Wednesday, April 13, 2011

खबरदार अण्णा पुन्हा उपोषण कराल तर,,,,,,पार्ट ६

||श्री नथू रामाय नमः||
आदरणीय अण्णा
स .न.वी.
वी. पत्रास कारण कि,
माझ्या परीने मी आपल्या आंदोलनाला पाठींबा द्यायचा प्रयत्न केला खरा
मी अण्णा हजारे म्हणत मुखवटा हि चढवला
आणि त्या मुखवट्या मागचा माझा खरा चेहरा माझ्या मित्राने मला दाखवला
आज सकाळीच माझा मित्र आला आणि तो जे बोलला त्याने मीही विचार केला
तो बोलला सुनील तुझे लेख खूपच चांगले आहेत पण जमल्यास अण्णांना सांग
आमच रक्त बदला भ्रष्टचार हा असा जाणार नाही,,,,,,
ते फांद्या तोडत बसलेत त्यांना म्हणाव त्यात तुमचा वेळ जाईल
थेट मुळावरच घाव घाला,,,,,,,,,

आणि मी विचार केला तो तुम्हाला सांगायचा
कालच्याच एका ब्लोग मध्ये मी म्हणालो होतो ज्यांनी कुणी
आयुष्यात भ्रष्टाचार केला नसेल त्यांनीच अण्णांना पाठींबा द्यावा
अन्यथा तो एक नवा भ्रष्टाचार ठरेल ,,,,
पण मी ,,?
मी स्वतः याचा विचारच नाही केला कि कुठे
मी हि धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ आहे,,?
माझा जन्म झाला आणि
आया बायांच्या हातात चिरीमिरी ठेवली आणि मी बाहेर आलो,,
दोनचार वर्षाचा होत नाही तोच एक दिवस माझे वडील मला शाळेत
घेवून गेले टेबला खालून हळूच बंडल सरकवल तस हळूच
शाळेचा दरवाजा मझ्यासाठी उघडला गेला,,,
कसाबसा १०वि झालो आणि नेमके ५% कमी पडले
कॉलेज मध्ये मग ५०००० दिले आणि शिक्षण पुढे चालू झाल,,,,,,,
पण येथ पर्यंत माझा नेमक विशपुरुष तयार झाला होता,,,,
ज्याला ईतकच कळत होत येथे आता या क्षणाला मी जर काही चिरीमिरी
नाही दिली तर माझ काम होणार नाही ,,,
तेव्हा खबरदार अण्णा उपोषण कराल तर,,,,
आता परवाच बघाना मी नोकरीला लागलो त्यासाठी परत
मी काही रुपये खर्च केले कारण मला हित होत
उद्या एकदा नोकरीला लागलो कि मी खोर्याने ओढणार पैसा ,,,,
आणि सुरवात हि केली कि मी ,,,
पहिल्याच पगाराला मी नवी कोरी मोटार सायकल
आणि दोनवर्षात चारचाकी दारात उभी राहिली
ती घेवून निघालो मी फिरायला तर सिग्नल तोडला ,,,,,,
झाल ५० रुपयात पटवल पोलिसाला ,,,,
अण्णा अहो वेळ आहे कुणाकडे ?
नसती झनझट करायला? मला यात कहीही वावग वाटल नाही,
पुढे निघालो म्हंटल नवी गाडी घेतली तर सिद्धीविनायकाला जावू,,,,,
हि गर्दी ,,,,,? मग खिशात हात घातला आणि काय चमत्कार ,,,,,,?
देव सुद्धा शरण आला रांगेतल्या सर्व भक्तां बाजूला सारून
आधी मला त्यांनी दर्शन दिल आता बोला ,,,,
अस आम्ही रोज करतो अण्णा आणि आम्हाला ते वावग वाटत नाही
आमच्या सोयीचा असेल तो भ्रष्टचारहि
शिष्टाचार असतो अण्णा ,,,,,,,
तेव्हा खबरदार अण्णा उपोषण कराल तर,,,,
राजकारणी घाबरत असतील तुम्हाला तुम्ही त्यांचा पर्दाफाश करता म्हणून
पण आम्ही ,,आम्ही नाही हा घाबरत तुम्हाला
तुमचा दर्शन झाल कि टीव्ही बंद करतो अहो जगाचा न्याय आहे
पकडला तो चोर आणि जो पकडला नाही जात तो साव
आणि आम्हाला पकडायला तितका वेळ आहे का तुमच्या कडे ?
तो पर्यंत आम्ही सावच मग का तुमची दादागिरी सहन करायची ?
तेव्हा खबरदार अण्णा उपोषण कराल तर,,,,
म्हणून म्हणतो अण्णा
जमलच तर आमच रक्त बदला ते उपोषण वैगेरे करायच्या
भानगडीत पुन्हा पडू नका आमच्यावर त्याचाह काहीही उपाय होत नाही
अपय मात्र तुम्हाला होईल आणि आम्हाला तो नकोय
कारण लहान पाणी ऐकल होत या पृथ्वीचा डोलारा
शेषनागावर आहे तो डळमळला कि येथे भूकंप होतात
त्सुनामी येते वादळ वार येत होत्याच नव्हत होत ,,,
तेव्हा खबरदार अण्णा उपोषण कराल तर,,,,
आज तुमच्या कडे पाहिलं कि कळत तो शेषनाग तुम्हीच आहात
तुमच्या सारख्या अनंत शेष नागांच्या जीवावर तर हि
पृथ्वी तरलीय म्हणून तुम्ही उपोषण करू नका
आम्हाला तुमची नाही आमची काळजी आहे
या तुमच्या  उपोषणाने पृथ्वीच आसन डळमळीत झाल तर आम्ही जायचं कुठे?
हि जी आम्ही प्रत्येक जण बे हिशेबी मालमत्ता जमवतो
ती ठेवायची कुठे?
तेव्हा खबरदार अण्णा उपोषण कराल तर,,,,
अहो दान जस सत्पात्री असाव तसाच उपोषणही
भैस के आगे बिन बाजानेने से क्या फायदा?









5 comments:

  1. Malahi ek sangayach aahe... tumhi Anna Hajare Trust ya trust chi kadhi chaukashi keli ahe ka? keli nasel tar kara.. Sureshdada Jain ni khulasa kela hota tyababatit. To hi milatoy ka bagha.

    ReplyDelete
  2. तिरुपती कॉम्प्युटर खर आहे तुमच म्हणन पण
    मला जे म्हणायचे ते वेगळच आहे आपण सारेच भ्रष्टाचारी आहोत
    तेव्हा आपण स्वतः पासून सुरवात करूया मग ईतरान कडे बोट दाखवूया
    भ्रष्टाचारी मग ते अण्णा असले काय ,सुरेश दादा असले काय
    आणि तुम्ही आम्ही असलो काय फरक काय एक सापनाथ तर दुसरा नागनाथ

    ReplyDelete
  3. #
    Shashank Gore like this.
    #

    *
    Pravin PuneIndia १) अण्णा नि वेळ योग्य निवडली(after the world cup victory & before IPL)
    २) भ्रष्ट पत्रकार गाफील राहिले

    पुढच्या वेळेस त्यांना कुत्र पण भाव देणार नाही. करून पाहवे त्यांनी परत एकदा. कॉंग्रेस सारखे ते पण भ्रष्ट आहे.
    Yesterday at 12:28am · LikeUnlike
    *
    Sunil Bhumkar pravin mi anna baddal nahi bolat nit vach mi aplyalach doshi thrvat aahe
    Yesterday at 12:29am · LikeUnlike · 1 personLoading...
    *
    Pravin PuneIndia सुनील मी तुझा लेख नाही वाचला अजून तरी , पण मी माझे व्यक्तीक मत सांगितले आहे.
    Yesterday at 12:31am · LikeUnlike
    *
    Sunil Bhumkar ok pan vachun bolshil tar adhik changale
    Yesterday at 12:32am · LikeUnlike · 1 personPravin PuneIndia likes this.
    *
    Pravin PuneIndia आयुष्यात भ्रष्टाचार केला नसेल त्यांनीच अण्णांना पाठींबा द्यावा ===> मग अण्णा तरी अण्णांना पाठींबा देतील का ? :)
    Yesterday at 12:34am · LikeUnlike
    *
    Sunil Bhumkar maz tech mhana aahe
    Yesterday at 12:35am · LikeUnlike · 1 personLoading...
    *
    Pravin PuneIndia सुनील मित्र लेख छान आहे. विचारणा वाव देणारा आहे.
    Yesterday at 12:36am · UnlikeLike · 1 personLoading...
    *
    Pravin PuneIndia मी आजच एका स्पेन मधील भ्रष्टाचार विषयी लेख वाचला. सगळीकडे भ्रष्टाचार आहे. भारताने १५० + वर्ष गुलामगिरीत काढले त्यामुळे भ्रष्टाचार खूप माजला तो रक्तात भिनला ते मान्य पण तो कमी करण्या साठी पण तेवढाच वेळ लागेल कितीही गांधी,हज्जारे आले तरी.

    खरे तर भ्रष्टाचार कधीच जाणार नाही कारण तो एका गुण(अवगुण असला तरी ) आहे. हुम्म्म आपण फक्त एकाच करू शकतो योग्य शिक्षण(पुस्तकी नाही) घेऊन, देऊन त्याला कमी करू शकतो.
    Yesterday at 12:40am · UnlikeLike · 3 peopleLoading...
    *
    Pravin PuneIndia १) अण्णा नि वेळ योग्य निवडली(after the world cup victory & before IPL)
    २) भ्रष्ट पत्रकार गाफील राहिले

    पुढच्या वेळेस त्यांना कुत्र पण भाव देणार नाही. करून पाहवे त्यांनी परत एकदा. कॉंग्रेस सारखे ते पण भ्रष्ट आहे.
    Yesterday at 12:43am · LikeUnlike · 1 personLoading...
    *
    Manoj Joshi nice one man1
    2 hours ago · Like

    ReplyDelete
  4. सुनिल जी, उपहासात्मक फ़ार सुंदर लिहता; मला वाटत भ्रष्टाचार त्स्व्हाच थांबेल जेव्हा आपण वेटरला टिप (बक्षिसी) द्यायची बंद करु. कारण आता बक्षिसाची मागणी व्हायला लागली आणि तेव्हाच भ्रष्टाचाराचा जन्म झाला.
    बाकी तुम्ही छान लिहिता, प्रश्न एवढाच पडतो की याला विडंबन म्हणावं, टीका म्हणावी की सत्यकथा?

    ReplyDelete