Saturday, January 22, 2011

खाद सत्ताक

 डॉ. राजेंद्र प्रसाद ,
सप्रेम सविनय जय हिंद जय महाराष्ट्र
पानिपाताहून कुरूक्षेत्रा मार्गे ४ दिवसांपूर्वी मी दिल्लीत होतो .
आता दोन दिवसांवर परत २६ जानेवारी आलीय
दिल्ली अगदी नववधू सारखी सजतेय गेल्या महिना भरापासून,,,,
हे पाहायला मिळाल आणि अचानक तुमची आठवण आली .
पाहिलं प्रजासत्ताक दिलत आणि निघून गेलात .
मूर्ती लहान पण कीर्ती महान ,,,,,,,,,
तास काही विशेष नाही म्हंटल देशाची हालहवाल सांगावी,,,
आणि विचार चालू असतानाच रेडिओवर एका जुन्या सिनेमातलं गाण लागल
हालचाल ठीकठाक है,,,,,,कदाचित मेरे अपने असावा .
असो तर,
आपण दिलेल्या प्रजासत्ताकाचे कधी खाद सत्ताक झाले
कळलेच नाही,,
पण असो,,?
हालचाल ठीक ठाक है ,,,,,,,
शरद पवारांसारखा कर्तबगार कृषिमंत्री देशाला लाभला
असा चतुरस्त्र कि कधी ज्योतिषी तर कधी दारूवाला
अशा भूमिका सहज करतोय पण असो,,,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,,
वाटल होत विदेशी हा देशी टक्कर देईल पण तो स्वतः
वेगळी चूल मांडून देशी गाळायला बसेल अस वाटल नव्हत पण असो,,,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
कृषी मंत्री आहे कि बेताल मंत्री हे जरी अजून कला नाही तरी असो,,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
साखर कडू झाली दुध फाटलं,
पाणी संपल,कांद्याने वांदा केला आंपण असो
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
निदान कलमाडींच्या कृपेमुळे आपण निदान चीनला

भ्रष्टाचारात तरी नक्कीच  मागे टाकत राष्ट्र कुलच्या भ्रष्टाचाराची उडी 


मारली आणि न. १ काढला,,पण असो,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
सीमेवर लढ्नार्यांची घर सुद्धा हडप झाली ,,पण असो,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
१९९१ ते २००९ या काळात जवळ जवळ ७३ लाख
घोटाळे झाले असे बोलले जाते.
ज्यात स्विस बँकेचा 71 लाख करोड रुपयांचा घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा ,.
त्यांनतर २ जी स्पेक्ट्रम मध्ये ६० हजार करोड रुपयांचा घोटाळा,
ए राजा नावाच्या डी.एम के. चा दलित नेता याने केला,
आणि पंतप्रधानंचा हि पाठींबा आहेच.
cbi ला आपल नावाला मागे लावून ठेवल आहे 
तरी बर न्यायालयाने फटकारले आहे.,पण असो
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
नव्या वर्षात अजूनही कसाब येथे पाहुणचार झोडतोय
महाराष्ट्र परप्रांतीयांना पोसतोय मग कसाब तर
सख्खा शेजारी त्याची नको का खातिरदारी,,?पण असो,,,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
तेलंगाना नंतर वेगळा विदर्भ पण सीमा वासियांना
महाराष्ट्र नाही ,,,पण असो,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
भारताच्या जाहिरातीत पाकिस्तानी लष्करी अधिकारी,, पण असो,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
सचिनही म्हणे एका बादलीत आंघोळ करतोय
गरिबाला तीही नशिबी नाही आणि तो काही सचिन नाही
आणि त्याच्या आंघोळीची फोटू काढायला तो काही स्मिता पाटील नाही ,,पण असो ,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
भैये येथे मराठी लोकांना राजरोस ट्रेन मधून फेकून देतात,पण असो
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
महाराष्ट्र बिहाराष्ट्र झाला पण असो,,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
भांडवलदार अजूनही कामगारांचं शोषणच करतात
सरकार मात्र गाढ झोपेत असतं. 
देशांची भावी पिढी मुलभूत सोयींसाठी रडत असते आणि 
या सर्वांचा त्रास फक्त सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो !’’,,,,पण असो,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
हे चालू सरकार,,,,,,
पुढच्या वर्षी आणखी जोमाने निवडून येईल .
हो नक्कीच येईल कारण जी अक्कल जनावराला आहे
ती आम्हाला नाही
आमच्या कडे गावात कोन्ग्रेस नावच गावात उगवत
जनावर त्याला तोंड लावत नाही कारण त्याने दुध कडू येत .
वास्तविक हे दुध आपण पिणार असतो पण जनावर
त्याला आपल्यासाठी तोंड लावत नाही आणि आपण ,,पण असो
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
आमच्या काबाड कष्टाच्या कमाईचा हिशेब लावून बघितला कि कळत
आमच्या कमाईतली आपल्या कष्टाची भाकर कर म्हणून भरण्यातच जातेय
मग तो कर प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष असेल ,
त्यातूनच नेत्यांचे ,मंत्र्यांचे ,त्यांच्या संत्र्यांचे चोचले पुरवले जातात .
त्या बद्दल आमच्या हाती काय तर फुटकी करवंटी,,,,,,?
लक्षावधी ,अब्जावधी रुपयांचे घोटाळे करून सरकारी तिजोरीवर
डाका घालतात आणि आम्ही अशा पाकीट मारांना निवडून देतो ?,,पण असो,
एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,
खरतर या वटवृक्षाच बिजा रोपण
द्विखंड भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच रोवल होत.
पहिली योजना पंचवार्षिक राबवून पैसे कसे खातात ते दिल दाखवून
पण असो मी तरी किती दुखाडे सुनवणार,,,?

एकंदर हालचाल ठीकठाक है ,,,,,,



4 comments:

  1. हालचाल ठीकठाक है....ekdum mast.

    ReplyDelete
  2. आमच्यासारख्या प्रत्येक अतिसामान्य भारतिय नागरिकाच्या मनातली खदखद आपण योग्य शब्दात मांडलीत....

    ReplyDelete
  3. Prashant Mandpe
    to me

    show details 9:56 AM (12 hours ago)

    Prashant Mandpe commented on your post in { RAJE GROUP } .
    सुनील पंत, तुम्ही हे जे लिहलेले वास्तव जितके प्रखर आहे, तितकेच भेदक आहे मान अस्वस्थ करणारे आहे, पण आपले राष्ट्रप्रेम १५ ऑगस्ट अन २६ जाने. पर्यंत मर्यादीत असते. तुम्ही लिहता इतके कटू असते की वाचल्यावर आपल्या देशाच्या भविष्याबद्दल नेहमीच काळजी वाटत राहत. जय हो भ्रस्ताचारी .
    Prashant Mandpe 9:56am Jan 23
    सुनील पंत, तुम्ही हे जे लिहलेले वास्तव जितके प्रखर आहे, तितकेच भेदक आहे मान अस्वस्थ करणारे आहे, पण आपले राष्ट्रप्रेम १५ ऑगस्ट अन २६ जाने. पर्यंत मर्यादीत असते. तुम्ही लिहता इतके कटू असते की वाचल्यावर आपल्या देशाच्या भविष्याबद्दल नेहमीच काळजी वाटत राहत. जय हो भ्रस्ताचारी .

    ReplyDelete
  4. Manali Gupte आमच्यासारख्या प्रत्येक अतिसामान्य भारतिय नागरिकाच्या मनातली खदखद आपण योग्य शब्दात मांडलीत....

    ReplyDelete