Friday, January 25, 2019

दुधा ऐवजी ताक हेच दूध आहे मानण्याचा नमो मार्ग

||श्री नथुरामाय नमः ||

समर्थ म्हणतात
*||बाहेर लंगोट बंद काये| आंत माकड छंद काये||*
अर्थ,,,,
*जे आपल्या उद्दिष्टां शी प्रामाणिक नसतात जे आत एक आणि बाहेर एक अस वागतात म्हणजे बाहेर दाखवायचं ब्रम्हचर्य आणि मनातील विचार वेगळेच,,*
म्हणजेच बोले तैसा चाले
अस ज्यांचं वर्तन नाही त्यांच्या साठी हि सणसणीत चपराक आहे,,
आज प्रजासत्ताक साजरा करताना तो ही 56 इंचच्या साक्षीने साजरा करताना मनात विचार आला की होय मी खरच या प्रजासत्ताक देशात राहतो
या देशाचा नागरिक म्हणून हिंदूंना काँग्रेस राजवटीत जे जे मिळालं नाही ते ते सार मिळालं करूया,,
आपल्याला मिळालेलच अशी समजूत करून आंनदी राहण्याचा तो ताकाला दूध मानण्याचा
*एक नमोमय मार्ग आहे*

मग चला या मार्गावर सुरवात करू
चालायला कारण हे रोज करायचं असत एक दिवस फोटूकाढून घेण्या साठी करायचा नसतो
मग चला म्हणा बघू,,,
नमस्ते सदा,,,जयतू जयतु हिंदू
तेव्हा आपण सारयांनी आता अशी समजुत करून घेवून नव्हे ते आलच आहे कि,,,
राम मन्दिर झालंच आहे,
370 रद्द झालंच आहे,
समान नागरी कायदा पास झालाच आहे,
आरक्षण रद्द झालंच आहे,
कश्मीर वर आपली निरंकुश सत्ता आहेच,
पाकव्याप्त असले काहीही नाही,
देशातील सारे नागरिक हे हिंदू म्हणूनच ओळखले जातात,
देशभरात कुठेही कुठल्याही जाती धर्माचे पॉकेट्स नाहीत,
निवडणुका केवळ मतांच्या लाचारी साठी जातच नाहीत,
धर्माच्या जातीच्या आधारे कुणाला हि सवलती दिल्या जात नाहीत,
अल्पसंख्य म्हणून कुणाचे हि लाड केले जात नाहीत,
देशाचा तिरंगा जाऊन तिथे भगवा हाती घेतला गेला आहे,

आणि हो हे देखील पटवून घ्या,,,
देशाच्या अस्मितेपेक्षा विकास
महत्वाचा मग तो विकास भले
बाळाला बाटलीचे दूध पाजून आलेली सूज असेल,, बाळसं धरण्यासाठी आईचंच दूध लागत
त्यामुळे देशाचं संरक्षण जग फिरूनच होणार हे हि मान्य करून घ्याच मग भले हि अंतर्गत शत्रू हे देशद्रोही असले तरी चालतील ते कितीही इसिस मध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रचं शिक्षण देत असतील पण आम्ही मात्र *आमचा शांती मार्ग नाही सोडणार अहो तो तर प्रातःसमर्णिय आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment