Saturday, February 27, 2010

मी ज्योतिषी शीईईईईईईई

||श्री नथू रामाय नमः ||
पवार साहेबाना आणखी कुठल्या कुठल्या पदव्या मिळणार आहेत देव जाणे,,,,
हा प्रत्येक गोष्टीत ते
"नरो व कुंजरावो"  
ची भूमिका मात्र जरूर घेतात.
काल परवा सुद्धा ते म्हणाले की बाबा मी काही जोतिषी नाही ,,,
पण महाराष्ट्रातील लोक ऐकतिल तर ना ?
त्यांच्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा ते कधी कधी खुद्द प्रतिभा ताईना देखिल कळत नाही अशी वंदता आहें त्या बाबत ची खात्रीलायक गोष्ट अशी की,,,
"एक दिवस शरद पवार साहेब घरात कुठल्याशा फायली चाळत बसले होते ,अचानक त्यांचे तळ पाय आणि आजुबाजुला खाज  सुटली त्यानी पायाकडे पाहिले आणि ते ओरडले  ,
"अग प्रतिभा माझ्या पायाला मुंग्या आल्या !" 
प्रतिभा ताई ~ अहो केव्हाचे एकाच जागी बसून आहात .
उठा जरा मुंग्या नाही येणार तर काय येणार?
पवार~"अग खरो खरीच्या  मुंग्या आल्या आहेत !".
प्रतिभा ताई~"अहो नीदान  माझ्याशी तरी खर बोलत जा 
उठा जरा उठा मी चहा  टाकते.
तर असे आपले पवार साहेब ,
परवा ते म्हणाले मी काही ज्योतिषी नाही,,
खर नाही तर काय पवारां सारखा दूरदृष्टि ?असलेला कृषि मंत्री या देशाला मिळाला हे खरतर या देशाच भाग्य ,,????
पण आम्ही कपाळ करंटे साहेबंच महत्त्व जाणत नाही.
बर बोलेले साहेब मी ज्योतिषी नाही यात चुक ते काय?
साहेब नाहीतच ज्योतिषी,,,
अहो नाहीतर ,,
त्यानी आपलेच राजकीय भवितव्य घडवले नसते का?
नीदान ४ दशकानच्या  या वाटचालित त्यानी आपलेच राजकीय भविष्य बिघडवले असते का?
मग अशा माणसाला बाजारातील 
महगाई ,शेतमाल,साखरेच्या कीमती ,कधी कमी होणार हे विचारण्यात काय हशील आहें?
"शेती परवडत नसेल तर शेतकर्याने  शेतीच करू नये " असा सल्ला मंत्री झाल्या झाल्या साहेबानी दिला होता.
त्याकडे त्यावेळी दुर्लश केल . आणि आज कुठल्या तोंडाने विचारतात 
महागाई कधी कमी होणार?
साहेबांना शेतीतल काय कळत ?
त्याना शेत म्हणजे जमीन आणि जमीन म्हणजे भूखंड ऐव्हडच  माहित ,,,
खर तर दोष द्याय्चाच असेल तर तो डॉ.मनमोहन सिंग याना द्यावा ,पवाराना कृषी मंत्री करणे  ही त्यांचीच  चुक,,
तेव्हा मित्रानो 
साहेबाना दोष देण्या ऐवजी त्यांचा जयजयकार करा बोला 
अरे जिन्दा -बाद द द द द द जिन्दा -बाद द द द द 
पवार साहेब जिन्दा -बाद द द द द द द द द द द द द द द   

No comments:

Post a Comment