Saturday, April 9, 2011

लावी पक्षीण ,जन लोकपाल विधेयक, आणि आपण,,,,,,,४

||श्री नथू रामाय नमः ||
खूप पूर्वी मी लावी पक्षीण आणि तिची पिल्ल यांची गोष्ट वाचली होती .
एका शेतात लावी पक्षीण आणि तिची पिल्ल आनंदाने राहत होते,
कुणावर हि न विसंबता
एके दिवशी तीच पिल्लू घाबर्या घुब्र्या आवाजात
आई कडे आल आणि म्हणाल आई आई मी आताच मालकाच बोलन ऐकल
तो पुढच्या आठवड्यात शेतातील पिक कापून घेणार आहे 

हे हे सार उजाड झाल्यावर आपण कुठ जायचं?
ती आई शांत पणे म्हणाली
पुढच्या आठवड्यात न मग बघू,,,,,,,,,,
झाल आठवडा म्हणता म्हणता १५ दिवस झाले,,
काही एक घडल नाही ,,,,,,,पण ,
परत काही दिवसांनी पिल्लू आल आणि
आईला परत त्याचं बोलन सांगितलं,,,,,,
तो म्हणाला मी त्याचं बोलन ऐकल ते म्हणत होते आपल्या गावात मजुरांची काही सोय नाही झाली २\४ दिवसात शेजारच्या गावी जावून मजुरांची काही सोय होते
ते पाहिलं पाहिजे,,,,,
ती आई त्यावर हि शांत पणे म्हणाली हरकत नाही
२\४ दिवस ना मग बघू,,,,,
झाल परत पुन्हा येरे माझ्या मागल्या
यातही १५ दिवस कसे गेले कळले नाही,,,,,,,
एके दिवशी परत पिल्लू परत आईल सांगायला आल,,,,,
आई मी त्या मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा
संवाद ऐकला ते म्हणत होते,,,,,,,,

आता बरेच दिवस चाल ढकल करून चालणार नाही
कुणावर हि न विसंबता
उद्या आपणच येवू आणि शेत कापायला घेवू,,,,,,,,,
हे ऐकल मात्र क्षणाचा हि विलंब न घेता त्या
पक्षीणीन ते शेत सोडलं,,,,,,,,,कारण,,,

तात्पर्य- जेव्हा माणूस स्वतः कुठली गोष्ट ठरवतो तेव्हा ती तो तडीस नेतच नेतो,

हि गोष्ट सांगायचं कारण ,,,,,,,,,,,,,
ज्या लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे आणि त्यांच्या समर्थकांनी देशभर आंदोलन छेडले आहे.

ते पहिले लोकपाल विधेयक १९६९मध्ये म्हणजे ४२ वर्षांपूवीर् राज्यसभेत मांडले गेले.
ते मंजूर न झाल्याने १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५
आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले.
अद्यापही ते मंजूर झालेले नाही. त्यामुळेच सध्या भ्रष्टाचारविरोधी कोणताही कायदा नाही.
आणि आता सरकारने जनतेच्या रेट्यावर
"जन लोकपाल विधेयक" पावसाळी अधिवेशनात मांडायचे मान्य केले तसेच
सरकारने अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने अर्धी लढाई तर जिंकलो..पण,,,,,,,,,?
पावसाळी अधिवेशनाला अजून बराच वेळ बाकी आहे..
तोपर्यंत हा मुद्दा तेवत राहणार कि मध्येच बंद पडणार?
अधिवेशनात विधेयक सादर होणार हे निश्चित पण त्याला मंजुरी मिळेलच हे छातीठोकपणे कोण सांगू शकेल?
बर याकालावधीत सरकार यामुद्द्यावरून दुसरीकडेच लक्ष वळवू शकते..
त्यासाठीच बिग्रेड, गे ग्रेड,बामसेफ,भारत मुक्ती सारख्या भुक्कड संघटना अस्तित्वात आहेत..
तेव्हा खरच हे विधेयक पारित होईल आणि भ्रष्टाचार्यांना याचा फटका बसेल कोणास ठावूक,,,,?
तेव्हा मित्रानो येथे परत एक गोष्ट सांगावीशी वाटते ,,,,,,,
छत्रपतींच्या निधनानंतर आणि शंभू राजांना
मारल्यावर हि पापी औरंग्याने हा महाराष्ट्र
परत एकदा गिळकृत करायचा प्रयत्न केला
पण त्यात हि यशस्वी झाला नाही
छत्रपती नसतानाही येथल्या जनतेने त्याला कैक
वर्षे झुंजवत ठेवले ,,,,,,,,,,,,,,कारण त्या सार्या जनतेला
वाटत होते हे राज्य आपले आहे त्या मुळे महाराज, शंभूमहादेव  नसताना हि
त्याचं नेतृत्व नसताना हि औरंग्या महाराष्ट्र ताब्यात घेवू शकला नाही ,,,,,,
म्हणूनच आज जर हि भ्रष्टाचाराची कीड नाहीशी करायची
असेल तुम्हाला त्याची गरज वाटत असेल तर ती प्रथम
स्वतः पासून सुरवात करा
ठरवा मी आज पासून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही ,
त्याला खत पाणी घातलं जाईल अस वर्तन करणार नाही ,
बस्स या साठी कुठला हि मोठ आंदोलन करायची गरज नाही आणि
हजारेन सारख्या  निस्पृह व्यक्तीना वेठीस धरायची गरज उरणार नाही,
कुणी तरी आपल्यासाठी लढलं पाहिजे हि
ह्या डिप्लोमसीतून  आता आपणच बाहेर आल पाहिजे,,,,,,

हो त्यासाठी हा देश ,हि जमीन ,हि जनता,
यावर तुमच प्रेम हव हे माझ आहे हि भावना मनात हवी
येथल्या समस्या,येथे होणारा भ्रष्टाचार हा
मग तो कुणीही कुणावर हि करो हे तुम्हाला तुमच्या वर झालेला अंन्याय आहे
अस वाटल पाहिजे,,,,,,,,,

मग बघा तो दिवस दूर नाही जेव्हा या देशाला अस कुठला हि
विधेयक पास करवून घेण्यासाठी आंदोलन कराव लागेल,
त्यासाठी ४२ वर्षे वाट पहावी लागणार नाही,,,,,,
माझा देश, माझा बांधव ,माझा धर्म सुखी कसा होईल याचा विचार करा
एकच का असे लाखो करोडो अण्णा हजारे तयार होवू द्या ,
सुरवात स्वत पासून करा,,,,,,,,,
फक्त अण्णा हजारेंना पाठींबा देवून काम भागणार नाही
नाही तर २६\११ च्या हल्यात शहीद झालेल्यांन साठी
जसे मेणबत्या लावल्या कि काम झाले असे समजतो तसे होईल,,
सावध रहा बस्स फक्त भ्रष्टाचार करू नका
त्यासाठी कुणाचा बळी घेवू नका.






4 comments:

  1. मी अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाचा हीस्सा आहे पण माझे मत आहे की जे भ्रष्ट काँग्रेसचे नेत्यांनी जनतेचा पैसा,शेतकरांचे लाटलेले पँकेज,आणि इतर भयानक घोटाळ्यातले पैसे सरकारच्या तिजोरीत जमा झाले पाहीजे आणि ह्या भ्रष्टाचारांचा जमीने जायदाद हस्तगत करुन लुटलेले पैसे वसुल केले पाहीजे आणि मग नंतर ह्या भ्रष्टाचारांना फाशीवर चढवले पाहीजे नाहीतर कारावासाची 20 वर्षाची सजा झाली पाहीजे.असे झाल्यावरच माझाच काय सगळ्यांचा जो आंदोलनाचा हीस्सा आहे ते साध्य झाल्या सारखे वाटेल.तरच भ्रष्टाचार थांबेल.जर भ्रष्टाचारांना सजा झाली नाही तर भ्रष्टाचारांना असा संदेश जाईल की ओरडनारे ओरडुदे,उपोषण करनारांनी उपोषण करुदे त्यावे भ्रष्टाचारी काही दिवस लपुन बसेल किंवा काहीदिवसा साठी जनतेचा आक्रोष ठंड होई पर्यंत सजा पत्करतील आणि नंतर आरामशीर जनतेचा लुटलेला पैसा आरामशील पचवतील.म्हणुन साजा झालीच पाहीजे लुटलेले पैसे वसुल करुन असे माझे मत आहे.

    ReplyDelete
  2. हो तो तर आलाच पाहिजे प्रश्नच नाही
    पण माला वाटत प्रत्येकाने स्वतः शपथ घेतली पाहिजे
    मी भ्रष्टाचार करणार नाही तरच या सार्या आंदोलनाला काही अर्थ प्राप्त होईल

    ReplyDelete
  3. MAG RAJKARNEE HAVETACH KASHALA..

    ReplyDelete
  4. नेतृत्व नसताना हि औरंग्या महाराष्ट्र ताब्यात घेवू शकला नाही ,,,,,,
    म्हणूनच आज जर हि भ्रष्टाचाराची कीड नाहीशी करायची
    असेल तुम्हाला त्याची गरज वाटत असेल तर ती प्रथम
    स्वतः पासून सुरवात करा
    ठरवा मी आज पासून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही ,
    त्याला खत पाणी घातलं जाईल अस वर्तन करणार नाही ,
    बस्स या साठी कुठला हि मोठ आंदोलन करायची गरज नाही आणि
    हजारेन सारख्या निस्पृह व्यक्तीना वेठीस धरायची गरज उरणार नाही,
    कुणी तरी आपल्यासाठी लढलं पाहिजे हि
    ह्या डिप्लोमसीतून आता आपणच बाहेर आल पाहिजे,,,,,,

    ReplyDelete