||श्री नथू रामाय नमः ||
आज काल कर्नाटकात बरेच ठिकाणी बोर्ड लावलेत ,
"कन्नड बोलाल तर काम लवकर होईल"
याचाच अर्थ
"याद राखा मराठी बोलाल तर काम होणार नाहीत"
असाच होतो बरोबर ना,,,? नाही माझ मराठी जरा कच्च आहे.
असो ,,,,
आमच्या गावी हे नाही आम्ही सण साजरे करण्यात मश्गुल....
आज सगळीकडी महाराष्ट्रात (खरतर हे खूप धाडसाने बोलतोय)
मराठी भाषा दिन साजरा झाला.
कारण जो पर्यंत बेळगाव कारवार सह सीमाभाग महाराष्ट्रात येत नाही
तो पर्यंत महाराष्ट्राला मराठी भाषा दिन
साजरा करायचा निदान कुठल्याही पक्षाला तरी नैतिक अधिकार नाही.
मराठी भाषा दिन साजरा कारण म्हणजे सीमावासीयांच्या
जखमेवर मीठ चोळण्या सारखा आहे.
येथे मराठीचे झेंडे नाचवायचे ब्यानारबाजी करायची
स्वतःचे फोटू छापून घ्यायचे,
कुसुमाग्रजांच्या, सुरेश भटांच्या त्यावर ओळी त्यांना न विचारता लावायच्या .
जात पंथ धर्म एक मानतो मराठी काय नि काय?
सब घोडे बारा टके,,,,
बरोबर ना,,,? नाही माझ मराठी जरा कच्च आहे.
आज नेमक सीमा भागाची अवस्था आहे?
लोकशाहीची संकल्पना जगभर रुजत असताना
नेमकी सीमाभागात मराठी लोकांची राजरोस पणे सर्वच ठिकाणी गळचेपी केली जात आहे .
आणि महाराष्ट्र सरकार ,विरोधी पक्ष, केंद्र सरकार याकडे गांभीर्याने पाहायला तयारच नाहीत?
सर्व सरकारी कार्यालये, कागद पत्रे यांचे पद्धतशीर कानडीकरण केले जात आहे ,
मराठी कार्यकर्त्यांवर खुनासारखे गंभीर आरोप ठेवू त्यांना देशोधडीलीला लावले जात आहे,
२००४ नंतर तर यात आणखीनच वाढ झाली आहे कारण
महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला ,
बेळगाव हे कर्नाटकाचे आहे हे भासवण्यासाठी त्याचे
"बेळगावी "असा नामांतर करायचा असफल प्रयत्न झाला,
उपराजधानीचा दर्जा, विधानभवन ,
ब्रिटीशांच्या राजवटीत बेळगाव प्रांतांचा कारभार मराठीत चाले,
आज हि १९५६ च्या आगोदारची नोंदी मराठीतच आहेत ,
१९५६ नंतर कर्नाटक निर्मिती झाली
१९६१ पासून कन्नड आणि मराठी सर्व व्यवहार दोन भाषेत करू लागले .
आणि आता १९८३ पासून हा सारा व्यवहार कागद पत्रे
कानडीतुनच मिळतात .
पूर्वी दुकानाचे बोर्ड हि मराठी कानडी असत
आता केवळ कानडी,,,,,,
आणि वर सांगितल्या प्रमाणे आता कर्नाटकात
जागो जागी फलक लावलेत
" कानडीत बोलाल तर काम लवकर होईल"
मराठी कागद पत्राला सरळ केराची टोपली दाखवली जाते.
कायदा काय सांगतो,,,,,,,?
जर एखाद्या विशिष्ठ भागात एकच भाषा बोलणार्यांची संख्या
१५%हून जास्त असेल तर,,
त्यांना त्यांच्या भाषेत सरकारी कागद पत्रे उपलब्ध व्हावीत.
महसूल ,न्यायालये हि त्याच भाषेत चालवावी,
असा निकाल केद्र आणि राज्य ने मिळून दिला आहे.
आणि सीमा भागात मराठी बांधव तर ५०%च्या वर आहेत .
आणि तरीही अन्याय ?
बरोबर ना,,,? नाही माझ मराठी जरा कच्च आहे.
कानडी आली तर छोकरी तर नोकरी
एव्हडी वाइट अवसथा आहें गेली कित्येक वर्षे
तिथले मराठी महाराष्ट्रात येवू पाहत आहेत .
ते ही मराठीच आहेत .
महारष्ट्र एकीकरण समिति
मराठीच्या न्याय हक्का साठी लढतेय
कुणी आजन्म
लग्नच करनार नाही अशी शपथ घेतलीय ..
कुणी पायात चप्पल घालणार नाही..
कोण दाढ़ीच करणार नाही..
कुणी गोड खाणार नाही ..
एक ना अनेक तर्हेने ते
कानडी सरकारचा निषेध करत आहेत
लढा देत आहेत पण,
म्हनुनच मला इथे कविवर्य ;-मगेश पाडगावकरांची कवीता सांगावीशी वाटते....
चीडत का नाही इथली माणसे ?
चीडत का नाही इथली माणसे ?
कढत का नाहीत इथली माणसे ?
थंड प्रेता सारखी वस्ति दिसे ,
उठत का नाही इथली माणसे?
कोंडलेला धुर न बाहेर येइ,
जळत का नाही इथली माणसे?
मध्यरात्री, क्षीण कंकाली फूटे ,
रडत का नाही इथली माणसे?
दानडग्यांची थाप येइ दारावरी,
धजत का नाही इथली माणसे?
दहशतीच्या सर्व येथे खुणा,
भिड़त का नाही इथली माणसे ?कविवर्य ;-मंगेश पाडगावकर
बरोबर ना,,,? नाही माझ मराठी जरा कच्च आहे.म्हणून मला वाटत हि पोक्त लोकशाही आपण किती सहन करणार ?
उद्या आपलीच पोर आपल्याला ईतक सार चालल होत
आणि तुम्ही गप्प बसून
लोकशाहीचे गोडवे गात होता?
आणि आमच्या कडून ती मराठी जपली जावी अशी अपेक्षा धरता ?
तुमच्या सारख्या मुलांपेक्षा आमची मराठी
वांझोठी असती तर बर झाल असती हो कारण,,,,,
नालायक कार्ट असण्या पेक्षा वांझोट असलेल बर नाही का?
बरोबर ना,,,? नाही माझ मराठी जरा कच्च आहे.
Prasad Karkare दहशतीच्या सर्व येथे खुणा,
ReplyDeleteभिड़त का नाही इथली माणसे ?
14 hours ago · Like
जय महाराष्ट्र ! नेट वर फिरता फिरता. आपला ब्लॉग अचानक समोर आला. आपले लिखाण खूप आहे. मला आपल्या लिखाणात काही वेगळेपणा जाणवल नाही कारण अस वाटतय कि मीच हे सगळ लिहील आहे. तुम्ही जे लिहित आहे ती माझीच मत आहे अस मला वाटत आहे. आणि म्हणून मग जेव्हा मी तुमची प्रोफाईल बघितली तेव्हा मला कळल कि तुम्ही पण एक शिवसैनिक आहात. मी पण फेसबुक वर आणि ओर्कुटवर लिहायचो आणि आता पण लिहित आहे. आणि सध्या एक ब्लॉग पण सुरु केला आहे. http://meeeshivsainik.blogspot.com
ReplyDelete