Wednesday, February 23, 2011

सचिन चालीसा

मा. राज साहेब 
मर्हाटी हृदय सम्राट, 
आज आपणहि सचिन चालीसाचा पाठ पढलात .
कि सचिनला जिम बांधायला मी मदत करेन
प्रसंगी मी सर्वपक्षीय मदत घेईन,

ईतरांची अनधिकृत काम दिसत नहीत का ?
अगदी बाह्या वैगरे सरसावून तो चालीसा पढला ईतका कि मला
जंजीर सिनेमातील अमिताभची आठवण आली तो हि शशी कपूरला बोलतो
"जाव पहले उस आदमीका
साईन लेके आव जिसने मेरे हात पे लिख दिया
मेरा बाप चोर है मै चोरी करना छोड दुंगा",,,,,,,,,,,
राज साहेब आपणास एक विनंती आहे
आपण सचिनला जशी जमेल तशी मदत जरूर करा

पण केवळ ३०० चौरस फुटासाठी,,,,?
 तुम्ही ताकद
पणाला लावावीत ईतके तुम्ही लहान नाही आहात
तुम्ही महाराष्ट्र मागवा आणि आम्ही तो मिळवून द्यावा आपली ईतकी मोठी योग्यता आहे 

पण ते सर्वपक्षीय वैगेरे जे काही बोललात ते जर जमल तर
जरा बेळगाव कर्नाटक सीमा प्रश्न बाबत बोललात तर खूप
बरे होईल असे वाटले म्हणून ,,,,,,,,हा सारा प्रपंच,
आपनात ती ताकद तो करिश्मा आहें केवळ म्हणून ,,,
आपण शपथ घ्या सर्व पक्षांच्या मदतीने
मी ,,
"सीमा प्रश्न सोडावेंन त्यात भाग घेइल"
"त्यासाठी मी जिवाच रान करेन"
मग बघा अवघा महाराष्ट्र तुमच्या साठी जिव देइल
ही लोकप्रियता आपल्या दैवाताने अनुभवली आहें
राजशेखर रेड्डीन्च्या तोडीस तोड़
आपणही ही लोकप्रियता मिळवाल
केवळ आपणास हे शक्य आहे.
बाकि सगळेच ,,
फुढारी ,,कर-नाटक ,कर-नाटक 
असा खेळ खेळत आहेत.
का सीमा वासी मराठी नाहीत?
की केवळ ते तुमचे मतदार नाहीत
म्हणुन काही नाही ?
हे असल बेगडी प्रेम कोंग्रेस वालेच करू जाने
खरतर राज्य आल्यावर च नव्हे तर
राज्य जरी नाही आल तरी आम्ही ,,
सीमा प्रश्न सोडवू त्यासाठी लढा देवू ,
प्रसंगी तुरुंगात जावू,
(उपकार म्हणुन नव्हे,, 
ह्या लढयाला आपापल्या पध्हतिने मदत करणे
महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचे हे काम आहें
अत्त्यंत सनदशिर मार्गाने हा लढा चालू आहें
गिनीज बुकात नाव जाव असा लढा आहें हा.)
पोतडी उघडली तर बरच काही ,,
पण वानगी दाखल काही अगदी ताज ,,
"२००९ येडीरुप्पा सरकारने मराठी भाषिकांच्या
नाकावर टिच्चून कर्नाटक सरकारने
विधान सभेचे अधिवेशन बेळगावात घेतले....
मराठयानी विरोध करताच,
लाठ्या काठ्या नी बडवले गेले...
तुरुंगात डांबले ,
अनन्वित अत्याचार केले...
खोट्या केसेस दाखल केल्या...
धरपकड़ केली..
काय नाही केले ?,,
आणि आम्ही,,?
हो आम्ही केले ना या गोष्टीचा निषेध
या पलिकडे काय करू शकतो ?
उद्धव साहेबानी लगोलग इशारा दिला ,,
"येडीरुप्पा यांना महाराष्ट्रत
पावुल टाकू देणार नाही ,,
काय झाले ? काही नाही.
(आणि त्याना तरी कुठे यायचे आहें महाराष्ट्रत ?)
आणि येतील तेव्हा परत,,
आम्ही करनारच की निषेध?
कमळा बाईशी युति तोडू काय झाल?
बस झाल आता हे इशारे इशारे खेळण  ,,
आता कृति हवी.....
बेलगाव, कारवार ,
धारवाड़, बीदर ,भालकी इत्यादी
मराठी मुलखात कानडयानचे     
अत्याचार चालतात
कानडी आली तर छोकरी तर नोकरी
एव्हडी वाइट अवस्था आहें गेली कित्येक वर्षे
तिथले मराठी महाराष्ट्रात येवू पाहत आहेत .
ते ही मराठीच आहेत .
महारष्ट्र एकीकरण समिति
मराठीच्या न्याय हक्का साठी लढतेय
कुणी आजन्म
लग्नच करनार नाही अशी शपथ घेतलीय ..
कुणी पायात चप्पल घालणार नाही..
कोण दाढ़ीच करणार नाही..
कुणी गोड खाणार नाही ..
एक ना अनेक तर्हेने ते
कानडी सरकारचा निषेध करत आहेत
लढा देत आहेत पण,
महाराष्ट्राने म्हणावी तशी साथ नाही दिली.
आज कर्नाटकात भा.ज.पा.चे सरकार आहें.
शिवसेनेच्या पाठिमब्यावर महाराष्ट्र आणि केंद्र
दोहोत सत्तेचा वाटा भोगला पण सीमा प्रश्नी मात्र हा प्रश्न
राष्ट्रपतीं च्या मदतीने हा प्रश्न सोडवावा
असा सल्ला भा.ज.पा. देते ,,,वा रे वा
या बदमाशिला तोड़ नाही .
राज साहेब मराठीच्या मुद्द्यावर एक आपणच
आहात जे ठाम मत मांडत आहात
राज साहेब पुन्हा एकदा विनंती आहें ,
तुम्ही या महाराष्ट्राचे ,,
"राजशेखर रेड्डी व्हा"
बेळगाव कारवार सह सारा सीमा प्रदेश
महाराष्ट्रत विलीन होइल अस पहा.
साहेब एव्हड कराच अहो असे १००
राजशेखर रेड्डी जरी खाली आले तरी ,,
तुमच्या गाठी जमालेल
पुण्य   हिरावून घेवू शकणार नाहीत .
एव्हड़ कराच आई भवानी  आपणास उदंड आयुष्य देइल

1 comment:

  1. facebook
    Hi Sunil,
    Brijesh Joshi commented on your note "सचिन चालीसा".
    Brijesh wrote: "khup sundar."

    See the comment thread

    ReplyDelete