Thursday, May 5, 2011

उपोषणासन ७ ....

||श्री नथू रामाय नमः ||
रामदेव बाबांचं नव आसन उपोषणासन,,,,,,,
आज सकाळीच एक संस्कृत
शुभाषित वाचल ,
"बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मय दूषितः|
अबोधोपहताशचान्य जीर्णमंगे सुभाषितम||
भृतुहारीच्या वैराग्य शतकातील हा श्लोक,,,

त्याचा अर्थ असा, ,,,
जेव्हा बुद्धीमंत मत्सरग्रस्त असतात,,,,
सत्तावंत संशयग्रस्त असतात,,,
आणि लोक अज्ञानग्रस्त असतात,,,
तिथे समाजातील सृजनशीलता समाप्त होते .

म्हणजेच पालथ्या घड्यावर पाणी असते ,,,,
दोन बुद्धिमान अण्णा आणि रामदेव बाबा एकमेकांच ऐकायला तयार नाहीत
सरकार तर दोघांवरही संशय घेतय,,,,,
आणि सामान्य जनतेला हे दोघ हि फसवत आहेत याची गंध वार्ता हि नाही .
अण्णांनी त्यांचा झेंडा फडकावून झाला आता रामदेव बाबा ,,,,
मग आणखी कुणी सोम्या गोम्या उठेल आणि उपोषणाचे हत्यार,,,,,,,,,,?
उचलेल खरतर याला हत्यार म्हणा जीवावर येतंय,,,,,,
येथे मला अकबर बिरबलाची ती गोष्ट आठवते कि कुठल हत्यार
सर्वात श्रेष्ठ ,,,,,?आणि बिरबल सिध्द करून दाखवतो
वेळे नुसार जे हत्यार हाती येईल ते हत्यार सर्व श्रेष्ठ ,,,,,,
हि गोष्ट अण्णांनी वाचली नसेल? रामदेव बाबांनी वाचली नसेल?
मग का त्या बोथट झालेल्या हत्याराच्या मागे लागत आहेत ?
का ते च सर्वात सोप्प आहे म्हणून?
केवळ स्वतःपासून भ्रष्टाचार संपवायला सुरवात करा
अस आवाहन अस प्रबोधन नाही करता येत या लोकांना?
का स्वतः करतात तो शिष्टाचार आणि ईतर करतात तो भ्रष्टाचार
अस काही आहे का?
ज्या गांधी बाबच नाव घेत उपोषणाचे हत्यार उचलून स्वतःचा
झेंडा मिरवत आहेत त्यांची ती गुळाची गोष्ट वाचली नसेल माहित नसेल ,,,,,,,?
एका बाईचा मुलगा खूप गुळ खात असे वर तो गांधींचा भक्त हि होता
एक दिवस ती बाई त्या मुलाला घेवून गांधीं कडे आली
तिने सर्व परिस्थिती सांगितली की बाबा हा काही गुळ खायचं
सोडायला तयार नाही तुम्हीच काही सांगा ,,,,
यावर गांधींनी तिला आठवड्या भाराने ये असा सल्ला दिला
एक आठवड्याने गेल्यावर गांधींनी त्या मुलाला
बोलवून सांगितले कि बाबा गुळ खावू नको गुळ खाण वाईट
बाई म्हणाली हे सांगण्यासाठी तुम्ही एक आठवडा लावला
हे तुम्हाला त्या दिवशी हि सांगता आल असत कि?
त्यावर गांधी म्हणाले बाई मला स्वतःला गुळ खायचं व्यसन होत
मी कस सांगू,,,,,,,,?
म्हणून हा अधिकार आधी मी मिळवला मी स्वतः गुळ खायचं
सोडून दिल आहे
त्यामुळे आज मी तुझ्या मुलाला सांगू शकलो कि गुळ खावू नकोस,,,,,
अण्णा काय रामदेव बाबा काय आणि त्यांचे तथाकथित पाठीराखे काय
हे स्वतः ठामपणे सांगू शकतील
कि मी भ्रष्टाचार करत नाही? दुसर्याला करू देत नाही? त्याला पाठींबा देत नाही ?

आणि आज आता रामदेव बाबाही भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसले ,
आणि लक्षात आल कि गांधी बाबाने उपोषणाचे हत्यार का उपसले ते,,,,,,
अहो उचलण्यास सगळ्यात सोप्प अस ते हत्यार आहे ,
कारण येथे प्रत्येक भारतीय त्याच्या वैदिक हिंदू संस्कृती नुसार,,,
आणि पूर्वीच्या उपासमारी मुळे,,,
परकियांच्या आक्रमणा मुळे ,,,
येथे प्रत्येकाला २\४ दिवस काय किंवा महिना महिना उपवास करायची
येथे प्रत्येक भारतीयाला सवय आहे
कधी व्रत्वैकाल्यासाठी , कधी दुष्काळ पडला म्हणून , तर कधी पाऊस जास्त झाला म्हणून
पण प्रत्येक भारतीयाला उपवासाच्या नावाखाली
उपोषणाची सवयच होती आणि आहे,,,,
हे म्हणजे उचलली तलवार आणि गेला लढाईला ईतका सोप्प नाही राजा......?
हे मेणबत्या पेटवण्या ईतका सोप्प नाही राजा ?
हे म्हणजे मी अण्णा हजारे नावाची टोपी घालण्या ईतका सोप्प नाही राजा?
तिथे प्रत्यक्षात वार करायचा असतो, वार झेलायचा असतो ,
परतवायचा असतो ,प्रसंगी जीव घ्यायचा ,प्रसंगी जीव द्यायचा हि असतो .
उपोषणात यातलं काहीही करायचं नसत
आमरण उपोषणाला बसायचं आणि चार दिवसात उपोषण संपवायचं
हा यांचा धंदा त्यासाठी तेथे पाहिजे जातीचे येर्या गबाळ्याचे काम नोहे
त्यासाठी शिवाजी जन्माला यावा लागतो .


3 comments:

  1. तुझ्या ब्लॉगच बदललेलं रुप खुप छान आहे. आता लेखाबद्दल. मला असं वाटतं ज्याला जमेल तस किंवा ज्याला शक्य असेल तस आपण प्रतिक्रिया देतो वा वागत असतो. अण्णा असोत की रामदेव बाबा ,ते दोघही त्यांच्या त्यांच्या परिनं समाजात घडणार्‍या वाईट गोष्टींचा प्रतिकार करत आहेत. सर्वसामान्य माणसं २०-२० वा तत्सम मनोरंजनात मश्गुल असताना ते काहीतरी करत आहेत हे देखिल कमी आहे का?. तेव्हा त्यांच्या कार्याला यश मिळो ही अपेक्षा.

    ReplyDelete
  2. नाही माझा अन्न किंवा रणदेव बाबा यांना विरोध नाही
    ते उत्तमच काम करत आहे परंतु सवंग प्रसिद्धीच्या मागे लागू नये ईतकच
    आणि ह्यासाठी उपोषणाचे नाटक करण्याची काही एक गरज नाही
    लोकांच मत परिवर्तन करणे गरजेचे आहे
    भ्रष्टाचार हा आपल्या मुलाशी आहे आधी आपण तो हटवला पाहिजे
    नग तो ईतरांनी करू नये हि अपेक्षा धरली तर बरोबर होईल

    ReplyDelete
  3. facebook
    Hi Sunil,
    Prashant Mandpe commented on your status.
    Prashant wrote: "प्रसिद्धीच्या लोण्याचा मोठा गोळा तुझा का माझा."

    See the comment thread

    Reply to this email to comment on this status.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete