Wednesday, March 16, 2011

मराठीला असे पाटील पुट्टापा हवेत

||श्री नथू रामाय नमः||
कधी काळी मी देखील कॉलेजात शिकत होतो
त्या वेळची गोष्ट
माझी एक किशोरी जाधव नावाची मैत्रीण होती
ती सारखी ईंग्लीश मध्ये बोलत असे .
एक दिवस न राहवून मी तिला विचारले कि,
किशोरी तू तर जाधव मग सारख सारख ईंग्लीश मध्ये का
बोलत असतेस ? तू जाधव म्हणजे मराठी ना ?
ती म्हणाली हो पण माझी आई पंजाबी आणि वडील मराठी आहेत.
हो पण त्याचा काय संबंध ?
मराठी का नाही बोलत ?
तेव्हा ती म्हणाली
"शी ती काय भाषा आहे ती गडी नोकरांची भाषा आहे"
आता मात्र मी पार उडालो पण माझा मराठी अभिमान
मात्र जागा होता मी म्हणालो,,,,,,,,,,,,?
"मग तुझ्या आईने काय तिच्या गडी नोकराशी लग्न केले?"
अर्थातच तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला आणि त्या नंतर
आज तागायत माझी तिची भेट नाही झाली,,,,,,,,,
असो हे सार आठवायचं कारण,
काल परवा बेळगावात मराठ्यांच्या छाताडावर पाय देवून
कन्नडिगांनी वैश्विक संमेलन बेळगावात भरवलं आणि
त्यात त्यांचा सूर असा होता कि ईंग्लीश नको
पण गमत पुढे त्यात पाटील पुट्टापा नाव पुन्हा एकदा समोर आल
आणि या पुट्टापा यांचा कन्नड साठीचा भीम पराक्रम आठवला
आज खरतर मराठीला असे पाटील पुट्टापा हवेत ,,,,,,
त्यांची गोष्ट ,,,,,,
सहनशीलता आणि मराठी माणूस हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत,
महाराष्ट्र हा सहिष्णुता वाध्यांचा प्रांत आणि
मुबई हि
कॉस्मोपॉलीटिन या विचाराने गेल्या ४०\५०
महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे
लोक हिंदी ईंग्लीश मध्ये केवळ बोलत नाही
विचार हि त्याच भाषेत करतात,,,,,,,,,,
म्हणून मी वरील माझ्या मैत्रिणीची गोष्ट सांगितली,,,,,
असो तर
आपल्या राज्यातील बहुतेक महत्वाच्या पदावर असलेला
पाटील ,देशमुख ,पवार, या मंडळींनी हि सहिष्णू वृत्ती सोडायला नको का?
ह्या पाटील पुट्टापा चे पराक्रम यासाठीच,,,,,,
ह्या पाटील पुट्टापा यांनी सीमा बांधवांवर अन्याय केला आहे यात वादच नाही .
जे कन्नड भाषिक नाहीत
ज्यांची मातृ भाषा मराठी आहे,
आणि महाराष्ट्राशी ज्यांना एकजीव होण्याचा ध्यास लागला आहे.
अशा मराठी बांधवांवर पुट्टापा यांनी कन्नड सक्तीचा वरवंटा फिरवला आहे.
त्या विरुद्ध लढणाऱ्या सीमावासीयांचे कौतुकच केले पाहिजे.
एकला विष तर दुसर्याला अमृत ठरावे अशी कामगिरी आहे त्यांची ,
कर्नाटकात कानडीकरणाचा वरवंटा राज्यभर फिरवण्यात आला
कन्नड हि कर्नाटकची राज्य भाषा झाल्यानंतर ती केवळ कागदो पत्री ठरली नाही ,
तर सरकार दरबारातील प्रत्येक कागद नखशिखांत कन्नड करती झाली,,,,
सरकारचे सर्व व्यवहार कन्नड मधून सुरु झाले,,
कन्नड खेरीज अन्य भाषेला बंदीच घालण्यात आली,,,
ईंदिरा कोन्ग्रेस चे गुंडू राव मुख्यमंत्री असोत कि
कि जनता पक्षाचे रामकृष्ण हेगडे,
पाटील पुट्टापातर मोकाट सुटले होते,,,,
राज्यात कन्नड सक्ती बरोबर होते कि नाही
होत नसल्यास कोणती उपाय योजना करायला हवी,,
हे सुव्ण्यासाठी हेगडे सरकारने पुट्टापा यांच्या अध्यक्षतेखाली
मंडळ नेमले होते,,,,,
कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आणि जोडीला प्रचंड अधिकार,,,,,,
पाटील पुट्टापा यांनी या संधीचा अगदी सोन केल,,
त्यांची कार्य पद्धतीही अगदी विलक्षण
कोणत्याही कार्यलयात ते दत्त म्हणून उभे राहत ,,,,,,
आणि एखादा जरी माणूस कन्नड सोडून अन्य भाषेत व्यवहार किंवा
टीका टिप्पणी करताना दिसला कि त्याची धडगत नसे,,
ईंग्लीश टाईप रायटर्स उचलून फेकून देत,,,,
कन्नड टाईप रायटर्स का घेतले नाहीत असा सवाल ते करत ,,,
पाटील पुट्टापा म्हंटले कि अधिकार्यांना कापरे भरे,,,
क्षणोक्षणी असे कापरे भरण्यापेक्षा कन्नड टाईप रायटर्स
घेतलेले बरे आणि याच खमके पणा मुळे
आज कर्नाटकात कन्नड भाषा खर्या खुर्या 
राजभाषेच्या दिमाखात उभी आहे,,,,,,,,
राज्यातील सर्वसामान्य जनता आपल्या मातृभाषेतून
सर्व व्यवहार करत आहे,,
आणि विकास हि साधत आहे,,
हडेलहप्पी,,दमदाटी,,,आदी सर्व मार्गांचा अवलंब
करून पाटील पुट्टापा यांनी कन्नडला तिच्या योग्य स्थानी
बसवले आहे त्यांची हि पद्धत चुकीची जरूर असेल पण
उद्दिष्ट ते मुळीच चुकीचे नाही,,,,,,,,,,,,,
कन्नडला एका उंचीवर नेवून बसवण्यात त्यांचा मोठा हात भार आहे
म्हणून कन्नडचे नाव आज गाजते आहे आणि,,,,,,,,,,,?
माय मराठीला अशाच मराठी पाटील पुट्टापा अवताराची गरज आहे.
जेणे करून मराठी हि गडी माणसांची नोकरांची भाषा आहे हे बोलायची हिम्मत मराठीच माणूस करणार नाही .
त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आणि केवळ आणि
केवळ मराठीत बोलायची गरज आहे



3 comments:

  1. आजवर करत आलोय आणि पुढे देखील करेन. मि होणार तो पाटील पुट्टापा. मराठीचा तिरस्कार करणार्‍यांच्या डॊळ्यात झणझणीत अजंन घालणार... फ़क्त तुमची साथ द्या...आणि हा विचार प्रत्येकाने करा

    ReplyDelete
  2. अमोल असे पाटील पुट्टापा प्रत्येकाच्या मनात जरी झाले तरी आपल्यासाठी दिल्ली दूर नसेल
    मी तर आहे तुझ्या बरोबर
    आपण दोघा हि एक आणि एक अकरा होऊ या

    ReplyDelete
  3. facebook
    Hi Sunil,
    Sagar Kharpude commented on your link.
    Sagar wrote: "केवळ आणि केवळ मराठीच बोलायचे असा ध्यास धरला तरच मराठी भाषा वाचवणे शक्य नाही तर मराठीच्या घोषणा द्यायच्या आणि स्वताच्या मुलांना इंग्लिश माध्यमात टाकायचे. मराठी नसलेल्या प्रत्येक गोष्टी वर बहिष्कार टाकला पाहिजे .कारण इतर भाषेबरोबर त्याची संस्कृती देखील नकळत येते.ज्ञानभाषा म्हणून इंग्लिश शिकताना एकाच मनात असले पाहिजे कि इंग्लिश मधील ज्ञान मराठीत आणून मराठीला अधिक संपन्न बनवायचे आहे आणि इंग्लिश हि झुलू , आफ्रिकन, रोमनिअन, चीनी, अरबी भाषे प्रमाणेच शुद्ध परकी भाषा आहे. शुद्ध उपरी ...जर आपण या सर्व भाषा बोलता येत नसल्याचा न्यूनगंड बाळगत नाही. मग इंग्लिश बोलता येत नसल्याचा का बाळगायचा ????.महाराष्ट्रात मारही भाषे व्यातीतिरिक्त कुठच्याही इतर भाषेचा मागमूस दिसत कामा नये इतके कट्टर जर आपण झालो तरच मराठी भाषा वाचणे शक्य आहे."

    See the comment thread

    Reply to this email to comment on this link.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete