Thursday, August 18, 2011

मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी,,,

||श्री नथू रामाय नमः||
अर्थात एका मुंगीचे महाभारत,,,
१४ तारखेला माझा बाप(वडील) 
श्री. अण्णा हजारेंना पाठींबा द्यायला गेले आहेत.
रोज फोन येतात बोलून बोलून त्यांचा घसा बसलाय
पाण्या पावसाची तमा न बाळगता माझा अपंग बाप
अण्णांच्या खांद्याला खांदा  देवून पाय रोवून उभा आहे.
चार दिवसात अनेक नग भेटले माझ्या वडिलांची चौकशी करण्याच्या निमित्ताने..
अण्णांच्या बाजूने बोलणारे भेटले आणि विरोधात हि बोलणारे भेटले
खास त्यांच्यासाठीच जे अण्णा विरोधक आहेत आणि अण्णा समर्थकांसाठी हि ,,,,
अण्णांच्या मागे कुठलाही पाश नाही ,
हे आंदोलन त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी नाही ,
न कि नाव कमावून काही ईस्टेट कमवायची आहे त्यांना,
हे आंदोलन तुमची आमच्या मुला बाळांच्या उज्वल भविष्यासाठी आहे .
अण्णांना तर मुल बाळ हि नाही,
मघाशी निरमाची जाहिरात पहिली
वेगाने धावणारी एमब्युलांस  चिखलात अडकते
पेशंटला घेवन जाणे गरजेचे असते पण,,,,,,,,,,,
सारेच त्या चिखलात अडकलेल्या गाडी कडे बघत राहतात
कुणी कुणी तर ,गाडीचे चक फिरताना अंगावर चिखल
उडाला म्हणून नाक हि मुरडत असतात,,,,,
काही महाभाग त्याच वेळी त्या चिखलात रुतलेल्या गाडीचे
चित्रीकरण करण्यात मग्न असतात, ,,,,,,
आणी त्याच जमावातून चार तरुणी बाहेर येतात
चिखलाची तमा न बाळगता आपले कपडे खराब होतील याची काळजी न करता.
त्या एमब्युलांसला धक्का देवून बाहेर काढतात आणी बघणाऱ्यांची तोंड
काळी ठिक्कर पडतात,,,,,,,,,
आज अण्णा नेमक हेच काम करायला उतरले आहेत
ती एमब्युलांस म्हणजे आपला भारत देश
त्यातील जखमी माणूस म्हणजे
भ्रष्टाचाराने पिचलेला , नागवला गेलेला माणूस,
आणी तो चिखल म्हणजे
भारतीय राजकारण आणि राजकारणी ,,,,,
मोठ्या समर्थ पणे अण्णांनी त्या लोकशाहीचा टिळा लावलेल्या गाडीच
हॅंडेल पकडलं आहे ,,,,,,,,,,आता गरज आहे ती
तुमची तुम्ही हे आंदोलन पुढे न्यायाची त्यांना पुढे न्यायला साथ द्यायची
त्या चार तरुणी जशा आपले कपडे खराब होतील याचा विचार न करता
जशा पुढे आल्या तसेच तुम्हाला पुढे यावे लागेल,,
 काहींच्या मते देशात अनेक प्रश्न आहेत एका लोकपालाने काय होणार?
खर असेल हि परंतु हि तर सुरवात आहे अण्णान सारखा निस्पृह नेता मिळाला आहे.
निदान आपापल्या गल्ली बोळाचे तरी किमान तुम्ही प्रत्येकाने
अण्णा हजारे झाले पाहिजे
आता वेळ आली आहे प्रत्येकाने  आपल्यात एका अण्णा हजारेला जागवायची,
तर आणि तरच या देशात राम राज्य येईल
पण त्यासाठी प्रत्येक दगडाला राम व्हाव लागेल,
तरच पाण्यावर तरंगता येईल,,,,,,,,,

आणि येणाऱ्या पिढीला या भ्रष्टाचाराचा सेतू  पार करता येईल.
माझ्या लहान पणी म्हणजे तस समजणार वयच होत,
नक्की नाही सांगत येत पण असेन १७\१८ वर्षाचा
आणि त्याही आधी मला शाळेत लहान पणी स्वातंत्र्याच्या गोष्टी सागीतल्या जात .
कसे बंड झाले कसे उठाव झाले..
शिरीष कुमार जो आमच्याच वयाचा होता त्याचा कसा बळी गेला .
बाबू गेनू एकना अनेक गोष्टी अंगावर रोमांच उभे करायच्या
त्या भाबड्या वयात अस वाटायचं मी का नव्हतो त्या ठिकाणी,,,
आणि माझ्या विशीत ती माझी इच्छा मला पाहायला अनुभवायला मिळाली ..
जय प्रकाश नारायण याच्या रूपाने,,,,,,,,,
"अंधरेमे एक प्रकाश जय प्रकाश जय प्रकाश " असे नारे देत
आम्ही मुल मुल गल्लीन गल्ली फिरत असू,,,
ईंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी कळणार वय नव्हत
मिसा खाली अटक म्हणजे काय ते कळणार वय नव्हत,,,
पण त्यावेळच माझ्या बापच आणि बाळा साहेबांच संभाषण अजूनही आठवतंय,,
सार जनमत  ईंदिरा गांधीच्या विरोधात होत .
तशाच प्रभात फेर्या तसेच बंदचे वातावरण ,
लहान मोठा कुणीही नाही सारेच जय प्रकाशजींच्या मागे ठाम उभे होते .
श्रीमंत ,गरीब असा भेदभाव नव्हताच
सगळ्यांची भावना एकच आणी बाणी हा अन्याय आहे,,,,,,,,,,,,
दडपशाही आम्ही सहन करणार नाही अशीच लोकभावना होती,,
हे सार सांगायचं कारण आज त्याच वातारणात परत गेल्यासारखं वाटतंय   
असच सारे पांढरपेशे रस्त्यावर उतरले आहेत.
आज तर संभाजी नगर मध्ये उत्स्फूर्त बंद पाळला गेला .
शैक्षणिक संस्थांनी हि बंद पुकारल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शाळा, कॉलेज बंद करून विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. बाजारपेठेत कडकडीत बंद पाळून
"अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है" 
अशा घोषणा देण्यात आल्या.
वकील रस्त्यावर उतरले आहेत आज हे एका अण्णांचं आंदोलन राहील नाही
हे प्रत्येकच झाल आहे ,"मै हु अण्णा हजारे" अस लोक आभिमान सांगत आहेत,हे भाग्य या देशातल्या एकही पुढार्याला आज पर्यंत लाभल नाही ,
लाभणार नाही.७४ वर्ष्याचे अन्ना जर आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी लढत असतील तर आपण का मागे?
नुसते मैदानात बसून दुसर्यांसाठी टाळ्या वाजवणारे प्रेक्षक व्हायचं का खिलाडू हे तुम्ही ठरवा?
७४  वर्षाचा बुढा जवान महिनाभर उपोषण करीन म्हणतो...
शंभर वर्ष आयुष्य मिळो पण एक अण्णा किती दिवस किती काळ पुरतील?
बचेंगे तो और भी लढेंगे... पण एक दत्ताजी मेला तरी रक्ताच्या थेंबाथेंबातून हजारो दत्ताजी निर्माण होतील..!!...
शिवाजीराजे शिपायाला म्हणतात, अरे लढता लढता मेलास तर स्वर्गाचं राज्य मिळवशील जिवंत राहिलास तर पृथ्वीचं...
पण पळून गेलास तर नरकात सुध्दा जागा मिळायची नाही.
खरी लोकशाही मिळावी असे ज्याला वाटते त्या प्रत्येकामधे एक अण्णा जागवा.
अभी नही तो कभी नही,,,,,

10 comments:

  1. Hi Sunil,
    Vrushali Borawake commented on your link.
    Vrushali wrote: "hi bhavana ptatyek bhartiyane manat jagvayala havi....................."

    See the comment thread

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Prashant Gadge commented on your note "मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी,,,".
    Prashant wrote: "सर , तुमचे ब्लाँग नियमित वाचतोय, अप्रतिम लिहिताय तूम्ही छोट्या छोट्या दाखल्यान मधुम खुप पटवुन देताय."

    See the comment thread

    ReplyDelete
  3. Sagar Bhunje sunil ... sunil... kharach... kay comments karu tech samjat nahe..
    Wednesday at 11:18pm · Like

    ReplyDelete
  4. Sunil Bhumkar कारे बाबा ?
    Wednesday at 11:19pm · Like

    ReplyDelete
  5. Sagar Bhunje sunil life madhe pahelyanda yewde nirasha ale .. sunil. plz help.
    bhartache bhawesh .. maje tuje bhawesh ... sory i cant say any think more...
    Wednesday at 11:28pm · Like

    ReplyDelete
  6. #
    Sunil Bhumkar are asa nirash hovu nako mitra aapanch jar ase nirash zalo tar annanchya aandolnala kahi arthch urat nahi
    Wednesday at 11:30pm · LikeUnlike
    #
    Sunil Bhumkar aaj 74 varshacha manus aaplya sathi zagdtoy swathachya swartha sathi nahi he lakshat ghe aani tyachi aapaan takad aahot
    Wednesday at 11:32pm · LikeUnlike · 1 person

    ReplyDelete
  7. #
    Sagar Bhunje sunil nirasha yete te ya mulech.. apan tyanche takad honyachya laykeche ahot ka.kashe kone yewda wishwas taku shakto.. indian publik war
    Wednesday at 11:34pm · LikeUnlike · 1 personLoading...
    #
    Marathi Manus jay hind
    Yesterday at 8:52am · Like

    ReplyDelete
  8. #
    Sunil Bhumkar सागर आपल्यावर किवा ईतरांवर कोण विश्वास टाकेल ते महत्वाचे नाही आपला आपल्यावर किती विश्वास आहे ते महत्वाचे आहे.
    Yesterday at 10:12pm · LikeUnlike
    #
    Sagar Bhunje thx sunil ...
    22 hours ago · Like

    ReplyDelete
  9. आता वेळ आली आहे प्रत्येकाने आपल्यात एका अण्णा हजारेला जागवायची,
    तर आणि तरच या देशात राम राज्य येईल
    पण त्यासाठी प्रत्येक दगडाला राम व्हाव लागेल,
    तरच पाण्यावर तरंगता येईल,,,,,,,,,
    आणि येणाऱ्या पिढीला या भ्रष्टाचाराचा सेतू पार करता येईल.......

    ReplyDelete
  10. Prashant Gadge सै सुनार की तो एक भुमकर की !!

    अप्रतिम !!
    August 19 at 12:49am · UnlikeLike · 2 people

    ReplyDelete