Friday, March 2, 2012

शिवाजी महाराज आणि वीर सावरकर साम्य (आक्षेप खंडन भाग ३ )

।।श्री नथुरामाय नमः ।।
शिवाजी महाराज आणि वीर सावरकर साम्य  (आक्षेप खंडन भाग ३ )
कालच्या भागात पाहिलं वीर सावरकर विचाराने कसे बुद्धिमान होते
पण फक्त गावगप्पा मारायच्या हा त्यांचा स्वभाव नव्हता तर ,
"बोले तैसा चाले" हि त्यांची वृत्ती होती,,,
आज पाहू ते किती धाडसी आणि निर्भय होते ते,
आणि आता  पुढील शिक्षणासाठी ते जेव्हा पुण्याला आले तेव्हा सर्व प्रथम
त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करायचं ठरवले नव्हे नव्हे ते त्यांनी केल हि,
पण हे सार ईतका सोप्प होत?
विदेशी कपड्यांची होळी करण? येथे बोलन वेगळ आणि प्रत्यक्ष कृती करण यात मोठ्ठा फरक होता .
विदेशी कपडे जाळायचे म्हणजे घरात बसून रुमाल जाळण असा प्रकार  नव्हता ,,
इंग्रज सरकारचा आम्हाला राग आहे हे सिध्द करायचं होत
परदेशी कपडा वस्तू वापरण म्हणजे त्या कमाईतला  प्रत्येक पैसा
तुमच्या कुटुंबासाठी त्यांना मारण्यासाठी इंग्लंडला पैसा पाठवणे होय
तो पैसा आपल्यावर कायदा लादण्यासाठी वापरला जाणार
अशी साधी स्वच्छ भूमिका होती त्या मागे
बर तस पाहिलं तर परिस्थिती आजही बदलली नाही 
लक्षात घ्या "लाईफ बॉय ज्याचे घरी तो देशाचा मारेकरी "
हे जो पर्यंत आपण लक्षात घेणार नाही  लहान सहन गोष्टीत आपण जो पर्यंत
पर्याय शोधला नाहीतर पुन्हा ईंग्रजांच राज्य पुन्हा यायला वेळ लागणार नाही ,
त्यासाठी होळीच करावी लागते आणि हि होळी करणे म्हणजे
नुसते कपडे पेटवणे अस नाही तर सरस्वाचा त्याग करणे म्हणजे होळी
सुखाचा त्याग करणे म्हणजे होळी करणे
हि होळी करताना इंग्रज पाहतील ते मारतील
तो मार खायाची तयारी असं म्हणजे शौर्य ,,,
आणि ईंग्रजांचा लाठीचार्ज म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हती,,,
पोलिसांचा लाठीचार्ज सोप्पा नसतो सहन करण
करण पोलीस पोटावर पाठीवर नाही मारत
ते गुढग्याच्या खाली नगडीवर मारतात .,,,,
आणि अशा नडगीवर अगदी ४\५ लाठ्या जरी खाल्या तरी माणूस
सहज ३\४ महिने घरी बसतो तो चालू नाही शकत
आणि हे सार माहित असताना विदेशी कपड्यांची होळी करण हे शौर्य होत
आणि या मोर्च्याच नेतृत्व करत होते प्रत्यक्ष "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक "
त्या
मोर्च्यात भाषण करताना लोकमान्य म्हणाले ,
"आता या आगीची धग ईंग्रज सरकारला लागल्या शिवाय राहणार नाही
करण आज आमची शक्ती कमी आहे म्हणून आज फक्त
कपडे पेटवतोय उद्या या आगीची झळ वाढली तुमच सरकार उलथवून टाकू
पेटवून टाकू लक्षात ठेवा"
आमच्यावर अन्याय कराल तर कपड्यां नंतर तुमचा नंबर असेल,,,,
आणि येथेच सावरकरांना लोकमान्यांनी सांगितलं,
"सावरकर उठा आता मुळावरच घाव  घातला पाहिजे
शत्रूच्या भूमीत जावून शत्रूचे नाक ठेचले पाहिजे त्यासाठी आता तुम्हाला
इंग्लंडला जावे लागेल ,,,,"
आणि सावरकर निघाले इंग्लंडला वय वर्ष अवघं २३ ,,,,,,
घरात १८ वर्षाची बायको ,लहान मुलगा मागे ठेवून,,,
"इंग्लंड म्हणजे शत्रूचे नाक"
तेही येथल्या त्यांच्या वकीलीवर लाथ मारून
ठरवलं असत तर त्यांनी खोर्याने पैसा कमावला असता,
पण हे म्हणजे सार ,
"बोलाची कढी आणि बोलाचा भात नव्हता"
"तुज साठी जनन ते मरण तुजवीण जनन ते मरण "
हि भावना मोठ्ठी होती ,
असो,
असे सावरकर जेव्हा लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेवून इंग्लंडला गेले ,
इंग्रजांच्या दहशतीच नाक कापायला ,,,
शत्रूच्या भूमीत जावून शास्त्र गोळा करायची ,
ती बनवायची त्याच प्रशिक्षण घ्यायचं  दयायच,,
हे सार ईतका सोप्प नव्हत पकडलो गेलो तर फाशी हि ठरलेली ,,,,
बर कार्य करायचं कुणासाठी तर भारतातल्या गोरगरीब ,अन्याय पिडीत लोकांसाठी ,,,
त्यांच्यावर चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात आपली ताकद वाढवण्यासाठी
जशास तसे उत्तर देण्यासाठी , ठोशास ठोसा देण्यासाठी ,
घरादाराचा सर्वस्वाचा होम करून हे सार करायचं होत
आणि वय होत फक्त २३ ,,,,,
हे वय येथे आवर्जून सांगतोय अशासाठी करण ,
महाराजांचं वय हि त्यावेळी असच असेल २५\२६ जेव्हा ते पापी
अफझलचा वध करण्यासाठी निघाले होते
घरात सई बाई आजारी शंभू राजे लहान ,
आणि अशावेळी जिजाबाई महाराजांना म्हणतात ,
"राजे मेलात तरी चालेल पण त्या पापी अफझल खानाला गर्दीस मिळवल्या शिवाय
परत येवू नका ,,,,,,,"
लक्षात घ्या हे शब्द आहेत एका आईचे ,
"अरे म्हणून तर शिवाजी घडतो"
ज्याने तुळजापूरची भवानी फोडली ,हिंदूंच्या देवदेवतांची विटंबना केली ,
त्यांना लुटलं,गरीब रयतेस त्रास दिला असा अफझल खान त्याला
मारल्या शिवाय राजे पुन परत येवू नका आणि नेमका हाच आदर्श घेवून
सावरकर इंग्लंडला गेले मला फाशी होईल त्या आधी हे सरकार मी
उलथवलेल असेल हा दुर्दम्य आशावाद घेवून,,,,
शत्रू शास्त्राला घाबरतो हि शिकवण त्यांनी रामायणातून घेतली होती,
महाभारतातून घेतली होती ,शिवाजी राजांकडून घेतली होती,
या देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर उपवास उपयोगाचे नाहीत.
हे त्यांनी जाणले होते आणि म्हणूनच सशत्र क्रांतीचा हुंकार त्यांनी भरला होता
आणि म्हणूनच त्याच घोष वाक्य होत
"शत्रूला मारता मारता मरेतो झुंझेन"
 बर नुसत बोलण नव्हत ,,,,,,
सेनापती बापट येथे त्यांची एक आठवण सांगतात ,
सावरकर किती धाडसी आणि निर्भय होते ते यावरून कळेल,,,,
सेनापती बापट सांगतात ,

"एकदा सारी मंडळी गप्पा मारता बसली असता आत बॉम्ब बनवला आहेच
तर तो भारता कसा पाठवायचा याचा विचार चालू असतो,,,आणि अचानक
दारात पोलिसांची जीप दारात येवून उभी राहते 
साहजिकच सेनापती बापट विचारतात सावरकर आता हे बॉब कुठे ठेवू?
त्याही परिस्थितीत सावरकर गंमत करतात ते म्हणतात ,
"ठेवा तुमच्या हातात"
पण हि वेळ गमतीची नव्हती पूर्वीच्या लाकडी खुर्च्यांना कापडी खोळ असे
सावरकरांनी ते बॉम्ब त्या खोळात टाकून त्यावर उशी ठवून बसले,,,,,
अशा परिस्थितीत बॉम्ब सापडला तर फाशी हि ठरलेली,,,
आणि सावरकर तर त्या जिवंत बॉम्बवर बसलेले ,,,,,,
लक्षात घ्या काय परिस्थिती झाली असेल त्यांची आणि त्यांच्या मित्रांची ,
लक्षात घ्या पोलिसांना खोट बोलणारा माणूस लगेच कळतो,
पोलीस पाहिल्यावर सर्वसामान्य माणसाला आधी घाम फुटतो,
जिभेला कोरड पडते,ततपप करतो आणि सावरकर शांत निश्चल ,,,,,,,
अगदी काही घडल नाही काही घडणार नाही याची जणू खात्री असल्या सारखे.
बर हे सार कमी म्हणून कि काय हातत नेमक एक बंदी असलेल पुस्तक,,,,,,
पोलिसांनी आल्या आल्या दरडावून विचारले ,
"काय वाचताय ?" त्याही परिस्थतीत न डगमगता न घाबरता ते पुस्तक
पोलिसांच्या डोळ्यासमोर नाचवल घ्या बघा म्हणाले ,,सावरकर
अर्थातच पोलीस समजले या पुस्तकात आक्षेप घेण्या सारख नाही
आणि म्हणाले बर बर ते राहू दे आमच्या कडे तुमच्या घराची झडती घ्यायची आहे
तशी परवानगी आहे आम्हाला समजले आहे येथे बोंब बनवला जातोय,,,?
सावरकर परत न डगमगता म्हणाले घ्या कि झडती कोण अडवतंय?
पोलिसांनी झडती घेतली पण दिव्या खाली अंधार या न्यायने त्यांनी त्या
खुर्चीला हात हि नाही लावला आणि परत गेले माफी मागून
असे होते सावरकर निर्भय आणि धाडसी
क्रमशः ,,,,,,


16 comments:

  1. Great going sirji, please carry on.

    ReplyDelete
  2. Great going sirji, please carry on.

    ReplyDelete
  3. Ajit Damle I have a question about Savarkar: if Godse had tried killing Gandhi ji before 1948, ( as per the evidence) . Then why was he kept as an associate? Even 1 week before killing Gandhi ji that lunatic had met with Savarkar. Any ideas?
    Friday at 4:52pm · Like

    ReplyDelete
  4. Rajesh Ranade ‎Ajit Damle lunatic?
    Friday at 7:03pm · Like

    ReplyDelete
  5. श्रीमंत दामोदर गुरुजी ‎.
    Rajesh Ranade, Nityanand Sumant Bhadra
    lunatic ह्या शब्दाचा अर्थ Wildly or giddily foolish असा आहे, त्यामुळे Ajit Damle ह्यांनी केलेली कमेंट ही Wildly or giddily foolish समजावी.
    Friday at 7:06pm · Like

    ReplyDelete
  6. Ajit Damle
    Yes, a lunatic and a murderer. I was being very kind in saying that he was a lunatic. He had tried to kill Gandhi before 1948 and therefore, his claim that he killed Gandhi because of 55 crore or whatever foolish reason, was a complete distortion of truth. That claim would even make a cat smile. And that Marathi drama was another joke. The only true part in the drama was that Godse brutally killed Gandhi. Everything else was pure moonshine and was embarrassing. And in 1948, if they had done some good detective work, they could have convicted Savarkar also. May be ( and I am speculating here) because of his great sacrifices and hardships, they let him go. In 1964, when they found more evidence, they had no doubt that he was involved. All the info. about the evidence is available on the net. Our Marathi books in general, try to hide the evidence very cleverly.
    Friday at 8:42pm · Like

    ReplyDelete
  7. Sunil Bhumkar
    दामले प्रथम तर तुम्ही मी लिहिलेल्या पोस्ट बाबत विचारलं तर बर दुसर अस कि तुम्हाला गांधी समजवायचे असतील लोकांना तर आधी आधी नथुराम "समजावून"घेतला पाहिजे पण तरीही तुम्ही जर ईतकेच गांधी वादी समजत असला तर सांगा गांधीना मारल्यावर त्याच उत्तर हिंसेने का दिलत ?अहिंसावादी ना तुम्ही सारे भुक्कड पुन्हा असला मूर्खपणा करू नका .आणि हो तुमच्या ईतक माझ विंग्रजी भारी नाय पण मराठी मातुर लय भारी हाय या मराठी बोलाया नाय दोन हात होवून javudet
    about an hour ago · Like

    ReplyDelete
  8. सागर विद्वांस अजित दामले, तुम्ही सावरकरांचा किती अभ्यास केला आहे हे कळायला मार्ग नाही. पण त्यांच्या चरित्राचा आणि साहित्याचा मी जेवढा अभ्यास केला आहे त्यावरुन एवढे निश्चितपणे सांगता येईल की त्यांचा गांधीवधात सहभाग असता तर त्यांनी तो नाकारला नसता.
    37 minutes ago · Unlike · 1

    ReplyDelete
  9. Sharad Vaze Atishay MahitiPurna Lekhamala.. Khup Chhan..
    37 minutes ago · Unlike · 2

    ReplyDelete
  10. सागर विद्वांस १९६४ साली कोणते दिव्य पुरावे मिळाले हे सांगून टाका. सावरकरांना आपण मरणोत्तर जन्मठेप देऊ.
    21 minutes ago · Unlike · 2

    ReplyDelete
  11. सागर विद्वांस सावरकरांच्या त्यागाचा आणि कष्टांचा विचार करून त्यांना सोडून दिलं म्हणे. त्यांच्यावर आरोप केला तेव्हा ही विचारशक्ती काय करत होती?
    14 minutes ago · Like

    ReplyDelete
  12. Sunil Bhumkar तेव्हाही गहाण ठेवली होती आणि आज तर काय विकून वेशीवर टांगली आहे ..
    13 minutes ago · Like · 1

    ReplyDelete
  13. सागर विद्वांस गांधींना मारण्याचे कारण नथुरामजींनी तुमच्या कानात सांगितले आहे का? आमच्याही ज्ञानात थोडी भर घाला.
    11 minutes ago ·

    ReplyDelete
  14. Sunil Bhumkar सागर अरे हेच स्वतः तिथे हजार होते ह्यांनीच तर जगाला ओरडून सांगितले महात्मा?गांधी "हे राम " म्हणाले त्यांच्या कडे त्या वेळच रेकॉर्डिंग आहे .
    10 minutes ago · Like · 1

    ReplyDelete
  15. "राजे मेलात तरी चालेल पण त्या पापी अफझल खानाला गर्दीस मिळवल्या शिवाय
    परत येवू नका ,,,,,,,"
    लक्षात घ्या हे शब्द आहेत एका आईचे ,
    "अरे म्हणून तर शिवाजी घडतो"

    ReplyDelete
  16. आम्ही सावरकरांना समजू शकलो नाही हेच मात्र खरे,किवा या कॉंग्रेस सरकारने नेहमीच त्याच्या तिरस्कार केला,त्याचे कारण सावरकरांचे हिंदू राष्टविश्यी संकल्पना,खरे तर आता गरज आहे,परत एकदा मित्रमेळा संघटना बनवण्याची,व हिंदू धर्म व सावरकरांचे विचार हिंदू युवकांपर्यंत पोच्वनाची.

    ReplyDelete