Sunday, April 10, 2011

सदविवेक बुद्धी ,आपण,आणि जन लोकपाल विधेयक ५

||श्री नथू रामाय नमः||
मी २ री ,३ री,४ थी चे शिक्षण उल्हास नगर येथल्या सरस्वती मन्दिर
या शाळेत घेतले ,,,,,,

आज अण्णा हजारेंची लोक जनपाल विधेयकाची लढाई चाललेली  पाहतोय
आणि मान्यवर लोकांच्या प्रतिक्रिया हि वाचतोय
त्यावर मी माझ मत नोंदवले आहेच त्याच हे ५ वे पुष्प,,,,,
त्यापैकी काही जण अण्णा हजारेंच्या विरोधात आहेत ,,,
काही कुंपणावरचे कावळे आहेत ,,,,,
तर काही जण त्यांना चक्क अटी घालत आहेत कि अण्णा
तुम्ही अमुक अमुक गोष्टीला पाठींबा किंवा विरोध करणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत,,
आणि ,
काहीच जण त्यांच्या बरोबर आहेत ,,,,,

असो येथे मला माझ्या शाळेतल्या घडलेली गोष्ट सांगावीशी वाटते
या शाळेने मला खरा अर्थाने घडवल अस म्हणेन
शिक्षित आणि सुसुशिक्षित यातला फरक समजावला म्हणेन,,,,,,,
त्यावेळी ४ थीत होतो तेव्हाची हि गोष्ट,,,,,,,,
आमच्या वर्गाला काळे गुरीजी होते आम्ही त्यांना मारकुटे गुरुजी म्हणत असू
शिस्तीचे ईतके कडक कि विचारता सोय नाही,
त्यांच्या समोर हेड मास्तरांची मात्रा चालत नसे ,
आणि त्या दिवशी मोठ आक्रीत घडल
आम्हाला आमच्या गुरुजींच एक नाव रूप दिसलं,,,,,,,
अर्थात हे आज बोलतोय त्यावेळी हे समजण्याच वय नव्हत
आम्हाला ईतकच कळत होत कि आमच्यातल्याच एका मुलाने
काळे गुरुजींची शाबासकी मिळवली,,,,,,,,,,?
हे समजण्या पलीकडचे होतो आम्ही कारण चुकलात कि मार हेच
त्यांचा समीकरण होत ,,,,
पण त्यातला नेमका फरक आज लक्षात आला तो असा,,,,,,,,
त्या दिवशी नेहमी प्रमाणे १२.१५ ठोक्याला गुरुजी वर्गात आले
ते आल्या बरोबर नेहमी प्रमाणे सारे चिडीचूप झाले,,,,
पण आली आली गुरुजींनी आवाज चढवला
त्यांचा लक्ष फुटलेल्या खिडकीच्या काचेकडे गेले ,,,,,
पुन्हा ते ओरडले कुणी केल हे हि काच कुणी फोडली,,,,,,?
सारे एकदम शांत चिडीचूप ,,,,,,
पण त्या शांततेचा भंग एका मुलाने केला
आणि त्याने सांगितलं गुरुजी आज सकाळी मी लवकर आलो
आणि फुटबॉल खेळत असताना माझ्या हातून हि काच फुटली,,,,,,,,,
आता काय होणार ,,,,,?

स्मशान शांतता कि काय तो अनुभव आला,
आता संजयची खैर नाही एव्हाना हे आमच्या लक्षात आल,
गुरुजी खुर्ची वरून उठले शेजारच्या पुस्तकाच्या कपाटातून,
त्यांनी एक जाडजूड पुस्तक काढाल आणि ते घेवून संजय च्या दिशेने चालू लागले
आता काय होणार हे सार्या वर्गाबरोबर संजयच्या हि
लक्षात आले ,,,त्या जाडजूड पुस्तकाचे फटके संजयच्या
पाठीवर ,डोक्यावर पडणार ,,,,,,,,पण नेमक उलट झाल,
गुरुजींनी संजयच्या पाठीवरून हात फिरवला आणि ते पुस्तक त्याच्या हाती देवून
म्हणाले संजय तुला गड किल्ल्यांची आवड आहे ना?
हे घे पुस्तक यात महाराष्टार्तील किल्ल्यांची समग्र माहिती आहे
ते वाच नीट जपून ठेव,,,,,,,,,,
तुला हे पुस्तक मी देतोय कारण तू काच फोडलीस म्हणून नव्हे
तर तू तुझ्या सदविवेक बुद्धीला जागून तुझ्या चुकीची कबुली दिलीस म्हणून,,,,,

आणि त्या शाबासकीचा अर्थ आज मला कळतोय  ,,,
कारण संजय एकटाच नव्हता आणखी आम्ही चार जण होतो खेळत ,
पण ,,,,,,,गुरुजींना कोण सांगणार कि काच आमच्या हातून फुटली ?
मार कोण खाणार,,,?म्हणून गप्प बसलो आणि फसलो .
हे आज बोलतोय खरा पण त्यावेळी हे संकट संजयने
एका परीने स्वतःवर ओढून घेतलं म्हणन फार बर वाटल होत,
पण त्या आधी या मुर्खाने गुरुजीना हे का सांगितलं ?
कुणीही बघितलं नव्हत आम्हाला काच फोडताना मग काय गरज होती ?
या मुर्खा मुळे आता गुरुजी त्याला तर मरणारच पण,,
त्यांचा मार खाता खाता याने आपली हि नाव सांगितली तर,,,?
असेच सारे प्रश्न डोळ्यासमोर नाचत होते,,,
अगदी गुरुजींनी शाबासकी दिल्यावरही गुरुजी गेल्यावर
आम्ही सारे त्याला भेटलो वर त्याच अभिनंदन केल
संजय यार तू स्वतःवर हे संकट ओढवून घेलतस फार बर केलस
नाही तर आज आमच काही खर नव्हत,,,,
काय पण आमची अक्कल,,,,,?
पण आज अण्णा हजारेंना तथाकथित पाठींबा जाहीर करणारे
पहिले आणि मला हि गोष्ट आठवली,,,,
हे सारे तितक्याच छाती ठोक पणे आपल्या सदविवेक बुद्धीला जागून सांगतील काय कि
आम्ही कधीही 
आयुष्यात भ्रष्टाचार केला नाही ,,,,,,,
भ्रष्टाचार होईल अशी वर्तणूक केली नाही ,,,,,,
मी केला नाही ईतरांना करू दिला नाही,,,,
त्या माझ्या मित्राची हिम्मत एक तरी जण दाखवू शकेल काय ?
आणि हे कुणाला मान्य करता येत नसेल तर त्यांनी
अण्णा हजारेंच्या उपोषणाला ,जनलोक पाल विधेयकाला
कृपया पाठींबा देवून आणि एका नवा भ्रष्टाचार करू नये हीच विनंती.


 







3 comments:

  1. be positive we can win and coming india can finish all type of corruption so be positive and do u r best job
    jai hind

    ReplyDelete
  2. जे अण्णांचे समर्थक आहेत त्यांनी जरि प्रामणिकपणे , लाच न देता न घेता कायदे पाळले तर लोकपाल विधेयकाची गरजच नाही

    ReplyDelete