पण हरकत नाही
उंटाच्या पाठी वरची शेवटी काडी ठरन्या आधी ,,
नाटकाची तीसरी घंटा होंन्या आधी,,,,
जागे होणे महत्वाचे म्हनुनच ,,,,हा पत्र प्रपंच ,,
लिहू लिहू म्हणता उशीर झाला कारण,
माझा शंतनु,, माझा मुलगा ,,
अभ्यासात तसा हुशार नाही परन्तु तो ढ ही नाही ,,,
पण तरी देखिल इतर आई वडील यांच्या सारखे माझ्या परीने अरे
अभ्यास कार चा धोशा लावलेला असतो आणि माझी बायको त्याला हात भार लावत असते ,पण तरीही आज तो १३\१४ वर्षाचा झाला पण शाळेत जावून ही
तो जास्त खुश कधी दिसला नाही ,,
पण ,
गेल्या ६\७ तारखे पासून तो खुश दिसत होता .
एकीकडे मुलांच्या आत्महत्या आणि माझा मुलगा खूष विचित्र नाही वाटत?
पण त्याच्या खुशिच कारण वेगलाच होत त्याच्या शाळेत वार्षिक स्नेह समेलन होत त्याची तयारी सुरु झाली होती.
तो करणार होता ,,
शिवाजी..... अफजल खानचा वध करणारा शिवाजी,,,,
त्याची तयारी चालली होती,तहान भूक विसरून त्यात तो समरस झाला होता ,
आज काय तलवार बनव ,कपड्यांची चवौकशी कर,
कुठे मिळतात ते बघ ,या मित्राला भेट त्या मित्राला भेट ,
घरी देखिल सीडी लावून तालीम कर ,,
त्याच आवेशात संवाद म्हन खुप खुप आवडीने तो हे सार करत होता ,
ना थकता ना कंटाळता ही आज पहिली वेळ होती ज्यासाठी आम्हाला त्याला जबरदस्ती करावी लागत नव्हती ,,
आणि नकळतच मी विचार करू लागलो की हे
थ्री इडीयट्स नेमके कोण?
सारे पालक,, शाळा ,,टिव्ही शो च्या नावाखाली मुलांच बालपन हिरवनारे हिरवुन घेणारे हेच सारे या आज होणार्या आत्म्हात्येला जबाबदार आहेत.
सगळ्याच पालकाना आपल्या मुलाने "सचिन" व्हावे वाटते,
पीटी उषा बना
सानिया मिर्झा बना
टिव्ही सिनेमात चमकावे वाटते ,
गेम शो मध्ये भाग घेवुन पैसा कमवावे वाटते,
अभ्यासात पहिला नंबर यावे वाटते ,
नव्हे कमीत कमी ९५\९६% टक्के मार्क मिळवावे वाटते ,
अपेक्षा असणे ,,जिंकायची इच्छा मनात धरणे हेही ठीक पण,,,,
याच यशा पाठोपाठ अपयश ही येत असते ते पचवायाचे असते हे ही त्याला शिकवणे जास्त गरजेचे आहें असे नाही वाटत आपल्याला ?
केवळ आम्हाला नाही जमल म्हणून तुम्ही हे करा ,,,
बस,,,काहीही करा पण जिंकत जा ,,
मित्रानो सर्वात वाइट नशा कुठली असेल तर ती जिंकायची ...
टिव्ही वर एक जाहिरात लागते
"डर के आगे जित है "पण वरील थ्री इडीयट्स मुले आज,,
"डर के आगे मौत है "असच म्हणायची पाली आली आहें.
अपेक्षांच ओझ सहन करायची ताकद नसणारे विद्यार्थी आत्महत्या
करण्यास प्रवृत्त होत आहेत याचा गंभीर्याने विचार केला पाहिजे .
ऐपत नसताना पात्रता नसताना आज त्यांच्या पाठीवर
मना मनाच (मनावरही) ओझ लादल जातय.ज्या वयात खर तर त्यानी
मनसोक्त खेळल बागडल पाहिजे त्या वयात ,,
तो ससा जसा आभाळ फाटल म्हणत कावरा बावरा होत धावतो
आपण सारेच तसेच धावत अहोत असे नाही वाटत?
तसेच आज सारे शिक्षनाच्या मागे धावत आहेत.
असे नाही की शिक्षण महत्वाचे नाही
असे नाही की शिक्षण महत्वाचे नाही
पण शर्यत का? ९८% टक्केच का?
डोक्टरच का? इंजीनियरच?
एमबीए च का?
डोक्टरला सायकलचे पंक्चर काढता येणार आहें का?सुन्दर असे चित्र काढता येणार आहें का?
छान पैकी गाता येणार आहें का?
चप्पल शिवता येणार आहें का?
प्रत्येक जन आपापल्या जागेवर हुशार च असतो पण आम्ही,,,?
हा, याला ९८% टक्के आहेत म्हणजे तो हुशार सर्टिफिकेट देऊन मोकले.
त्या गळ फास लावानार्य मुलात आपल्या मुलाच नाव येवू नए असे वाटत
असेल तर त्यांच्यावर तुमच्या अपेक्षांचा बोजा टाकू नका मुलांची आणि तुमची ही कुवत ओळखा आज हे सार लिहायच कारण ,,
मला देखिल शाळेत जावकर बाई होत्या इतिहास शिकवायला
पाठ केल्या प्रमाने बाईनी आम्हाला धडा कधी शिकवलाच नाही
त्या प्रत्यक्ष आम्हाला छत्रपति मुसलमानंशी,औरनग्जेबाशी लढतायत
असे चित्र आमच्या डोळ्या समोर उभे करत असत
तलवारिंचा प्रत्यक्ष खंखनाट ऐकतोय की काय असे वाटे. आणि म्हनुनच
आम्ही इतिहास शिकलो नाही जगलो निदान तसा प्रयत्न तरी नक्कीच करत आहोत अत्यंत प्रामाणिक पने,,,,,,
म्हनुनच मुलाना आवडेल अशा पद्धतीने शिकवले तर खरच आपण सारे
सुशिक्षित होऊ, असे वाटते . आणि म्हनुनच शंतनु माझा शिवाजी साकार करू शकला
कारण ते त्याचे आवडीचे काम होते ,
ज्यानी आत्महत्या केली ते सुटले या जाचातुन,,?
पण आजही उद्या जगण्या साठी आज मरत आहें त्या मुलांच काय?
नकळत पने आम्ही आमच्या मुलांचा बलिच घेत आहोत.या धड्यातुन नेमका बोध नाही घेतला तर ,,,
"शिक्षणाच्या आयचा घो" म्हणायची पाली येणार नाही आपल्या एक सारखाच पालक
सुनील भूमकर
No comments:
Post a Comment