरण टकळी ! कपडे शिवण्यासाठी 'सूत' तयार होते त्या पासून. शरीर झाकले जाऊ शकते, पण कुणा राष्ट्राची इज्जत चरखा व टकळीने झाकली जाऊ शकत नाही.
रक्तानी निर्माण होत असतो राष्ट्राचा इतिहास.
असिधारा व्रत आहे ! तरवारीच्या धारेवर चालावे लागते राष्ट्राच्या निर्माणा करीता.
भिक मागून मिळत नाही कुठल्याच कॉमला स्वातंत्र्य ! हिसकावून घ्यावे लागते ते. अत्याचारी लोकांचे दात तोडावे लागतात.
पुरूषार्थाचा परिचय द्यावा लागतो.
आम्ही स्वराज्याचे आधिकारी आहोत हे सिद्ध करावे लागते. प्रसंगी प्राणार्पण करावे लागते!रामायण कालांत प्रभु रामचंद्रांनी जर चरखे चालवले असते, तर
राष्ट्राच्या अस्मितेची पुनर्स्थापना असंभव होती.
महाभारताच्या प्रांगणात जर चरखे फिरवले गेले असते, तर दुर्योधन व दुःषासन प्रभावित होणार नव्हते.
रामायणाचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे. महाभारताचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे.
धर्म व सत्याच्या बंधनात बद्ध असलेल्या पांडवांसमोर महाराणी द्रौपदीला निर्वस्त्र केले गेले. भगवान श्रीकृष्णांच्या लिलेने, तीला निर्वस्त्र होऊ दिले नाही म्हणा,
पण कौरवांनी तर कोणतीच कसर सोडलेली नव्हती ! आणि प्रतिज्ञा केली महात्मा भिमसेन यांनी,
" ज्या पापात्म्याने महाराणी द्रौपदीच्या वस्त्रास स्पर्ष केला आहे, त्याच्या दोन्ही भुजदंडांना समूळ उखडून, त्याच्या वक्षस्थळास विदीर्ण करून, त्याच्या तप्त तप्त रक्ताने महाराणी द्रौपदीच्या वेणीस आभिषेक करीन."
संकल्प केला द्रौपदीने की,
"जो पर्यंत हे काम होत नाही, तो पर्यंत माझे केस मोकळे असतील."
प्रतिज्ञा पूर्ण करण्यात आली. १८ औक्षहिणी सेनेचा सर्वनाश झाला.
युद्ध क्षेत्रात सर्वांच्या नजरेदेखत महात्मा भिमसेन यांनी आपल्या वज्रमुष्टीच्या प्रहारांनी दुरात्मा दुःषासनाचे वक्षस्थळ विदीर्ण केले.
दोन्ही भुजांना मुळासकट उखडले.
कढत कढत रक्ताने महाराणी द्रौपदीस अभिषेक केला व सांगितले की,
" घे, बांधून घे ! आता आपल्या विखरलेल्या संस्कृतीसमान केसांना एकसुत्रात बांधुन घे ! येणार्‍या नविन पिढ्यांना हे जाणून घेऊदेत की,
राष्ट्राच्या अपमानाचा प्रतिशोध कसा घ्यायचा असतो."
असे घडले आहे आमचे राष्ट्र
हे राष्ट्र - चंद्रगुप्ताचे राष्ट्र आहे. युनानच्या आक्रमणकारी सेनापती सेल्युकसला ज्यांनी आपल्या पुरूषार्थाने गुढगे टेकायला विवश केले. आपली राजकन्या समर्पित करूनच सेल्युकस जिवंत परत जाऊ शकला.
चंद्रगुप्ताचे राष्ट्र !
चाणक्याचे राष्ट्र !
सम्राट आशोकाचे राष्ट्र ! स्कंदगुप्त- समुद्रगुप्ताचे राष्ट्र ! महापराक्रमी महाराज यशोधनाचे राष्ट्र !
धर्मराज्य युधिष्ठिराचे राष्ट्र ! भगवान श्रीकृष्णाचे राष्ट्र ! श्रीरामचंद्रांचे राष्ट्र !
श्रीरामाचे पिता दशरथ ! दशरथाचे पिता अज !
अजचे पिता रघु !
रघुची पुरातन परंपरा -
सम्राट हरिश्चंद्रांची परंपरा ! मानभाताची परंपरा !
सगरची परंपरा !
आणि
भारत मातेच्या प्रांगणात भगवती भागिरथीला प्रवाहित करणार्‍या भक्त शिरोमणी महात्मा भगिरथाचे राष्ट्र आहे !गौतमाचे राष्ट्र !
कपिलाचे राष्ट्र !
कणादाचे राष्ट्र !
अगस्ती - वाल्मिकी - वसिष्ठ - व्यासांचे राष्ट्र आहे.
भगवान शंकरांचार्यांचे - रामानुजाचार्यांचे - वल्लभाचार्यांचे -
मध्वाचार्यांचे -
निंबार्काचार्यांचे -
भगवान श्रीकृष्णचैतन्यदेव गौरांग महाप्रभुंचे राष्ट्र आहे.
तुकारामांचे राष्ट्र !
ज्ञानेश्वरांचे राष्ट्र ! हिंदुपदपातशाहीच्या
निर्माणाचा संकल्प छत्रपति शिवाजी महाराजांच्या हृदयात जागृत करणार्‍या,
सह्याद्रीच्या पर्वत शृंखलेत तपस्या करणार्‍या राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचे राष्ट्र आहे !बकरीचे दुध पिणार्‍या -
चरखा चालविणार्‍या -
टकळी फिरविणार्‍या कुणा भेकड व्यक्तिद्वारा हे राष्ट्र निर्माण झालेले नाही.
या राष्ट्राची परंपरा गांधींपासून सुरू झालेली नाही व कुणा गांधींपाशी समाप्त होणार नाही.
गांधी मरून गेले पण राष्ट्र गांधींबरोबर समाप्त होत नसते ! संघटना समाप्त होतील. काँग्रेसचा इतिहास समाप्त होईल, पण राष्ट्राचा इतिहास समाप्त होणार नाही.
लक्षावधी वर्षांचा इतिहास आहे आमचा.
पृथ्वीच्या जन्मापासून हे राष्ट्र मानवतेचे मार्गदर्शन करीत आलेले आहे.
काँग्रेससारखे आनेक पक्ष विनाशाच्या गर्तेत विलीन होऊन जातील,
तरी सुद्धा हे राष्ट्र मानवतेचे मार्गदर्शन करीत राहील.
राहूल गांधींवर
सोनिया गांधी व राजीव गांधींचे संस्कार आहेत.
राजीव गांधींवर इंदिरा गांधींचे संस्कार होते व इंदिरा गांधींवर त्यांचे परम पुज्य परम धन्य पिता जवाहरलालजींचे संस्कार होते. या भ्रष्ट परंपरेला वेळीच रोखले नाही तर या राष्ट्राचा सर्वनाष अटळ आहे. काँग्रेसवाले हल्ली राष्ट्रीय स्थिरता व अखंडत्वाचा गोष्टी करतात.
कुठे आहे अखंडता ?
कुठे आहे आमचा पंजाब ?
गुरू परंपरा निर्माण करणार्‍या गुरू नानकदेवांचा मलकाना पंजाब कुठे आहे ?
पाणिनीला जन्म देणारा पुरूषपूर पेशावर कुठे आहे ?
काशी विश्वेश्वराच्या मंदीरावर साडे बारा मण सोन्याचे छत्र चढविणार्‍या महाराजा रणजीत सिंहाचे लाहोर कुठे आहे ? हरिसिंगांचे पंजाब कुठे आहे ? बंदा बैरागीने पापात्म्यांपासून मुक्त केलेला पंजाब कुठे आहे ? सरदार भगतसिंगांचा पंजाब कुठे आहे ? देवता स्वरूप भाई परमानंदांचा पंजाब कुठे आहे ? सायमन कमिशनला विरोध करून ब्रिटीशांशी लढताना बलिदान देणार्‍या पंजाब केसरी लाला लजपराय यांचा पंजाब कुठे आहे ?
कुठे आहे वंदे मातरम् चा महामंत्र स्वातंत्र्ययुद्धाला प्रदान करणार्‍या बंकिमचंद्रचट्टोपाध्यायांचा बंगाल ?
तुम्ही तर सर्व कापाकापी करून नष्ट करून टाकलेत.
कुणाचा सल्ला सुद्धा घेतला नाहीत.
अटकेपार झेंडे फडकाविणार्‍या, दिल्लीच्या रक्तदुर्गावर भगवा झेंडा फडकाविणार्‍या मराठी परंपरेच्या उत्तराधिकार्‍यांना विचारले होते काय ?
की आम्ही तुमच्या दिव्य भारत मातेचे तुकडे करीत आहोत. सांप्रदायिकतेच्या लाँडग्यांना जगतजननी भारतमातेचे तुकडे करून परतून देण्याचा आधिकार मोतीलालच्या लाडक्या पुत्राला कोणी दिला ?
तो काय नेहरूंच्या बर्थडेचा केक होता काय ?
जेव्हा वाटलं तेव्हा कापला व जेव्हा वाटलं तेव्हा वाटला.
ही वाटावाटी करण्याची गोष्ट नव्हती
आईच्या शरीराचे अंग वाटण्यासाठी नसते.
आणि
वाटावाटी भावा - भावांमध्ये होत असते.
भाऊ ते असतात ज्यांची आई एक असते.
भाऊ ते असतात ज्यांचे वडील एक असतात.
भाऊ ते असतात ज्यांचे बापजादे एक असतात.
पण ज्या लांडग्यांनी भारतमातेला आपली आई म्हणून स्विकारलेच नाही, ज्यांनी रामचंद्र - कृष्ण-भगवान बुद्ध - महावीर - शिवाजी - राणा प्रताप यांना आपले बापजादे म्हणून स्विकारलेच नाही, ज्ञानेश्वर - तुकाराम - नामदेव - समर्थ रामदास यांच्या स्मरणाने ज्यांना परमधन्यतेची अनुभुती झालीच नाही - ज्यांना गंगास्नानापेक्षा आब-ए-जमजम पवित्र वाटते - ते लोक कोणत्या नात्याने आमचे भाऊ बंद ? कसे झाले ? कोणता तर्क आहे ? कोणते गणीत आहे ? कोणता फॉर्म्युला आहे भाईचार्‍याचा ?
ब्रिटनहून आलेला विदेशी. फ्रान्सहून आलेला विदेशी. पोर्तुगालहून आलेला विदेशी. गोव्यातून पोर्तुगिझांना हाकलून लावले. का हाकलले ? काय अपराध होता त्यांचा ? विदेशी होते ! पाँडेचेरीहून फ्रान्सीसांना हाकलले ! का ? विदेशी होते - फ्रान्सहून आले होते. सगळ्या भारतवर्षातून इंग्रजांना हाकलले ! का ? विदेशी होते - इंग्लंडहून आले होते.
मग याचा कधी विचार केला नाही का तथाकथीत बुद्धीजीवी प्रगतीशील लोकांनी - समानतेच्या व धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगी लोकांनी की, जर पोर्तुगालहून आलेला विदेशी होत असेल, फ्रान्सहून आलेला विदेशी होत असेल व इंग्लंडहून आलेला विदेशी होत असेल तर अरब - इराण -तुर्कीस्तान - सहारा - बलख - बुखाराहून आलेला, उजबेकिस्तान - कजाकीस्तानातून आलेला, समरकंद - ताश्कंदहून आलेला लुटारू स्वदेशी कसा आसू शकेल?
व्हिक्टोरिआचे गोरे-गोरे, गुलाबी-गुलाबी,
स्मार्ट-स्मार्ट,
क्यूट-क्यूट पुत्र जर स्वदेशी ठरत नसतील तर बाबराचे दाढीवाले बोकड स्वदेशी कसे ठरतील ?
कसे असतील
हे आमचे भाऊबंद ? भाईचार्‍याच्या नावाखाली कसायांना वाटलीत तुम्ही आमची मातृभूमी !
तुम्ही केलीत खंडीत आमच्या देशाची पवित्रता व अखंडता.
या भ्रष्ट परंपरेच्या आदिप्रवर्तक आसणार्‍या गांधींनी भारत मातेचे तुकडे तुकडे झाल्यावर मोहंमद आली जिन्नांना पहिला अभिनंदनाचा खलीता 'पेश' केला
गांधींच्या दृष्टीने राम व रहिम एकच होते.
पण रामनाम किंवा रामायण हे केवळ वाचून किंवा लिहून आलमारीत ठेवण्याचा ग्रंथ नाही.
ते एक जगण्याचे शास्त्र आहे.
जो रामायणात जगतो तो रामस्वरूप होऊन जातो.
गांधींची तत्वे ही पूर्णतः रामायण शास्त्राच्या किंवा रामाने सामान्य माणसाला आखून दिलेल्या मार्गाच्या संपूर्णतः विरोधात होती. रामाने आखून दिलेला मार्ग हा संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. हा मार्ग केवळ हिंदुंसाठी आखून दिलेला नाही. तर संपूर्ण मानव जातीला आखून दिलेला मार्ग आहे. जननी जन्म भूमीला उज्वलतेकडे नेणारा, जन्मभूमीला स्वर्गाचे स्वरूप देणारा मार्ग आहे. समर्थ रामदासांनी रामाने दर्शविलेला मार्ग अधोरेखीत केला, तो शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेला भगवंताचे अधिष्ठान देऊन पुलकीत केला.
आणि स्वर्गासारखे आनंदवन भूवन निर्माण झाले.
पण
गांधींनी आक्रमलेला मार्ग हा रामाने दर्शविलेल्या मार्गाच्या संपूर्ण विरूद्ध होता.
राष्ट्राला अधोगतीला नेणारा मार्ग होता.
रामाने वालीच्या सहाय्याने कधी सीतेच्या मुक्तिचा आणि रामराज्य स्थापनेचा विचार केला नाही.
कारण
वाली अधम होता.
तमोगुणी होता.
मानवतेला कलंक होता. बलात्कारी होता.
रामाने वालीचा वध केला व सुग्रीवासारख्या सज्जनाची मदत घेऊन रावणास परास्त केले.
गांधींनी मुस्लीमांच्या मदती शिवाय स्वराज्य मिळणे अशक्य आहे अशी विकृत संकल्पना पुरस्कृत केली.
बलात्कारी अधमांचे सहकार्य घेतले.
त्यांच्या खिलाफत चळवळीला डोक्यावर बसवून नाचवले.
या खिलाफत चळवळीचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नव्हता.
याचे पर्यवसान भारत मातेच्या फाळणीत झाले
देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल !
साबरमती के संत तूने कर दिया कमाल !!
याचे गायन अजूनही चालू आहे. या काव्या इतके ढोंगी काव्य दुसरे नसेल.
चरख्याने स्वातंत्र्य मिळाले असते आणि चरख्यात मूळात जर इतकी ताकद असती तर भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला रणांगणावर म्हणाले असते की, "तुझ्या आप्तांच्या विरोधात तूला नाही लढता येत तर असू देत, तुझ्याच्याने गांडीव उचलले जात नसेल तर सोडून दे - तू आपला चरखा चालव, सूत काढ आणि आपले गेलेले राज्य परत मिळव.
प्रभू रामचंद्रांनी सुद्धा उगाचच एवढा अट्टहास केला. किष्किंधेच्या हजारो संख्येने असलेल्या वानरसेनेस लंकेसमोर चरखेच फिरवत आणि सूत काढतच बसवावयास हवे होते. म्हणजे रावणाचे हृदय परिवर्तन झाले असते आणि सीतेस पून्हा प्रभू रामचंद्रांच्या हवाली केले असते.
शिवरायांनी सुद्धा पुष्कळ प्रकारे हिंसा उगीचच केली.
आपल्या सर्व मावळ्यांनिशी आफजल खानाला अन् औरंगजेबाला भेटायला जाताना निशस्त्र पदयात्रा करीतच जावयास हवे होते.
त्यांना अनवाणी पाहून जर शत्रूचे मत पालटले नसते तर त्यांनी सत्याग्रह,
उपोषण व शेवटी चरखे आणि सूत कातून त्यांचे हृदय परिवर्तन करून त्यांना स्वराज्य मागायला हवे होते.
या सर्व राष्ट्रपुत्रांनी हे नाही केले.....का नाही केले ?
होती ना अहिंसेत स्वातंत्र्य मिळवण्याची ताकद ?
का इतके हिंसेचे थैमान घातले ?
स्वातंत्र्य प्राप्ती करता घरा दारावर तुळशी पत्र ठेऊन आपल्या सख्ख्या भावांसमवेत चापेकर बंधुंसारखे फासावर चढावे लागते.
राणी लक्ष्मी बाई सारखे डोळा दुभंगलेला असताना सुद्धा १२,००० ब्रिटीशांच्या नरमुंड माला स्वातंत्र्य देवीला अर्पण कराव्या लागतात.
अंदमानातील काळ कोठडीत हातातून रक्त येई पर्यंत कोल्हू फिरवावा लागतो,
चक्की पिसावी लागते.
मंगल पांड्यांपासून ते सुभाष चंद्र बोसांपर्यंत आमचा अखंड रण यज्ञ चालू आहे !
"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? " हा अमीट सिद्धांत आहे.
..लाज नाही वाटत प्रचार करायला ?
"देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल !
साबरमती के संत तूने कर दिया कमाल !!"
आगाखान पॅलेस मधील आलिशान वास्तूत शिक्षा भोगून आणि बकरीचे दूध पिऊन स्वतंत्रता मिळाली आहे काय ?

No comments:

Post a Comment