Thursday, July 22, 2010

सत्तातुरांना न भय ना लज्जा,,,,

मा. नितीनजी गडकरीजी
आजच्या २२,.७.१० च्या लोकमत मध्ये
आपली श्री विवेक गिरिधारी यांनी घेतलेली
बेधडक मुलाखत वाचली,,,
आपले महारष्ट्र कर्नाटक विषयीचे अमुल्य विचार वाचले ,,,
आणि मनात कानडी मोर थुई थुई करत नाचू लागला ,,
आन काय सांगू राव ,,?
माझ मन बी ईतक हलकट हाये कि राव ,,,
त्याला दिवसा ढवळ्या ,
त्यो लबाड बोका नाही का
त्याची गोष्ट आठवली,,,,
आओ त्योवो नाही का दोन माकडान मंदी
भांडान लावून श्यान लोण्याचा गोळा मटकावत हुता
तुमच्यात आन त्या लबाड बोक्यात काय
फरक हाय वो,,,?
त्येच्या सारखाच तुमी बी समद्या राज्या राज्यात जातुया आन,,,?
तिथ भांडान लावून सत्तेचा गोळा मटकावत हात कि,,,?
व्ह्य का नाय,,,?
आ आवो आवो लाजताय काय अस?
आमास्नी समद ठाव हाय...
जीत तुमची ताकद कमी असतीया त्या
राज्यातल्या प्रादेशिक पक्षाच्या हाती
सत्ता नावाची गाजराची पुंगी देताय आन
येळ येताच मोडून बी खाताय,,व्हय का नाय,,?
हरामखोरी करून हळूच सत्तेचा सोपान बी चडताय  ,,,
मित्र या नात्यान मित्रान जर सवाल सोडवायचा सबुद मागीतला
कि तुमास्नी लगोलग तुमची राष्ट्री नीती आठवतीया  ,,,
मंग त्यो प्रस्न तुमच्याच्यान सुटत असला तरी बी,,,
टोलवा टोलवी मस्त जमतीया,,,
आन न्हाईच जमल तर देशाच पंतर परधान हायेतच,,,
राष्ट्रपती हायेत,,,
न्यायालय तर हायेच हाये,,,
द्यायचा टोलवून त्यांकड हाय का न्हाई ?
आर तुम्हास्नी लाज कशी वाटत नाही मी म्हणतु,,,?
कोन्ग्रेस सरकार हुत तवा बी हा पर्सन हुता म्हणाया,,,,
आर आता तुमच सरकार हाय ना ?
शिवसेना तुमचा मित्र पक्ष हाये ना?
तेच्या मदतीन हित सत्ता भोगलीत,
पाय रोवलेत,
जरा कारण त्यांना बी मदत,,,
हिंदुत्वाच्या परस्नावर एक हुता
मग मला सांगा गडकरीजी  ,
सीमा भागातल मराठी बांधव हि हिंदू नहीत व्हय?
हिंदू म्हणून त्यांनी तुमास्नी
मतदान कराव हि अपेक्षा तुमी ठिवणार,,,
महाराष्ट्रात तुमच्या सोयीची भूमिका ,,,
आन कर्नाटकात बी तुमच्याच सोयीची भूमिका,,,?
हे काय बराबर न्हाय,
हे म्हंजी
"चीत बी मेरा आन पात बी मेरा "
काय बराबर का न्हाई?

         

No comments:

Post a Comment