||श्री नथू रामाय नमः||
अर्थात टीआरपी बाबांचा,,,,,,काल परवा सत्य साईबाबा अनंतात विलीन झाले,,
आणि त्यांचा अंत्यविधी शासकीय ईतमामात झाला.
तिरंगी झेंड्यात गुंडाळून तोफा बंदुकींच्या फैरी झाडत झाला ,,,,,,
कसा काय बुवा ?
माझ्या माहिती प्रमाणे शासकीय ईतमामात अंत्यविधी फक्त
जवानांचा किंवा ज्यांनी कुणी देश साठी काही असीम त्याग बलिदान
केल आहे किंवा या देशाचा पंतप्रधान यासारखी कुणी मंडळी असतील
तरच त्यांचा असा शासकीय ईतमामात करावा अशी तरतूद आहे.........
हे सर आठवायचं कारण ,,,,
काही दिवसांपूर्वी सरड्या प्रमाणे रंग बदलणाऱ्या टीव्ही माध्यमांनी
सत्य साईबाबांच्या स्वागताबाबत शासकीय निवास स्थानी आणून
पूजा केल्या बद्दल अशोक चव्हाण ,शिवराज पाटील आणि ईतर नेत्यांना
अगदी या माध्यमांनी झोडपून काढाल होत
३\४ दिवस हा टीका करायचा कार्यक्रम चालू होता,,,,,,
अगदी मनोहर जोशी सुद्धा जेव्हा म्हणाले होते कि गणपती दुध पितो ,,,,,
आज हि त्यांना याच विषयावरून त्यांना झोडपून काढण्यात मिडिया धन्यता मानतो,
मग याच मीडियाची सारासार विवेक बुद्धी,,,?
विज्ञानिष्ठ हवतर म्हणू कि काय ती बुद्धी ,,,?
जेव्हा सत्य साई बाबांचा शासकीय ईतमामात अंत्य विधी चालला होता .
तेव्हा काय यांची बुद्धी गहाण पडली होती का?
विचारता नाही आल का कि बाबा सत्य साई बाबांचं कार्य काय ?
या देशासाठी त्यांनी असा कोणता त्याग केला?
का हवेतून सोनसाखळी अंगठी काढून दाखवली म्हणजे झाले काय?
का देशाचे पंतप्रधान,आणि युपिए अध्यक्ष साईनच्या दर्शनाला गेली
आणि मिडीयाने आपली सर्व शास्त्रे म्यान केली,,,,,,,,,,?
नेमके अशाच वेळी विज्ञान निष्ठा कुठे जाते ?
नेमकी काहीच महिन्या पूर्वी टीका कसे काय विसरू शकतात ?
संपूर्ण जगाला यातून नेमका संदेश गेला,,,,,?
बाबांच्या हवेतून अंगारे, अंगठ्या, फळ , सोनसाखळ्या काढण्यावर
आमचा विश्वास आहे म्हणून,,,,,,,,,,,,,,,?
हे सार कशासाठी केवळ टी आर पी वाढवण्यासाठी ,,,,,?
मग त्यांच्या भक्तांवर टीका का,,,,,,?
सरकार काहीही करेल
पण तुम्हाला तुमची अशी काही मत आहेत कि नाही?
तुमची स्वतःची अशी काही तत्व आहेत कि नाही?
No comments:
Post a Comment