Friday, March 11, 2011

शंभु महादेव एक दुरदैवी अंगार

१४मे १६५७
वैशाख अधीक अमावस्या
येतानाच शंभु महादेव नशीबात
वैशाख वणवा अधिक आमवस्या
लिहून घेवुन आले .
आणि
पुरंधरावर एक धगधगता अंगार जन्मास
आला
श्री.शिव छत्रपतींच्या घरात,
सई बाईंच्या पोटी हा दुर्दैवि पुत्र जन्मास आला ,,,,शंभू महादेव,,,
अनभिक्षित युवराज, दुर्लक्षित प्रतिभावंतकवी,
प्रचंड स्वाभिमानी,आणि स्वराज्याचा अभिमानी,,,शंभू महादेव,,,
आख्यायिका ज्यांच्या मुळे जन्मास आल्या ,, ते शंभू महादेव,,,
छत्रपति शिवाजी महाराज
सदैव स्वराज्याच्या धामधुमित गुंतलेले
अफजल खान,शाहिस्त्य खान आणि इतर अनेक आक्रमनांना
तोंड देत .रयतेचे राज्य उभे करायची मनीषा उरात बाळगलेले,,,
या कामी त्यानी स्वतःस तर झोकुन दिले होतेच ,
वर कुटुंबाला ही आणि त्यात ही ,
शंभू महादेव सारखा मुलगा हाताशी असल्यावर 
महाराजंच बळ १२ हत्तीं एव्हड झाल नसत
तर नवलच,,,असे शंभू महाराज,,
आजीची माया मिळाली पण राणीचा दुस्वास भोगवा लागला ,
त्या पाई राज गादी पासून दूर रहाव लागल,
ईतक की छत्रपतींच्या चितेस अग्नि ही
त्याना नाकारन्यात  आला,,ते शंभू महादेव,,
मिर्झा राजांकड़े स्वराज्या साठी ओलीस रहाव लागल ,
आणि आग्र्याहून सुटका करवून घेतल्या नंतर 
स्वराज्यात येण्यासाठी स्वतःच्याच मरणाची आवई 
उठवून लपून छपून रहाव लागल,
खर्या अर्थान मरण जगाव लागल,,,,, ते शंभू महाराज,,,,
महाराजांच्या मृत्यु नंतर ज्यानी ,,
पोर्तुगिझांना हटवून गोवा घेण्याचा प्रयत्न केला
मुंबई सारखे बन्दर विकत घेवुन सागरी
सत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला,
अकबराच्या मदतीने प्रत्यक्ष दिल्ली ताब्यात घेण्याचा प्रयत्न
९ वर्षे सतत लढून केला पण हाय रे दैवा,,,,,,,,,,
फितुरीन  येथेही पुन्हा एकवार घात केला,,,
शंभू महादेव पापी औरंग्याच्या हाती लागले.
आणि हाल हाल करीत औरंग्याने त्याना मारले
"स्वधर्मे निधनं स्वया परधर्मो भयान वः"
परधर्म स्वीकारने म्हणजे मृत्यु
आणी परधर्मात जन्यापेक्षा मी मृत्यु स्वीकारेंन "
असे ठणकावून सांगितले        
हिन्दू नववर्ष दिन ,,,,याच दिवशी हिन्दू घरोघरी गुढ्या उभारतात
तोरण लावतात, पताके, झेंडे नाचवतात.
हेच ध्यानात घेवुन क्रूर कर्म्या औरंग्याने आजचा दिवस निवडला होता ..
आज संध्याकाळी त्या काफर संभाजिचा खातमा करून
हिन्दुना प्राणाहुन प्रिय राजाची त्याच्या मस्तकाची गुढी भाल्यावर टोचून नाचवुन दाखवू
असे ठरवूनच बहादुर गडावर (मौजे पेड्गाव.ता.श्री गोंदा)तो आला ,
संभाजी महाराजांची धिंड काढली गेली एका बोडक्या घाणेरडया  उंटावर
संभाजी महाराज व कवी कलश याना उलटे बसवले होते
साखळ दंड़ाने बांधलेले ,दोघांच्या ही अंगावर विदुषका सारखे
कपडे चढवले होते .
गळ्यातील  शिवरायानी घातलेली कवडयाची माळ काढून
गुरानाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी  बांधलेली होती ,
दोघांच्या ही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगाराला बंधाव्यात अशा
ईरानी लाकड़ी टोप्या बसवल्या होत्या ,
कुरान मधे सांगितलेल्या आदेशा नुसार ,,,,,,

त्याच प्रमाने "तख्ते कुलाह " म्हणजेच लाकड़ी फळ्यांचा खोडा
मानेवर ठेवून दोन्ही हात बांधले होते .
त्या खोड्याला घूंगरे बांधली होती, आणि त्यावर छोटी छोटी निशाण चितारली होती.
अशी ती विदुषकी धिंड मोंगली फौजां मधून काढली होती .
त्यावेळी त्या मोगलां मध्ये  त्यांच्या पवित्र ईद सारखे उत्साहाचे वातावरण होते .
दुर्तफा उभे असलेले सैनिक महाराजांवर आणि कवी कलशांवर,
दगड भिरकावत होते. भाल्याने टोचत होते , नगारे वाजवत होते,
कर्ने थरारत होते, ईमामांचे झेंडे फड़कत होते,
रायगड चा राजा, महाराजांचा जीजाऊंचा शंभू बाळ...
रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.
लगोलग औरंग्याने आपला मुक्काम ,
तुळापूर येथे हलवला.
या तुळापुरच्या संगमावर त्याला राजास हलाल करावयाचे होते.
महाराजांची तेजस्वी नेत्र कमले काढण्यासाठी

हषम सरसावले ,,
रांजनातुंन रवि फिरवावी तसे , तशा त्या तप्त सल्या महाराजांच्या
डोळ्यातून फिरवल्या गेल्या ,,
चर्र चर्र,,, करीत चेहर्या वरील कातडी जाळली गेली,
सारी छावनी थरारली पण ,,,,?
महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेर ही उमटली नाही.
यामुळे औरंगजेबचा परा वाढला त्याने कवी कलशांचे ही डोळे
काढले गेले ,
बलिष्ठ शरीरयष्ठिचा एक पठान कवी कलशांच्या छाताडावर बसला ,
आणि दुसर्याने त्यांचे पाय उसाचे कांड पीळगटावे तसे
पीळले , दोघानी मिळून मग कविराजंची मुंडी धरली ,
त्यांच्या जबड्यात हात घातला, कविराजंचे मुख रक्ताने भरून गेले होते ,
त्या पठानाने त्यांची जीभ हाताने खसकन खेचून काढली ,,
दुसर्याने ती वितभर बाहेर आलेली जीभ कापून काढली.
कवी राजांच्या तोंडातून रक्ताचा डोम्ब उसळला .
संभाजी महाराजांची जिव्हा ही अशीच छाटली गेली .
पहनार्यंचे ही डोळे पांढरे पडले.
आसुरी आनंदाने अवघी छावनी गर्जत होती.
कवी कलशां वरील आत्याचार ही महाराजां वरील
अत्याचाराची रंगित तालीम असायची .
संध्याकाळ झाली .शंभु महादेवस खांबास घट्ट बांधून ठेवले होते .
महाराज उभे होते एखाद्या ,
स्वाभिमानाने तळपत असणार्या तेजस्वी योग्या सारखे,
ज्यांच्या तेजाने शेष ही डल मलून जावा अशा तेजस्वी श्री कृष्णा सारखे,
अविचल अभेद्य ,,,,,,,,
आभाळात अभिमानाने मस्तक उंचावुन  बाणेदारपणे
उभा असलेल्या रायगडा च्या  टकमक टोका सारखे.
दोन दैत्य पुढे सरसावले ,,
एकाने पाठीच्या वरच्या मणक्या पासून
आणि दुसर्याने समोरून गळयापासून ,
राजांच्या अंगात वाघ नख्या घुसवल्या,
त्या राक्षसांना  जोर चढावा म्हणून कुरानातिल
आयते वाचले जात होते , रण वाद्यांचा दनदनाट होत होता.
"दिन दिन "आणि "आल्लाहू  अकबर" च्या घोषत राजांची
त्वचा डाळींबाच्या साली सारखी सोलली जात होती.
जास्वंदी सारखा लाल बूंद देह यातनानी तळमळत होता.
रक्त मासंच्या चिंध्या होत होत्या.
संपुर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फारशा व खांडे पेलत,
दोन गाझी (धर्मवीर) पुढे आले,
त्यानी त्यांचे हात आणि पाय एक एक  करत अवयव तोडून टाकले ,
दुसर्याने खंड्याचे धारदार पाते महाराजांच्या मानेत घुसवले,
व हळू हळू  कुराणातील आज्ञे प्रमाने  "हलाल "करीत
शिर धडा वेगळे केले.
हाच तो गुढी पाडवा या हिन्दुस्तानत मुसलमानानी राजांची मुंडी
भाल्यात अडकवुनं गुढी उभारली
आणि आम्ही ,,,,?

मग,,,,,, खर्या अर्थाने या महाराष्ट्राने
या द्रष्टया महादेवाच महत्त्व जाणल,
त्यांचा आदर केला ,,
पण उशीर झाला होता ,,
हा महादेव पुन्हा महाराष्ट्रात जन्मास नाही आला .
आज निदान त्याच पुण्यस्मरण तरी करू .
आणि सर्व साक्षी ईश्वराला साकडे घालू .
"या महाराष्ट्र भवानिच्या पदरी पुन्हा एकदा
नरवीर शंभू नाथ महादेव शंभू महाराज जन्मास घाल "
ऐकेल ही महाराष्ट्र भवानी ऐकेल
अगदी त्याच आर्ततेने हक़ मारा
ज्या आर्ततेने जीजावुंनी आई भवानीस हाक मारली होती .
जय भवानी जय शिवराय जय शंभू महादेव.
आणि
हो महाराज जमलच आम्हाला माफ करा
आम्ही विकेंड साजरा करायला जीवाच रान करू .
पण पुण्याच्या अगदी जवळ असलेल्या तुमच्या वढू तुळापुर
तीर्थक्षेत्रास भेट नाही देत जावून एखदा फुल हि वाहायचे कष्ट नाही घेत .
माफ करा महाराज माफ करा...


6 comments:

  1. facebook
    Hi Sunil,
    Yogesh Deshpande commented on your link.
    Yogesh wrote: "धर्मनिष्ठ शंभूराजांना मनाचा मुजरा ||जयतु हिंदुराष्ट्रम||"

    See the comment thread

    ReplyDelete
  2. भूमकर साहेब वाचून डोळे पाणावले आणि कानशिले हि तापली किती हा त्याग धर्मासाठीच अतुल्य बलिदान आणि मी सारे विसरून स्वतातच मशगुल आहे माजी मलाच लाज वाटू लागली कि मजा राजा धर्मा साठी बलीदानीत झाला आणि आज माझा धर्म परत संकटात असताना मी स्वस्थ कसा
    नाही शंभूराजे तुमची आन हाई तुमच्या गत मरण आले तरी बहेत्तर आता माघार नाही सप्त सिंधू मुक्त करू सप्त सागरावर भगवा फडकू तरच शांत बसू पिद्यान पिद्यांचा हाच ध्यास आता उरात आमच्या आहे आता

    ReplyDelete
  3. धन्यवाद सतीश हेच प्रत्येकाला वाटल पाहिजे बघ ती सिंधू नदी भारतात येते कि नाही
    तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येक नागरिक हा राष्ट्रप्रेमी म्हणूनच जन्माला येईल .

    ReplyDelete
  4. facebook
    Hi Sunil,
    ओंकार तोरसकर commented on your link.
    ओंकार wrote: "http://www.facebook.com/l/bd9a6/thepowerofthedreamz.blogspot.com/2008/06/blog-post_21.html"

    See the comment thread

    Reply to this email to comment on this link.

    ReplyDelete
  5. जय भवानी......
    सुनील जी ,
    शंभू राजे म्हणजे एका नृसिंहाच्या पोटी जन्म घेतलेला " भोळा छावा" ....
    आणि या रानातल्या छ्व्याला त्या औरंग्याने खरच या पेक्षा हि हाल-हाल करून मारलंय. इतके कि राजना सेवाताचे अग्नीसंस्कार देखील मिळाले नाहीत......
    पण त्याचे कुणाला काय.....????
    इथे नदीच्या त्या किनार्यावर महाराष्ट्राचा राजा ५ दिवस- रात्री मृत्यूशी झगडतोय....फक्त धर्मासाठी ,स्व- त्वासाठी .....
    पण जनतेला माहित हि पडत नाही......
    गाफीलपणाचा उत्तम नमुना.....

    ReplyDelete
  6. जय भवानी......
    सुनील जी ,
    शंभू राजे म्हणजे एका नृसिंहाच्या पोटी जन्म घेतलेला " भोळा छावा" ....
    आणि या रानातल्या छ्व्याला त्या औरंग्याने खरच या पेक्षा हि हाल-हाल करून मारलंय. इतके कि राजना सेवाताचे अग्नीसंस्कार देखील मिळाले नाहीत......
    पण त्याचे कुणाला काय.....????
    इथे नदीच्या त्या किनार्यावर महाराष्ट्राचा राजा ५ दिवस- रात्री मृत्यूशी झगडतोय....फक्त धर्मासाठी ,स्व- त्वासाठी .....
    पण जनतेला माहित हि पडत नाही......
    गाफीलपणाचा उत्तम नमुना

    ReplyDelete