Saturday, November 10, 2018

मोदी साहेब अहो हे प्रसिद्धी च विमान जरा आमच्या दारात येवू दे आमचा ही फोटू पेपरात

आ.मा.
भारतगुजरात सरकारचे
पंत प्रधान
श्री श्रीमान मोदी साहेब

येक डाव परसीदीच इमान
आमच्या दारात झुलू दया

ऐरण की करे चोरी
और
सूई का करे दान
अब देखत है राह कब आये विमान -संत कबीर
अर्थ--खुप मोठ्या मोठ्या चोर्या करायच्या आणि खुप मोठ पुन्य करतोय या अविर्भावात सुइच्या आकाराची वस्तु दान करायची आणि म्हातारपणी वाट पहायची की देव आता मला न्यायला विमान पाठ्वेल कारण
दान करून मी पुण्य कर्म केल आहे
पण हे उदा.खोट आहे की
काय अस वाटू लागलय
कारण वयाच्या 15 वर्षा पासून
मी जिथे राहतो तिथे
मी स्वता झाड़ू मारून आजुबाजुचा परिसर माझ्या परीने स्वच्छ ठेवतो
आणि माझ सोडा हो
संतश्रेष्ठ गाडगे बाबा आयुष्यभर
झाडू मारत जगले
स्वछ्तेतच देव आहे हे ते आयुष्यभर सांगत होते
गांधी बाबा हे स्वछ्तेचे भोकते होते आज आपना सर्वाना माहीत असलेले
श्री प्रकाश बाबा आमटे
यांचे वडिल यानीही गाँधीन कडून स्वछ्तेची प्रेरणा घेत आनंदवन उभारल
आज त्यांची नातवंड ही
हे स्वछ्तेच काम हाती घेवुन फिरत आहेत
पण काल कुठे मोदीने झाड़ू मारला आणि लोकांना आवाहन केल
झाल सचिन सकट सारे सेलिब्रेटी सक्काळी सक्काळी
उठून झाड़ू मारू लागले
आणि या मुडिया वाल्यांना काय झोपा येतात की नाही माहीत नाही सक्काळी सक्काळी हे ही हजर त्यांचे फोटू काढायला
मी माझा उल्लेख अशा साठी
केला मोदी साहेब
अहो हे प्रसिद्धी च विमान
जरा आमच्या दारात येवू दे
आमचा ही फोटू पेपरात
झळकू दे तस आमीबी छान दिसतु एवड बी वाईट वांगाड नाय दिसत...
आन हो आणि आणखी येक़
इंति हाय मोदी सायेब
कारण संघाचे हात म्हणून ..
एक इंति हाय समद्यास्नी
स्वछ्तेचे महत्व पटवून दिलत
त्यासाठी गंगा किनारी
जावून स्वता हातात फावड़ा घेलात
..
अता इरोधक हलकटच वो त्यानी लगेच बोलले हे रात्रि कचरा टाकतात आणि सकाळी जावून उच्लतात ..
पण तुमि नका लक्ष देवू
फकस्त एक इंति हाय
लोकास्नी जसा जसा झाड़ू उचलायला सांगितला आणि लोकानी (शेलिब्रेटी)लगेच
उचलला सुधा आन सावरकरांच तर सपान हाय परतेक घरात किमान येक सैनिक झाला पायजेल
मोदी सायेब तुमच्या मुळ फकस्त तुमच्यामुळ लोकांना स्वाच्छतेच महत्त्व कळल हाय
जरा ज्या हातांना झाड़ू उचलायला सांगितला त्याना जरा बंदुका बी उचलायला सांगा
लय गरज हाय वो त्याची
आपला
सलग 36 वर्ष
झाड़ू मारून स्वच्छता राबवनारा
सौनिक शिवसैनिक
भुमकर
सुनील प्रभाकर भुमकर

No comments:

Post a Comment