Thursday, June 2, 2011

भीमाच्या लेकराची सोय ,,,,,,

अर्थात हिंदुत्व बुद्धत्व
कला संध्याकाळी मी सायन मार्गे दादरला येणाऱ्या बस मध्ये चढलो
आणि मागून एका मित्राने आवाज दिला काय सुनील कुणीकडे?
मी म्हणालो म्हस्णात (स्मशानभूमी),,,,,,,,,?
त्याचा आवाजच अचानक बंद पडला,
ज्या आपुलकीने त्याने मला विचारलं काय मित्र कुठे तर मी त्याला म्हणालो
म्हसणात,,, तो म्हणाला अरे सांगायचं नसेल तर नको सांगू
पण अस काय बोलतोस,,,,?म्हस्णात ?खरच कुणी मेलाय कि काय ?
तू खरच तिकडे कशाला जातोयस?
त्याची प्रश्नांची सरबत्ती ,,,मी थोडा हसलो गालातल्या गालात
मग मात्र तो आणखी विचारात पडला ,,,,
मी हसून म्हणालो अरे बाबा दादरला चैत्यभूमी नाव पडणार
आणि चैत्यभूमी म्हणजे स्मशानभूमी नाही का ?
आत्ता पासून सवय नको का म्हणून म्हणालो
म्हसणात चाललोय चल तुही येतोस का?,,,,,,,,
आणि दोघही खळखळून हसलो आमच्याच विनोदावर,,,,,,,,,,

पण रात्री झोप नाही लागली ,,,
आठवलेंनी हि शिवसेनेचा मार्ग धरला होता .
आता राष्ट्रवादी दादरला चैत्यभूमी वा वा क्या बात है?
दलितांना एकंदरच चांगले दिवस आलेत
विचारांचा गोंधळ मजला होता डोक्यात आणि माझ्यातला
obc जागा झाला obc (अदर ब्राम्हण क्लास )
आणि मी खुशीत गजर खावू लागलो कारण,,
भीमाच्या लेकराची सोय लागणार ,,,,,,

आता भीम जयंती आणि हनुमान जयति झोक्कात साजरी होणार,,,
सत्यनारायणाची पूजा आणि तो ब्राम्हण हे हि खरे मानू,,
धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी आता आपट्याची पान वाटली जातील,,
बाबासाहेबाचा महापारीनिर्वंदिन ६ डिसेंबर आता मित्रासाठी
शौर्यदिन म्हणून साजरा करू बाबरी पडली होती ना,,,,,
पण काहीही म्हणा,,
सत्तेसाठी ह्ये कराव लागल
भीमाच्या लेकराची सोय लावावी लागल ,,,,,

आधी चोरून मारून आपली पोर गौरी गणपतीला नाचत होती
आता बिनधास्त नाचू ,,,
लालबागचा राजा ,,शिर्डी  के साई बाबा,,  झालाच तिरुपतीच हि दर्शन घेवू
सत्तेसाठी ह्ये कराव लागल
भीमाच्या लेकराची सोय लावावी लागल ,,,,,

आठवले साहेबां मुळे हे सार शक्य होईल
भगव्या निळ्या युती मुळे सारे गप्प होईल,,,,
मराठवाड्याच नामांतर हि मोठी चूक होती आहे हे मान्य कराव लागल.
राझाकारानाना सामील हे मान्य कराव लागल
पण काहीही म्हणा,,,
सत्तेसाठी ह्ये कराव लागल
भीमाच्या लेकराची सोय लावावी लागल ,,,,,

चैत्य भूमी पेक्षा राममंदिर महत्वाच म्हणव लागल,,
राममंदिराच्या जागी राष्ट्रीय स्मारक (संडास) बांधायचा आग्रह सोडवा लागल
पण काहीही म्हणा ,,
सत्तेसाठी ह्ये कराव लागल
भीमाच्या लेकराची सोय लावावी लागल ,,,,,

आंबेडकर आधी सावरकरांचा वापर करावा लागल
राजगृहाबारोबर मातोश्रीलाही पूजाव लागल
पण काहीही म्हणा ,,
सत्तेसाठी ह्ये कराव लागल
भीमाच्या लेकराची सोय लावावी लागल ,,,,,

भिमाबरोबर रामालाही आदर्श मानव लागल
मंदिर वही बनायेगेंचा गजर करावा लागल,,
शिवतीर्थावर शिवसैनिका सोबतच समता सैनिकाच एकत्र संचलन कराव लागल
बुद्धत्व हे हिंदुत्वाचच एक अंग आहे हे मान्य कराव लागल
पण काहीही म्हणा ,,
सत्तेसाठी ह्ये कराव लागल
भीमाच्या लेकराची सोय लावावी लागल ,,,,,

अहो दस्तुरखुद्द बाबासाहेबानेच सांगितलय शाशनकर्ती जमात बना
आणि हे सार कुणा मुळे तर आठवले साहेबां मुळे ,,,,,
पण काहीही म्हणा ,,
सत्तेसाठी ह्ये कराव लागल
भीमाच्या लेकराची सोय लावावी लागल ,,,,,
जयभीम बरोबर जय राम बोलवा लागल 





8 comments:

  1. पण काहीही म्हणा ,,
    सत्तेसाठी ह्ये कराव लागल
    भीमाच्या लेकराची सोय लावावी लागल ,,,,,
    जयभीम बरोबर जय राम बोलवा लागल

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Prashant Mandpe commented on your note "भीमाच्या लेकराची सोय ,,,,,,".
    Prashant wrote: "सुनील, तुम्ही भुजबळांना मागे टाकलेत. hahahahahaha"

    ReplyDelete
  3. Hi Sunil,
    Tushar Ghag commented on your link.
    Tushar wrote: "!! जय जय श्रीराम !!"

    ReplyDelete
  4. Hi Sunil,
    Amit Khot commented on your note "भीमाच्या लेकराची सोय ,,,,,,".
    Amit wrote: "मग सुनिल दादा? लवकरच आपल्याला पुन्हा भेटायचय....... म्हसणात!!"

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete
  5. kay mhanav hya utila kon jane
    amchi soy karnara ekch hota bhimrao ramji ambedkar dusra koni nhi

    jaibhim jaibharat
    jaishivray

    ReplyDelete
  6. chaityabhumi mhanje smashanbhumi nave

    ReplyDelete
  7. bar zal swapanil tuch bollas ki kay mhanav ya yutila he aathavlena hi jara jamal tar sang

    ReplyDelete