Wednesday, September 29, 2010

हिंदुत्व पार्ट ३

||श्री नथू रामाय नमः||
मित्रा ,
बर झाल तू मला विचार करायला प्रवृत्त केलस
नाही तर मी आपला गर्वसे कहो करत राहिलो असतो ,
असो पण युद्धात आपल्याला या सर्वांची खूप गरज आहे
तेव्हा बाकीच्यांना काहीच कळत नाही अस म्हणून

त्याना दूर नाही लोटायच त्याना
आपल्याला सोबत घेवून  लढाई ही जिंकायची आहे.
त्यामुळे कुणी कसाही असला तरी तो आपला आहे .
हिंदू आहे हिदू विचारांचा पाईक आहे .
हे लक्षात घेवून आपल्याला पुढे जायचे आहे
१०५ चा मंत्र आपल्याला हेच शिकवतो ,
असो ,,,,,,,,
दह्यातून दुध जस वेगळ दाखवता येत नाही ,,,,,
हिंदुत्व तसच आहे .
रंगातून पाणी वेगळ दाखवता येत नाही ,,,
हिंदुत्व तसच आहे .
ते तुकोबांच्या गाथेत आहे,,,,
कृष्णाच्या गीतेत आहे,,,,,
रामायण महाभारतात आहे ,,,,,,
३३ कोटी देवतांमध्ये आहे,,,,
वेद उपनिशीदात आहे,,,,,,
१४ विद्या ६४ कलात ते आहे,,,,
गाडगे महाराजांच्या स्वच्छतेत आहे ,,,,
तुकडोजींच्या ग्रामगीतेत आहे ,,,,,,,
विनोबांच्या गीताईत आहे ,,,,,,,,
रामदासांच्या श्लोकांमध्ये आहे,,,,,,,,
ज्ञानोबा माउलींच्या ओवीत आहे ,,,,,
ईथल्या दगडांमध्ये आहे,,,,,,,,,
भारतीयांच्या नसानसात आहे,,,,
वंदेमातरमच्या जयघोषात आहे,,,,,,,,
ते ईथल्या रीतीभातीत ,जातीपातीत,
देवाधर्मात ,संस्कृतीत बेमालूम मिसळल आहे.
आणखी काय सांगू मित्रा ,,,?
नजर तोकडी आणि ज्ञान अधू पडेल

( हे चुकून नाही मुद्दाम उलट लिहील आहे )
हिंदुत्व शोधताना ,,,,,,,,,,
मात्र हे हिंदुत्व जाणून घ्यायचं असेल तर,,,,
नजर शिवबाची .........
कलिजा संभाजीचा .......
हिम्मत तानाजीची.....
आणि
निष्ठा बाजी प्रभूंची ,पालखीच्या भोईन ची हवी.
हिंदुत्व तेव्हा कळत.  
जय श्री राम 

No comments:

Post a Comment