Sunday, April 17, 2011

कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान

||श्री हनुमंतेय नमः||
समर्थांनी जसा राम निवडला तसाच हनुमाही निवडला ,,,,,
कारण राम हे उपासनेच सामर्थ्य तर हनुमंत म्हणजे साक्षात
सामर्थ्याची उपासना,,,,,,

आणि हे त्यांनी जाणल होत
फक्त रामाची उपासना करून राम कदाचित प्रसन्न होईल हि
परंतु हनुमाताची उपसना म्हणजे सामर्थ्याची उपासना केली तरच
राम राज्य येईल,,,,,,

सज्जन नामाच्या भक्तीने तरतील परंतु संकटे संपणार नाहीत .
आणि तो काळच वेगळा होता आता पर्यंत भक्ताने संकटात पडायचं ,सापडायचं
आणि देवाने त्याला सोडवायचं हाच एक उपक्रम चालू होता
देवाने त्या दुष्टाला शासन केल्याच्या गोष्टीच कुठे ऐकू येत नव्हत्या ,,
आणि म्हणू समर्थांनी या महाराष्ट्रच दैवत थोड बदलायचा प्रयत्न केला ,,,,
तर असा हा हनुमान बालपणी एकदम खोडकर ,,
जन्मल्याबरोबर खोडी काढली तीही सुर्यनारायानाची,
कारण एकच त्यात तेव्हढी शक्ती होती ,तो शक्तीचा उपासक होता ,
मोरोपंत म्हणतात (पराडकर) जे आर्यांसाठी प्रसिद्ध आहेत
१०८ प्रकारची रामायण ज्यांनी लहिली आहेत,
गगनात लक्ष्य गेले ,
केले उड्डाण जनन समयास,
उपमा काय वदावी,?
या ब्रम्हांडात जन न सम या स ,,,,,
रामा रामा हरे  हरे रामा ,
रामा हरे हरे रामा सीता पते रामा
रामा रामा राघोत्त्मा रामा रामा ,
हा जो मारुतीराया आहे ते म्हणतात सार्या ब्रम्हांडात एकच
ज्याने जन्मल्या बरोबर सूर्याला गिळल ,,,,
आज तुमची आमची मुल,,,,,,,,?

जन्मल्याबरोबर भोकाड पसरतात आणि नंतर आयुष्यभर
हे मिळाल नाही ,ते मिळाल नाही म्हणत रडतच राहतात.

पण सूर्याला म्हणजे अशक्यप्राय गोष्टीला धरायचा प्रयत्न तरी करतात का?
हा आत काही शहाणे म्हणतात कि अस कुठे असत का?
कि कुणीही उठतो आणि सूर्याला गिळतो वैगेरे वैगेरे,
अशा शहाण्यांना काय बोलाव ? महत्वाच हे नाही कि
मारुती रायान सूर्य गिळला कि नाही पण त्यासाठी प्रयत्न जरूर केला
अरे म्हणून तर उडी मारताना हनुवटी फुटली हे खर त्याच कौतुक आहे ,
समोर लक्ष्य दिसलं कि सार्या ताकदीनिशी घाल झडप त्यावर हे हनुमंत शिकवतो आपल्याला .
त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो ,
रामराज्य आणायचं असेल तर फक्त रामजप करून चालणार नाही ,
त्याने फक्त रामदर्शन होईल आणि रामराज्य आणायचं असेल तर
भीमरूपी महारूद्रा काय आहे ते आधी समजून घ्यायला लागेल,
त्यासाठी जास्तीत जास्त १२० सूर्य नमस्कार तरी घातलेच पाहिजेत,(१२ चे १० सेट )
कारण शक्तीने मिळती राज्ये
शक्ती नसता भक्तांची विटंबना
कौरवांना संपवायचे असेल तर पांडव फक्त कृष्णाचे भक्त असून नाही चालत
भक्तीने १४ वर्षाचा वनवास घडतो , आणि शक्तीने राज्य,,,,
आणि म्हणून समर्थांनी हनुमान निवडला,,,,,

अशा या हनुमंताला विस्मरणाचा शाप मिळाला होता
त्याला या विस्मरणातून बाहेर जाम्बुवंताने काढले
तसाच तो हिंदू समजला हि मिळाला आहे
त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीवच
नाही
येथे भारतावर ,
शक आले ,हून आले ,बाबर आले,
मुघल आले ,शाह्या पातशाह्या आल्या आणि सारे आम्ही नामशेष केले
नाम-शेष नाव सुद्धा काही उरल नाही त्याचं येथे हिंदुस्थानात.
हा सारा पराक्रम आम्ही विसरून गेलो आहोत. आणि पराक्रमाच विस्मरण
म्हणजेच ईतिहासाच मरण,,,,,,
म्हणून सार्या हनुमान भक्तांना एकच सांगणे आहे,
किती हि मोठा अंधार असला तरी एका पणती मध्ये
उजेड पडायची ताकद असते हे लक्षात घ्या ,
आणि आपल्याला समर्थांनी बाहेर काढाल आहे त्यासाठी हि दोन दैवत
आपल्याला उपासनेसाठी दिली आहेत
भक्तीची आणि शक्तीची हि प्रीतिक आपल्यातल सामर्थ्य वाढवल्याशिवाय राहणार नाहीत.

आज पहा जरा आरशात आपल्याकडे किंवा आपल्या मुलांकडे
पिझ्झा बर्गर खावून कसे फुगलेत कार्टून पाहून कसे कीड मीडे, चीड चिडे झालेत
आई आणि मुलगी यातला फरक काळात नाही ,
बाप कोण मुलगा कोण हे समजत नाही
अहो शिवाजी जन्माला येणार कसा,,,,,,?
पापी औरण्ग्याला संपवणार कोण,,,?
आणि मग महारष्ट्र भवानी उखळात कांडली जाणार तुम्ही बसा बघत.
वरचा हरी खाली येईल आणि हिंदुस्थानला वाचवेल ,,,
त्यासाठी आधी तुम्ही समर्थ असण जास्त गरजेच
त्यासाठी निदान आजपासून किमान १२ तरी
सूर्य नमस्कार घातल्याशिवाय मी जेवणार नाही हे ठरवा
तर आणि तरच
धनधान्य पशुवृध्दि पुत्रपौत्र समस्तही ।
पावती रुपविद्यादि स्तोत्रपाठेंकरूनियां ॥
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंद भीमदर्शनें ॥

ह्याचा प्रत्यय आल्या शिवाय राहणार नाही .







No comments:

Post a Comment