Sunday, February 6, 2011

देवा माझ्या मुलीचा फ्रॉक थोडा मोठा कर,,,,,,,,,

हे माझ वाक्य नाही नाही कुणा भारतीयाचे हे वाक्य उच्चारले आहे,
हे वाक्य आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे,,,
ते म्हणतात , " माझी बारा वर्षाची मुलगी मलिया जेव्हा ,
तिच्या आयुष्यातील पाहिलं नृत्य करायला स्टेज वर जाईल.
जिथ खूप तरुण मुल असतील देवा तेव्हा मला थोडा संयम दे ,
आणि तिने जो स्कर्ट घातला असेल थोडा लांब होवू दे"..........
गुरुवारी "नेशनल प्रेयर ब्रेकफास्ट" नंतर ओबामा हे बोलले,,,
वर हेही म्हणाले अध्यक्ष पदाच्या दोन वर्षाच्या काळात
माझी देवावरची श्रद्धा आणखीनच वाढली,,,,,,
ओबामाच्या उदगाराने जणू माझ्या सणसणीत कानाखालीच मारली .
हे वाचत असतानाच माझी नजर सहजच टीव्ही कडे गेली
एका पेक्षा एक सचिन च चालू होत,
नाचणाऱ्या हिरोईन्स त्यातही सगळ्या ब्राम्हण
मस्त पैकी तोकडे कपडे घालून
शीला कि जवानी आणि झंडू बाम सारख्या चिल्लर गाण्यांवर
थिरकत होत्या मयूर वैद्य प्रत्येक हिरिईन मध्ये
हेलनला पाहत होता सगळ्या जणी स्वतः कशा
आयटम गर्ल  दिसू याची काळजी घेत होत्या ,,,,,,,
याविषयी कुणाला काहीही वाटत नाही .

बर हे झाल मोठ्या लोकांच ,,,,,,,,,
अगदी लहान मुल देखील रियालिटी शोच्या नावाखाली
अगदी हुबेहूब किंवा त्याहूनही सरस अंग विक्षेप करत नाचत असतात.
ज्या लहान निरागस मुलीना कदाचित ( कदाचित हे मोठ्या धाडसाने लिहितोय )
बिडी जलैले जिगर मा बडी आग है ,,
मै झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिये ,,
किंवा शीला कि जवानी चा अर्थ हि कळत नसेल ,,,,,,,
पणआपल्या त्या लहान मुलीला त्या निर्लज्ज स्टेज वर निर्लज्ज
स्टेप्स घे
त नाचताना पाहून
त्यांच्या निर्लज्ज आई वडिलांचा उर अगदी अभिमानाने भरून येतो .
अगदी कृत्य कृत्य झाल्या सारख वाटत ,,

एरवी एकमेकांना न भेटणारे घरदार अगदी टीव्ही पाहताना जवळ बसून हिरो हिरोईन्च किसिंग सीनहि आजकाल  बघतात
आपल्या बाजूला आपला मुलगा किंवा मुलगी बसलीय
याच कुणालाही भान नसत ,,,,
या ठिकाणी अमिताभ आणि शत्रुघ्नचा दोस्तानाचा सीन आठवतो,,
झीनत अमान एका सडक सख्या हरीला पकडून आणते
आणि पोलीस स्टेशनात अमिताभ च्या हवाली करते
अमिताभ हि त्याच्या दोन कानाखाली लगावतो
आणि त्याला बंद करतो.
ईतक झाल्यावर झीनत अमान निघते तेव्हा
अमिताभ तिला अडवतो आणि आणि सांगतो
मी त्याला तुमच्या तक्रारीवर आत तर टाकला
पण लक्षात ठेवा ,
"हे असे कपडे घातल्यावर गुंड शिट्टी नाही वाजवणार
तर काय देवळातील घंटा वाजणार,,,,,,,?"
आज २५ \३० वर्षे झाली असतील पण ती भिती
बराक ओबामाला हि वाटावी,,,,,,,,,?
आणि आम्हाला याच काहीही वाटत नाही?
मग नेमक मागासलेले कोण ?
ओबामा कि आपण?
सुशिक्षित कोण ?
ओबामा कि आपण?
जी चिंता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सतावते ती
आम्हाला सतावू नये?
अमेरिके सारख्या पुढारलेल्या देशच्या पंतप्रधानाला जर
वाटत असेल मुलीचा स्कर्ट थोडा लांब असावा
कि जेणे करून मनुष्य प्राण्याच्या बुभुक्षित नजरेला
ती बळी पडू नये याची त्याला चिंता सतावते.
पोलिसांचा रिपोर्ट सांगतो कि बरेचशे बलात्कार
हे असेच उत्तान कपडे घातल्या मुळे
होतात,,,
आणि आम्ही काय करतो आहोत ?
बर आणखी एक उदाहरण 

बर याबातीत शाळा हि मागे नाहीत
माझ्या शेजारी ४ असलेली मुलगी तिच्या आईने
शाळेचा ड्रेस शिवला दुसर्या दिवशी तिच्या आईला शाळेत
बोलवण्यात आले कारण,,,,,
मुलीचा ड्रेस गुढघ्याच्या खाली का?
तो गुढग्याच्या वर हवा तेव्हा तो त्वरित कापावा
काय बोलवा या कर्माला?,,,,,,
ड्रेस आखूड शिवल्याने नक्की काय साधते शाळा?
बर बराक ओबामा हे हि बोलतो माझा देवावर श्रद्धा आहे
आणि ३३ कोटी देवतांचे मालक आम्ही
देवालाच रिटायर्ड करा म्हणून बोम्बलतो आणि
डॉ. लागू सारख्या बुद्धीवंतांना पाठींबा हि देतो या येथे देव वैगेरे काही नाही
श्रद्धा हि अंधश्रद्धाच असते असा प्रचार केला जातो .
देवदेवतांची यथेच्छ टिंगल टवाळी करतो आणि दुसरे तिसरे
कुणीही नाही आपले मराठी कलाकारच या बाबतीत आघाडीवर आहेत 
म्हणे धर्म निरपेक्ष भारतात या गोष्टी अपेक्षित नाही
वारेवा,,,,,,?
उठसूट पाश्चिमात्यांच अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी
बराक ओबामाच आदर्श ठेवायला काहीच हरकत नाही .
आणि व्हाया ची सवय असणार्यांसाठी सुवर्ण संधी आहे,,,,,,


       



6 comments:

  1. समर्पक विचार.

    ReplyDelete
  2. आजकालचा ट्रेंड बघता मुलींचे फ्रॉक हे आखुडच होत जाणार हे दिसतय, त्यामुळे मी देवाला प्रार्थना करतो, "देवा, माझ्या मुलाला आखुड कपड्यांचे आकर्षण वाटण्यापेक्षा, सालसपणात सौंदर्य दिसू दे.
    शरीर नाशवंत आहेत, विचार अविनाशी हे समजून आपला जीवनसाथी चांगल्या कपड्यांपेक्षा चांगल्या विचारांनी सुशोभित निवडण्याची बुद्धी त्याला दे".

    ReplyDelete
  3. प्रिय सुनिल, तुझा हा लेख म्हणजे भावना माझ्या पण शब्द तुझे. अधिक काय लिहीण्याची गरज आहे का? खुप छान. अगदी मनातलं.

    ReplyDelete
  4. आपण समाजातील नेमक्या वर्मावर बोट ठेऊन लेख लिहिला आहे. समाजातील विकृतीला खतपाणी घालण्याचे काम आपणच एका प्रकारे करत असतो. आपण या लेखाद्वारे समाजातील दोष दाखविण्याचे काम उत्तमरीत्या केले आहे यासाठी धन्यवाद!!!

    ReplyDelete
  5. facebook
    Hi Sunil,
    Chandrakant Khade commented on your note "देवा माझ्या मुलीचा फ्रॉक थोडा मोठा कर,,,,,,,,,".
    Chandrakant wrote: "बराक ओबामाच आदर्श ठेवायला काहीच हरकत नाही .....i"

    See the comment thread

    ReplyDelete
  6. "बराक ओबामाच आदर्श ठेवायला काहीच हरकत नाही .....i"

    ReplyDelete