Wednesday, February 9, 2011

मारामारी आणि सनई,,,,,,,,,,,?

काल दुपारी सहज टीव्ही लावला
एक होलीवुडी सिनेमाचा शेवट चालू होता
दे धमाल मारामारी चाली होती ,
आणि पार्श्व भूमीवर सनई,,,,,,,,,,,?
थोड विचित्र वाटल ,,कारण आपल्याकडे
मंगल प्रसंगीच सनई वाजवली जाते आणि येथे मारामारीवर ?
सध्या भारतात चुकीचे सुर आळवले जात आहेत

व्हयालेंटाइन बाबत ,,
वास्तविक हा व्हयालेंटाइन हा आपल्या संस्कृतीचा सुर आहे का?
आपल्या कड़े जर अस कुणाला मारल तर आपण सण साजरे करतो का?
१४ फेब्रु.ला त्याला त्या तथाकथित संताला मारण्यात आल,
माझ्या अल्पमति प्रमाने
जर आपल्याकडे असा अचानक मृत्यु झाल्यास,
त्यास फाशी दिल्यास ,
त्याचा खुन झाल्यास,
मग भले त्याच दिवशी  घरात एखादे मंगल कार्य असल्यास ते
एक तर रद्द करतात किंवा पुढे ढकलतात किंवा नाइलाज असल्यास
अत्यंत साधेपणाने तो कार्यक्रम अक्षरशः उरकला जातो,,
आणि पुढील १५\२० दिवस दुखवटा म्हणून पाळले जातात .
आनंदाने मौज मजा करत गावाला आवतन नाही देत आपण ,,
आणि १४ फेब्रु, हा तर म्रत्यु दिवस ,,,,
मूक राहून त्या तथाकथित संतला श्रंधांजलि वहायची की ,
त्याच्या नावावर तो दिवस साजरा करायचा?
हा सुर चुकीचा नाही वाटत?
माझ्या मते महाराष्ट्राला एका तथाकथित ईम्पोर्तेड  संताची गरजच नाही,
इकडे शेकडोनी संत आहेत त्या सर्वानी
प्रेमाचीच शिकवण दिली आहे
शत्रुवर देखिल प्रेम करा असे सांगणारे इथेच होते
आणि त्याची फळ आम्ही भोगतोय(असो यावर सविस्तर कधी तरी)
"प्रेम कर भिल्ला सारख बाणा वरती खोचलेल "
असे संगनारे आधुनिक संत ही आहेतच की?
ह्या असल्या भान हरवलेल्या सुरांमुले दरवर्षी
३१ डिसे काय काय घडत आपल्याला माहित आहे?
सिंह गडाची मान पायथ्य पर्यंत झुकवली जाते
हु  इज तानाजी मालुसरा? असे बेमुरव्वत पणे विचारले जाते     
ह्या असल्या सुरांमुले  गेल्या वर्षी आमच्या हिंजवडी परिसरातील 
कॉलसेंटर वर काम करणारी मुलगी ड्राईव्हरच्या कांमवासनेला 
बळी पाडली गेली.
ह्याच व्हयालेंटाइन च्या पुढे मागे संक्रतिचा सण येतो हा सण देखिल 
प्रेमाचाच संदेश घेवुन येतो ना?
त्यासाठी कुठल्या बागेत भेटायची गरज नसते,,
कुठल्या स्कायवोक वर भेटायची गरज नसते,
झुडपामागे लपून देवाण घेवाण करायची गरज नसते,
महागड्या वस्तु घ्यायची गरज नसते 
महागडे परफ्यूम लावायची गरज नसते 
कीमती अंगठ्या भारी ड्रेस 
कुठल्याशा होटेलवर जावून उतरवायची गरज नसते 
बाजारातील सर्व्हे सांगतो व्ह्यालेंटाइनच्या पुढे मागे येणार्या
दिवसात सर्वात जास्त विक्री कंडोम ची होते.
मला हे सर्व त्या बेभान सनई वाल्या सारखे वाटले म्हनुनच...
जाता जाता
कालच एका सिनेमाच पोस्टर पहिल त्यावर लिहिल होत
सिनेमाच नाव होत व्हयालेंटाइन स्पेशल
"तु जर मला प्रेम नाही दिलास तर मी तुझी हाड मोडेन?,,,,
तात्पर्य काय 
आणखी एका संताची आणि भान नसलेल्या सुरांची आम्हाला गरज नाही

1 comment:

  1. rakesh desai
    to me

    show details 3:53 PM (2 hours ago)

    नमस्कार सुनील,,
    तुमचे सारे ईमेल मला भेटत आहेत आणि मी ते वाचतही आहे.
    त्या मेलमधुन तुम्हाला जे बोलायचे आहे ती तुमची भावना मी समजु शकतो.
    असो
    असेच मला ईमेल पाठवत रहा.
    आपला हिँदुत्व कट्टर मित्र,,
    "राजे"

    ReplyDelete