Thursday, August 4, 2011

लोकपाल ते लाचपाल व्हाया नोटेची पुंगी

||श्री नथू रामाय नमः ||
सध्या महाराष्ट्रात कसाब आणि अण्णा हजारे दोनच हिरो आहेत
जरा कुठे खुट्ट झाल कि लोक लगेच बाह्या सरसावून पुढे येतात .
आणि तावातावाने बाजू मांडायचं जणू कंत्राट आपल्यालाच दिल
आहे अशा आवेशात असतात आणि बराच काही करायचं नसत किल्ला
अण्णा हजारे लढवणार आम्ही मात्र ईकडे मिस्स कॉल केला मेणबत्या त्या हि फुकट
पेटवल्या कि आमची देशभक्ती साजरी होते ,,,,
कसबाला फाशी द्या म्हंटल कि पेपरात फोटू छापून येतो ,,
ठीक मी समजू शकतो आपण सारे अण्णा हजारेन बरोबर
उपोषणाला दिल्लीला नाही जावू शकत पण,,,,,,,,,
त्यांच्या वतीन येथे मुंबईत ,कुणी पुण्यात,
वाईत सातार्यात, कोकणात,मालवणात ,गोव्यात
जिथे राहत असू तिथे तर उपोषणाला तर बसू शकतो,,,,,,,,,,?
पण नाही आम्ही पुन्हा एकवार सिध्द केल
शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्याच्या घरात ,,,
आपल्या घरात हि ब्याद नको,,,,,,
ज्या उत्स्फुर्तपणे कुठल्याही नेत्याची मदत न घेता जर
क्रिकेट साठी भारत आठवडा भर बंद राहू शकतो तर
तर भ्रष्टाचार हि तर कीड आहे समाजाला लागलेली ती समूळ
उपटण्यासाठी आपण तयार व्हायला नको,,,,,,,,?
का अण्णा हजारेंची गरज आपल्याला लागते?
आणि लागत असेल गरज तर त्यांना पाठींबा
देण्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांना पाठींबा देण हे
आपल नैतिक कर्तव्य नाही,,,,,,,,?
अण्णांनी घेतलेला प्रश्न हा तुमचा नाही,,,,,,?
एक व्यक्ती आम्हा सर्वसामान्याचे जीवन भ्रष्ट्राचामुक्त
व्हावे म्हणून उपोषणाला बसणार आहेत .
इथे घोटाळ्यांवर घोटाळे होत आहेत पण आम्ही मात्र
अजूनहि विश्व कप जिंकल्याच्या धुंदीत आहोत.
पण आज १० रु ची बाजरी ४० रु वर गेली तरी त्याची झळ आम्हाला लागत नाही.
इथे शहिदांच्या, सीमेवरच्या जवानांच्या बलिदानाचा विसर पडत आहे पण,,,,,,,,
पण आम्हाला वाटते कि खेळाडूंनी आपली प्राणाची बाजी लावून विश्व कप जिंकला.

आम्हाला येथे कुणीतरी सतत आमच्यासाठी लढाव हीच अपेक्षा
प्रत्येक भारतीयाच्या मनात असते आणि याला कंटाळून आता
देवानेही अवतार घ्यायचं सोडून दिल आहे हेच आमच्या लक्षात येत नाही
आणि प्रत्येकात देव शोधात बसतो,,,,,,,,,
ब्रिटीश राज्यकर्ते ह्या उपोषणाच्या गांधी मार्गाला वचकून होते
तो काळ वेगळा होता त्यांना कल्पना होती आपण या देशाचे मालक नाही
परंतु आज देश आमच्या मालकीचा आहे आम्ही हव ते करू शकतो .
आणि तो गांधी मार्ग हि आमचाच आहे त्यावर चालायची
ऐर्यागैर्याला परवानगी नाही ,,,,,,,मग,?
आहेतच दांडूके आणि अश्रुधूर आणि सोयीस्कर दुर्लक्ष
दुर्दैव हेकी आजही याच गांधी मार्गाची कास धरणार्यांना कळू नये?
तेव्हा मित्रानो येथे परत एक गोष्ट सांगावीशी वाटते ,,,,,,,
छत्रपतींच्या निधनानंतर आणि शंभू राजांना
मारल्यावर हि पापी औरंग्याने हा महाराष्ट्र
परत एकदा गिळकृत करायचा प्रयत्न केला
पण त्यात हि यशस्वी झाला नाही
छत्रपती नसतानाही येथल्या जनतेने त्याला कैक
वर्षे झुंजवत ठेवले ,,,,,,,,,,,,,,कारण त्या सार्या जनतेला
वाटत होते हे राज्य आपले आहे त्या मुळे महाराज, शंभूमहादेव  नसताना हि
त्याचं नेतृत्व नसताना हि औरंग्या महाराष्ट्र ताब्यात घेवू शकला नाही ,,,,,,
म्हणूनच आज जर हि भ्रष्टाचाराची कीड नाहीशी करायची
असेल तुम्हाला त्याची गरज वाटत असेल तर ती प्रथम
स्वतः पासून सुरवात करा
ठरवा मी आज पासून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही ,
त्याला खत पाणी घातलं जाईल अस वर्तन करणार नाही ,
बस्स या साठी कुठला हि मोठ आंदोलन करायची गरज नाही आणि
हजारेन सारख्या  निस्पृह व्यक्तीना वेठीस धरायची गरज उरणार नाही,
ता. क. -----प्रिय अण्णा,,,,,
स.न.वी.वी.
आपणास कळकळीची विनंती आम्ही भारतीय खूप नालायक आहोत.
आपण जन लोकपाल बिलासाठी भांडत आहात त्यासाठी
पुन्हा उपोषणाला हि बसणार आहत.
पण आम्ही सचिनला भारतरत्न कसे मिळेल यासाठी रस्त्यावर
उतरायला तयार आहोत.
पण लोकपाल बिलाला पाठींबा देण्यासाठी आम्ही
रस्त्यावर उरू शकत नाही.,,,,,पण आम्ही
रस्त्यावर उतरू ते लाचपाल आणणार असाल तर ,
कारण आम्ही ते साप आहोत जे नोटेच्या पुंगीवर डोलतात.



4 comments:

  1. लोकपाल बिलाला पाठींबा देण्यासाठी आम्ही
    रस्त्यावर उरू शकत नाही.,,,,,पण आम्ही
    रस्त्यावर उतरू ते लाचपाल आणणार असाल तर ,
    कारण आम्ही ते साप आहोत जे नोटेच्या पुंगीवर डोलतात.

    ReplyDelete
  2. आपणास कळकळीची विनंती आम्ही भारतीय खूप नालायक आहोत.
    आपण जन लोकपाल बिलासाठी भांडत आहात त्यासाठी
    पुन्हा उपोषणाला हि बसणार आहत.
    पण आम्ही सचिनला भारतरत्न कसे मिळेल यासाठी रस्त्यावर
    उतरायला तयार आहोत.
    पण लोकपाल बिलाला पाठींबा देण्यासाठी आम्ही
    रस्त्यावर उरू शकत नाही

    ReplyDelete
  3. नमस्कार सुनील साहेब,
    विचार पटले, आपण बसणार आहात का उपोषणाला १६ तारखेला?

    ReplyDelete
  4. मी येथे मुंबईत आणि माझे वडील दिल्लीला जाणार आहे माझे वडील (बाप ) उपोषणाला पाठींबा द्यायला अण्णांना

    ReplyDelete