मा. उद्धवजी ,
सप्रेम जय महाराष्ट्र ,
आज पुन्हा एकदा आपला चंद्रभागेच्या तीरावरचा
हवाई फोटो पहिला त्याला समर्पक असे नावही होते .
""खेळ मांडीयेला वाळवंटी ठाई
नाचती वैष्णव भाई रे"
तेव्हा उद्धव साहेब,
आपण ज्या पांडव नावाच्या हेलीक्यापटर मध्ये बसून
हि हवाई फोटोग्राफी केलीत,,,
त्या पांडवानी देखील ,
कौरवांशी बोलणी करताना जास्त नाही आम्हाला
पाचच गाव द्या असा निरोप प्रत्यक्ष,,,
भगवान श्री कृष्ण कडे दिला होता
कृष्णाने देखील खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण,,,,
कौरव उद्दाम पणे म्हणाले ,,,,
पाच गाव,,,?
अरे सुईच्या अग्रावर राहील
ईतकी हि जागा आम्ही देणार नाही ,,,,,
आणि मग ते योग्य वेळ येताच महाभारताच युध्द खेळले ,,,
आणि जय नावाचा ईतिहास रचला ,,,,
आपण हि सीमाभागातील लोकांची
कर्नाटकी वाळवंटातून सोडवणूक करा,
अहो गिनीज बुकाची पान फाटून जातील आपला
शौर्योतिहास लिहिताना ,,,,,,
सीमा बांधव गेली ६० वर्षे ,
या महारष्ट्र विठ्ठलास नित्यनियमाने साकड घालत आहेत
आता वारी संपली
निदान आता तरी कर्नाटकावर कसा वार करता येईल याचा विचार करा
आम्ही सारे महाराष्ट्र वासी तुमच्या सोबत आहोतच
नव्हे छातीचा कोट करून पुढे उभे राहू
आणि सहजच एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो ,
शास्त्रज्ञांनी एकदा एक प्रयोग केला,
"एक तवा तापवला आणि त्यावर एका बेडकाला ठेवलं
पाय पडताच ते बेडूक उडी मारून पळून गेल.
नंतर परत त्या बेडकाला धरल व एका थंड पाण्याच्या टोपात
त्याला ठेवलं ते पाणी अर्थातच थंड असल्यामुळे
त्या बेडकाने काही परत उडी मारली नाही ,
परंतु मग तो टोप त्यांनी मंद आचेवर ठेवला
या सार्याची कल्पना त्याल खूप उशिरा आली परंतु
उशीर झाला होता त्या तापत्या पाण्यात तो बेडूक
गरम होवून मेला ,,,,,,,,,"
आणि नेमकी सीमा भागातील लोकांची ईच्छा आपणा सर्वास
चांगलीच ठावूक आहे,
आजू बाजुच पाणी देखील त्या निमित्याने तापू लागलाय
आपण आज प्रयत्न नाही केला तर,,,,,
अल्लाह मालीक,,,,,
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Thursday, July 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment