Saturday, June 18, 2011

बापूंचा चष्मा हरवला

||श्री नथू रामाय नमः||
(चाल) गणान घुंगरू हरवलं ,,,,,
अर्थात चष्मा पुराण
परवा पेपर मध्ये बातमी होती "बापूंचा चष्मा हरवला "
कुणा अभाग्याने चोरला कुणास ठावूक ,,,?
पण माझ्या काही पचनी नाही पडल कि बापूंचा चष्मा चोरीला गेला,,,,
कुणला काय उपयोग आहे त्याचा पण बराच विचार केला तेव्हा
लक्षात आल कि बापूंचा चष्मा त्यांनीच त्यांच्या हयातीत हरवला होता .
आता फक्त तो लक्षात आला ईतकच ,,,,,,,,,,
कुणा अभाग्यावर नसत बालंट लावून काय उपयोग,,,?
१- हिंदू-मुस्लीम ऐक्य झाल्या शिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही हे
घोषित केल त्याच वेळी बापूंचा चष्मा तेव्हाच ,,,,,,,,,
२-५५ कोटी देवून हि भारताला आझादिका तोहफा म्हणून हिंदूंच्या मूडध्यानी
भरलेल्या गाड्या भेट म्हणून मिळाल्या बापूंचा चष्मा तेव्हाच ,,,,
३-भारतीय स्वातंत्रासाठी असहकार आंदोलनातील
तरुणांना सोडवण्यासाठी गांधीनी माफिनाम्यावर सही
नाही तर नाही केली बापूंचा चष्मा तेव्हाच ,,,,,,,
४-
शाळेच्या पाठ्य पुस्तकातून शिवबावणी काढून टाकली 
का ? तर मुस्लिमांच्या भावना दुखवतात बापूंचा चष्मा तेव्हाच ,,,,,

५-गोपीनाथ सहा नावाच्या क्रांतीकारकाने ईन्ग्रज
साहेबाला गोळ्या घालून ठार मारले कोवळं १९ वर्षाचा पोर ते ,
त्याची फाशी टाळून निदान जन्मठेप मिळावी म्हणून गांधीना गळ घालण्यात आली
गांधीनी त्याही वेळी नकार दिला आणि
ते कोवळ पोर फासावर गेल, बापूंचा चष्मा तेव्हाच,,,,
६-आणि नेमक याच घटनेच्या एक वर्षाच्या आत
अबदुल रशीद नावाच्या गुंडाने स्वामी श्रद्धानंदाचा दिल्लीत निर्घुण खून केला
त्याच अबदुल रशिदला वाचवण्यासाठी गांधीनी त्यांच्या मुखपत्रातून
तो माझा भावूच आहे भाई अबदुल रशीद अशी साद घातली.
ईन्ग्रज सरकारला त्याला फाशी देवू नये अशी विनंती केली
बापूंचा चष्मा तेव्हाच ,,,,,,
७-आज जेव्हा महाराष्ट्रात राज्य टग्यानच आल बापूंचा चष्मा तेव्हाच,,,,,
८-दादोजीन नंतर वाघ्या कुत्रा हि डोळ्यात सलायला लागला
बापूंचा चष्मा तेव्हाच,,,,
९-या देशातले पैसे विदेशात जमा होवू लागले बापूंचा चष्मा तेव्हाच,,,,
१०-अल्पवयीन मुलीवर पोलीस स्टेशनात जेव्हा बलात्कार झाला
बापूंचा चष्मा तेव्हाच ,,,,
११-अन्नधान्याची जेव्हा राजरोसपणे दारू बनवली गेली बापूंचा चष्मा तेव्हाच,,,
१२-रामदेव बाबा समर्थकांना अश्रुधूर सोडून नव जालियानवाला बाग घडवल
बापूंचा चष्मा तेव्हाच ,,,,,,
१३-त्याच गांधी मार्गावर चालून स्वामी निगमानदांचा जीव गेला
बापूंचा चष्मा तेव्हाच हरवला,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जगाला आम्ही शून्य दिल अस अभिमान सांगतो परंतु
त्या शून्यावर शून्य मिळवण्याच्या नादात आणखी शून्य आमच्या तिजोरीत
कसे जमा होतील ते पाहतो मग त्याची तृष्णा कमी होत नाही आणि मग चष्मा हरवतो
शांतीचा  समाधानाचा सदविवेक बुद्धीचा मग आदर्शाचा हि घोटाळा होतो 

या चष्मा पुरणाच्या निमिताने बापू विचारांचा तेराव घालायचा
प्रयत्न केलाय चष्मा हरवला हे बरेच झाले आता निदान
गांधी विचार हाच मुळी आंधळ्या पायावर उभारला होता हे लक्षात येईल .


3 comments:

  1. facebook


    Hi Sunil,
    Amit Khot commented on your note "बापूंचा चष्मा हरवला".
    Amit wrote: "सुनील दादा अगदी मार्मिकपणे तुम्ही गांधी नावाच्या तथाकथीत अंधश्रद्धेचा पर्दाफाश केला आहे."

    See the comment thread

    ReplyDelete
  2. facebook


    Hi Sunil,
    Amit Joshi commented on your note "बापूंचा चष्मा हरवला".
    Amit wrote: "बापू जेव्हा जन्माला आला तेव्हाच भाताताचा चष्मा हरवला."

    See the comment thread

    ReplyDelete
  3. जगाला आम्ही शून्य दिल अस अभिमान सांगतो परंतु
    त्या शून्यावर शून्य मिळवण्याच्या नादात आणखी शून्य आमच्या तिजोरीत
    कसे जमा होतील ते पाहतो मग त्याची तृष्णा कमी होत नाही आणि मग चष्मा हरवतो
    शांतीचा समाधानाचा सदविवेक बुद्धीचा मग आदर्शाचा हि घोटाळा होतो

    ReplyDelete