Saturday, April 14, 2012

मालेगावी बोलबच्चन आणि नि-तीस्मारखा

यांच्या चरणी
सप्रेम जय महाराष्ट्र जय बिहार ,,,
कालच मालेगावात श्रीमान राजसाहेब ठाकरे
डरकाळले मी बिहारी दिन होवू देणार नाही
आणि आज त्यांची मांजर झाली.
नीती-ने राज-गड करी घेतला कि काय ?देव जाणे...
पण काही असो,
राजठाकरे यांच्या कडून अपेक्षित असा विरोध झाला नाही हे खर ,
पण त्यानिमित्ताने काही प्रश्नांचा गुंता पडला ,,
नितीश कुमार आणि राज साहेब याची उत्तर देतील काय?
???????????,,,
नितीश कुमार तुमची गरज महाराष्ट्रात आहे कि बिहारात ?
१०० वर्षे बिहारला झाली आणि त्याचा महोत्सव महाराष्ट्रात?
काय संबंध?
बर ईथे महाराष्ट्रात कुणीही याव आणि भैया बिहारी दिन साजरा करावा
या साठी महाराष्ट्र आंदण दिला आहे काय?
काय संबंध?
उद्या याच न्यायान महाराष्ट्र दिन बिहारात साजरा होईल काय?
काय संबंध?
असाच महाराष्ट्राच्या मुख्य मंत्र्यांना बोलावलं जाईल काय?
काय संबंध?
जो न्याय राज ठाकरे सीमावासियांना लावतात तोच न्याय
बिहार्याना काय नाही लावत ?
काय संबंध?

हे नितीश कुमार नरेंद्र मोदींना निवडणुकीच्या काळात बिहार बंदी करतात आणि महाराष्ट्रात यायला मला विसाची गरज नाही अस म्हणतात हे अजब नाही का?मग महाराष्ट्रात कशाला येतात?
काय संबंध?
ईथे आम्ही आमची राजकीय ताकद नाही दाखवत आम्ही
सर्वसामान्य माणसां प्रमाणे हा दिन साजरा करणार -नितीश कुमार
मग नितीश कुमार तुम्ही सर्वसामान्य आहात काय?
काय संबंध?
ईतकच पुळका असेल ईथेच बिहार दिन साजरा करायचा
तर सामान्य माणूसच पाठवा ना ?राजकीय ताकद असलेले
तुम्ही कशाला ?
काय संबंध?
१०० वर्षे बिहारला आणि त्याचा महोत्सव महारष्ट्रात याच तर्कटच मला
लक्षात येत नाही,ह्या असल्या आणि साऱ्या कार्यक्रमातून
आपली ताकद दाखवायची असते सिध्द करायची असते हे राज साहेबाना माहित नाही का?
त्यासाठी हा सारा खटाटोप असतो हे सांगायला हव काय?
राज साहेब तुम्हाला समजावले तुमची समजूत घातली
कि झाले काय उलट ते आपल्याला च्युतीया बनवतात हे लक्षात येत नाहि काय ?
उलट यातून सुप्त संदेश जातो "ये महाराष्ट्र के नेता को
बस मिठा बात करो और च्युतीया बनाव"आणि गेली ६० वर्षे ते हेच करत आले आहेत
जय जय महाराष्ट्र माझा गाण वाजवल म्हणजे झाल काय?
आणि हे गाण वाजवा म्हणून कोणी जबरदस्ती केली आहे का?
हे गाण वाजवल म्हणजे त्याचं
महाराष्ट्र प्रेम सिध्द होत का?
अरे हे तर लहान मुलाला लोलीपॉप दाखवल्यासारख झाल?
खरतर बिहार दिनात जय जय महाराष्ट्र गाण वाजवण
म्हणजे एकाच वाटीत मटन-श्रीखंड खाण्यासारखा आहे
लक्षात घ्या,,
ते बिहार दिन ईथे साजरा करू ईछितात कारण
बिहार पेक्षा त्यांची संख्या जास्त झालीय,,,
आज त्यांचे काका मामा चुलते,मालते सारे ईथेच आहेत
आज ते गावाहून ईथे आपल्या नातेवाईकांना भेटायला येतात,
आणि मुंबईतून कमावलेला पैसा पोहचवण्यासाठी ते गावाला जातात.
कृपाशंकर,संजय निरुपम,अबुआझ्मी,मायावती हे त्यांचे आदर्श आहेत,,,
आज ते लंग्न करायला गावाला जात नाहीत
तर त्यांच्या लग्नाला हजर राहायला लोक येतात ,,
बर मुली सुद्धा त्यांना मुंबैईच्याच पाहिजेत,,
"यूपी का छैला और बंबई कि लैला"
हे त्याचं घोष वाक्य आहे,,
तेव्हा या बेगडी प्रेमाचा वेळीच पर्दाफाश करा
तेव्हा नितीश कुमार
बिहारात महारष्ट्र दिन साजरा करून मग त्यात
जय जय महारष्ट्र हे गीत वाजवा,,,,
बघू मग पुढच्या वेळी निवडून येताय का ते?

आणखी  जाता जाता 
उद्या भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाली तर 
तो स्वातंत्र्याचा महोत्सव काय पाकिस्तानात साजरा करणार?
आणि पाकिस्तान काय करू देणार?
का पाकिस्तान ने ईच्छा व्यक्त केली आमचा स्वातंत्र्यदिन ईथे साजरा 
करू द्या सारे जहासे अच्छा ,,,हे गीत वाजवू ,,
द्याल परवानगी????

8 comments:

  1. Mahesh Kulkarni घाव घालायचा म्हणजे घालणारच. अर्थातच शिवसेना
    ती शिवसेनाच! तिचे पाणीच वेगळे व बाणाही वेगळा!
    23 hours ago · Like

    ReplyDelete
  2. मनाली मंगेश गुप्ते बिहार 'दिना' समोर मनसे 'दीन' काय झाल "बिहार दिन" उधळून लावण्याच्या बाता मारणारे अचानक शांत झाले?...चक्क नितिश कुमार यांच्याशी संवाद साधून माघार घेतली..नितिश यांनी देखिल महाराष्ट्राच्या पावन भुमिला वंदन वगैरे करावयास येत असल्याचे जाहिर केले...कमाल आहे बुवा इतका अमुलाग्र बदल घडू शकतो ?आश्चर्य आहे . अशीच मनसे अध्यक्षांसारखी तथाकथित समजूतदारपणाची भुमिका शिवसेने घेतली असती तर लगेच सेनेला झालय तरी काय?....................वाघाची शेळी झाली का?...........................नितिश पुढे उद्धव यांनी नांगी टाकली!.........या मथळ्यांखाली महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख वृत्तपत्रातून दावणीला बांधलेल्या स्वत:ला बुद्धिवंत(?) म्हणवणार्‍या पत्रकारांनी स्वत:चा सेना द्वेषाचा कंडू शमवत संपादकिय प्रसवले असते आणि वृत्तवाहिन्यांनी याच विषयांवर कर्ण कर्कश आव्हाड ,पल्हाळ लावणारे चांदोरकर,प्राज्ञपंडित केतकर ,उद्धट रामकदम किंवा शिरिष पारकार यांना गोळा करुन चर्चासत्र घडवली असती...
    मनसे अध्यक्ष राज यांनी अश्याप्रकारे एकदम शांत होण्याचे कारण नक्की काय असावे?....२०१४ च्या सार्वत्रिक निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जर भाजपाने जेडीयु अध्यक्ष व मनसे अध्यक्ष या दोघांना भविष्यात राष्ट्रिय लोकशाही आघाडीच्या गोटातच यावे लागणार असल्याची जाणिव करुन दिली असेल आणि याचाच परिपाक म्हणून जर दोन्ही नेत्यांनी सांमजस्याची भुमिका घेतली असेल तर उत्तमच आहे.....शांत झाले ते एका अर्थी चांगलेच झाले कारण नाहीतरी आता त्याच त्याच चावून चावून चोथा झालेल्या विषयांवर विचार करण्यात जनतेला देखिल स्वारस्य उरलेले नाही......इथे युपिएचा हिंदुस्थान लुटिचा एककलमी कार्यक्रम कसलेही विघ्न न येता सुरु आहे...सगळ्या संवैधानिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या युपिए सरकारला कुणी पुढे येऊन जाब विचारणारे नाही...गांधी घराण्याची चाकरी करण्यात धन्यता मानणार्‍या देशातल्या सगळ्या बुद्धीवाद्यांनी देशाच्या पाळण्याची दोरी सोनियादेवींच्या हाती देत त्यांना देश लुटीचा खुला परवाना दिला आहेच्....आमच्या मनसे आणि सेना अध्यक्षांना भ्रष्टाचारावर बोलण्यास वेळ नाही ....ज्या मराठीचा उदो उदो करत पहिला मराठी राष्ट्रपतीचा मान मिळावा म्हणून अगदी प्रतिभावान असलेल्या प्रतिभा पाटील यांना सेनेने मतदान केले त्याच प्रतिभा पाटील यांनी जमिन घोटाळा करत स्वत:च्या निवृत्तीनंतर निवासाची सोय करण्यासाठी सैन्यदलाचीच जमिन घशात घालण्याचा पराक्रम केला.या आणि यासारख्या देशापुढे असलेल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याची तसदी दोन्ही सेनांचे अध्यक्ष घेत नाहीत ..आंम्ही फक्त राजकारण करणार मराठीचे ,स्वाभिमानाचे, अभिमानाचे बाकी देश गेला खड्डयात आंम्हास काय त्याचे?
    आताशा खरच लाज वाटू लागली आहे महाराष्ट्रीय असल्याची आणि स्वत:ला मराठी म्हणवून घेण्याची...
    22 hours ago · UnlikeLike · 2

    ReplyDelete
  3. मंदार संत पण गर्जने नंतर "म्याव" केल्यासारखे वाटले..हेही खरे...

    ReplyDelete
  4. Gurunath Mayekar barobar aahe marathi mansa

    ReplyDelete
  5. कोणी एखादा नेता आपल भलं करेल या आशेवर मराठी माणुस का बरं विश्वास ठेवतो.सर्वसामान्य गरीब परप्रांतीय माणसाच्या कानाखाली लावुन महाराष्ट्राच भलं होणाए आहे का?. विचार,आचार आणि कृती यात सुसंगती असणार नेतृत्व आजतरी दिसत नाही. खुप चांगल लिहील आहेस सुनिल.... नेहमी प्रमाणेच... असाच लिहीत रहा. जय महाराष्ट्र जय मराठी.

    ReplyDelete
  6. कोणी एखादा नेता आपल भलं करेल या आशेवर मराठी माणुस का बरं विश्वास ठेवतो.सर्वसामान्य गरीब परप्रांतीय माणसाच्या कानाखाली लावुन महाराष्ट्राच भलं होणाए आहे का?. विचार,आचार आणि कृती यात सुसंगती असणार नेतृत्व आजतरी दिसत नाही. खुप चांगल लिहील आहेस सुनिल.... नेहमी प्रमाणेच... असाच लिहीत रहा. जय महाराष्ट्र जय मराठी.

    ReplyDelete
    Replies
    1. Prashant Naik commented on your post in हिंदुरुदय सम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख माननीय - बाळासाहेब ठाकरे.
      जय महाराष्ट्र ! सुनील भूमकर एकदम मस्त ! आणि...
      Prashant Naik 12:02am Apr 15
      जय महाराष्ट्र ! सुनील भूमकर
      एकदम मस्त !
      आणि तुमच एक वाक्य खूप आवडल ."नीती-ने राज-गड करी घेतला कि काय ?देव जाणे..."

      Delete
  7. Omkar Thakar commented on your post in SHIVSENA MAHARASHTRA.
    JAY MAHARASTRA
    Omkar Thakar 11:07pm Apr 15
    JAY MAHARASTRA

    ReplyDelete