Thursday, July 12, 2018

माऊली ,,, एक तक्रार आहे तुमच्या चरणी,

|| श्री नथुरामाय नमः||

जय हरी माऊली ,,, एक तक्रार आहे तुमच्या चरणी,
तुम्ही रेड्यामुखी  वेद वादवायची खूप घाई केलीत
जस तुम्ही आम्हा हिंदूंना वचन दिलंत की कलियुगात मी कल्की अवतार घेईन अगदी तस्सच त्याकाळात जर तुम्ही तुमचा हक्क राखून ठेवायला हवा होता
ज्ञानोबा माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवण्याचा चमत्कार राखून ठेवायला हवा होता त्यावेळी तुम्ही सांगायला हवं होतं
2018 मध्ये मी स्वतः गुरुजीं करवी ज्यांना वेद मनुस्मृती पुराण रामायण महाभारत यातलं काही एक माहिती नाही आशा अनेक रेड्यांच्या मुखातून मी वेद वदवीन मनुस्मृती वर बोलायला भाग पाडेन,
गीता कशी महान आहे, खुद्द तुम्ही म्हणजे ज्ञानेश्वर माऊली , तुकोबाराय, यांनी सुरू केलेली वारी किती जुनी आहे, परकीय लोकांनी देखील यांचं महत्व किती आहे हे आवर्जून सांगतील, ((जे जे मान्य असे परकीयांना ते ते मान्य असे आम्हला)) त्यांना हे विसरायला भाग पाडेन राजा मनु आणि ज्ञानेश्वर माऊली हे कुठल्या जातीचे होते,
*ही त्यांची जात आता तुम्हीच ओळखा*
भगवद्गीतेचा मराठी प्राकृत अनुवाद हा ज्ञानेश्वरी (भावार्थ दिपीका) आहे या बद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाहि.
भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात
     *श्री भगवान उवाच*
*इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।*
*विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ।।१।।*
अर्थ - श्री भगवान कृष्ण म्हणतात
मी हा अविनाशी योग विवस्वान् सूर्यास सांगीतला त्याने हा योग आपल्या मनू नामक पुत्रास सांगीतला.
*मनु ने इक्ष्वाकू ला सांगीतला.*
*हा इक्ष्वाकू म्हणजे रामाचा पूर्वज.*
आता याचे ज्ञानेश्वरीत काय वर्णन आलय ते पाहु
*मग देव म्हणे अगा पंडुसुता।* *हाचि योगु आम्हीं विवस्वता ।कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची।।१६*
*मग तेणें विवस्वते रवी । हे योगस्थिती आघवी ।निरूपिली बरवी मनुप्रती ।। १७*
*मनूने आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली आद्य  हे गा।। १८*
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याचे कर्तव्य कोणते असावे.सात्विक राजसी तामसी अन्नांच्या व्याख्या या सारख्या अनेक विषयात मनुस्मृति व गीतेत व त्यामुऴेच  ज्ञानेश्वरीत साम्य आहे.
अगदि महाभारतात शांतिपर्वात  देखील हेच स्पष्ट म्हटलय
*त्रेतायुगादौ च ततो विवस्वान् मनवे ददौ।मनुश्च लोकभृत्यर्थं सुतायेक्ष्वाकवे ददौ ।इक्ष्वाकुणा च कथितो व्याप्यलोकानवस्थित:।।(३४८,- ५१-५२)*
त्रेतायुगाच्या आरंभीच हे विज्ञान विवस्वानाने (सूर्याने)मनूला दिले.
मानव जातीचा जनक "मनू "याने हे ज्ञान आपला पुत्र व पृथ्वीचा अधिपती इक्ष्वाकू ला दिले .
आता तुम्हिच ठरवा ज्ञानोबांचा व मनु महाराजांचा परस्पर संबध येतो कि नाही?
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:

Post a Comment