Sunday, May 1, 2011

जावू दे मला काय मी खुश हे माझा मस्त चाललय

||श्री नथू रामाय नमः ||
१ मे जय महाराष्ट्र दिन,,,,,,,,,?
आज महाराष्ट्र दिन ... आपला महाराष्ट्र आज ५० वर्षे पूर्ण करीत आहे.
दरवर्षी आपण म्हणतो की अभिमान आहे मला माझ्या महाराष्ट्राचा ...
पण मला प्रश्न पडलाय की यावर्षी नक्की कसला अभिमान बाळगायचा ?
-सीमा वासियांना आज हि महाराष्ट्रात येण्यासाठी आंदोलन कराव लागत,,,,?
-आणि आंदोलनाला येवूनही मुंबईतला एक हि मराठी त्यांच्या आंदोलनात सहभागी होत नाही...?
- डोक्यावर १ लाख ८६ हजार कोटी रुपये कर्ज असलेल्या कर्जबाजारी महाराष्ट्राचा,,,?

- गेल्या काही वर्षांत झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा...?
- एका हवेत चमत्कार करणाऱ्या बाबाला शासकीय निवासस्थानी बोलावून पाहुणचार देणाऱ्या ' आदर्श ' मुख्यमंत्र्यांचा ...?
- दररोज इतरांच्या घामाचा (आणि राईच्या तेलाचा) वास घेत कराव्या लागणाऱ्या -लोकलच्या प्रवासाचा...?

-पाणी पुरीत मुतनार्या भैयाचा...?
- वन्यप्राण्यांची शिकार आणि महिलांवर बलात्कार करणाऱ्या आमदारांचा ...?
- लोकप्रतिनिधीनांच दांडक्याने फोडून काढणाऱ्या पोलिसांचा ...?
- विधानसभेत राडा करणाऱ्या आमदारांचा...?
- ग्रामीण भागात अजूनही दररोज चालणाऱ्या १२-१५ तासांच्या लोडशेडींगचा...?
- क्लास वन दर्ज्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास तेलमाफियांनी जिवंत जाळून मारल्याचा ...?
- की मुंबईत असलेल्या झोपड्यांचा आणि वाढलेल्या बकालपणाचा ...?
हे आपल्या सर्वांचं खुप मोठं दुर्दैवं आहे कि या सुवर्णमहोत्सवी वर्षात अभिमान बाळगण्यासारखं काहीच नाही आपल्या महाराष्ट्रात :(:(:(
पावर(पवार)फुल राजकारण , भ्रष्टाचार , महागाई , नक्षलवाद ,
या सर्वांनी महाराष्ट्राची साफ वाट लावून टाकली आहे.
तरीहि  जाऊ देत.... ?????????
मग सांगा मला अधिकार आहे का महाराष्ट्रदिनी आपल्याला शुभेच्छा देण्याचा.?

१ मे महाराष्ट्र दिन सर्वाना हार्दिक शुभेछा देताना खरोखरच मन उद्विग्न होते .
खरच माझी लायकी आहे का लोकांना हार्दिक शुभेछा देण्याची.?
कारण एवढे घोटाळे ,लुटमार ,बलात्कार व सामान्य माणसावर अन्याय.
महागाईने तर सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.
गहू सडतो आहे.पण बाजारात गव्हाची किंमत कमी होत नाही.
उस वाळतो आहे पण साखर महाग आहे.

लोकांचे संरक्षण करावयास ठेवलेले पोलीस लोकांना लुटत आहेत.
प्रत्यक काम लाच देऊन केले जात आहे.

प्रामाणिक माणूस मूर्ख ठरत आहे.
आणी मी........?
मी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पहात आहे.
मग सांगा माझी लायकी आहे का महाराष्ट्र दिनी आपणास शुभेच्छा देण्याची.....?
भ्रष्टाचार,अनाचार,दादागिरी ,महागाई व भेसळ हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पहात आहे.
तरीही मला चीड येत नाही माझे रक्त गरम होत नाही.,,,,,?
खर्या माणसावर अन्याय होत असताना मी एकदम हताशपणे पाहतो आहे.

मग सांगा मला अधिकार आहे,,,,?
बरच काही आहे पोतडीत माझ्या पण मला काय ,,,,,?
जावू दे मला काय मी खुश हे माझा मस्त चाललय 
आपण आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेऊन म्हणूयात......
जय महाराष्ट्र !!!!!


No comments:

Post a Comment