Thursday, April 21, 2011

कायद्याचे हात बंदुकी पर्यंत

||श्री नथुरामाय नमः ||
अर्थात लोकशाहीची विटंबना,,,,,,
अर्थात जैतापूरच मैतापूर,,,,,
अर्थात दंडुकेशाही ,,,,,,
अर्थात मानवी हक्काची खांडोळी,,,
अर्थात जयराम नावाचा बोलका पत्थर ,,,,

आणि सरकार आपल्या शब्दाला जागल जैतापूरच मैतापूर केल.
तेव्हाच ते शांत बसलं,,,
जगातील अनेक अणु तज्ञांनी भारतातील अणुभट्ट्या सर्वाधिक असुरक्षित म्हंटले आहे..
जैतापूर सारख्या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाल्यास अनेक किलोमीटर चा पूर्ण भाग निर्मनुष्य करावा लागेल
संपूर्ण पश्चिममहाराष्ट्र किरणोत्सर्गाने दुषित होईल....

 जैतापूर भागामध्ये २००९ पासून ९२ वेळा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत.
उद्या जपान सारखा भूकंप जैतापूर मध्ये झाला तर आख्खा महाराष्ट नष्ट होवू शकतो.
महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगत आहे कि जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट ला देवून
भारत सरकार ने महाराष्ट्र ला मदत केलेली आहे.
मुळात हा प्रकल्प गुजरात, कर्नाटक .तामिळनाडू,केरळ.आंध्र प्रदेश या राज्यांनी आपल्या राज्यामध्ये उभा करायला नकार दिला होता.
शेवटी भारत सरकार ने हा जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट जनतेच्या बोकांडी मारलेला आहे

अणुप्रकल्प हा समुद्र किनारी असतो कारण त्या प्रकल्प मधून बाहेर टाकले जाणारे अनु जल समुद्राच्या पाण्यामध्ये सोडले जाते.
कोकणातील सुंदर समुद्र किनारा ,तेथी सुंदर निसर्ग या जैतापूर प्रकल्प मुले कायमचा नष्ट होवू शकतो.
हजारो कोटीचा हा जैतापूर प्रकल्प असल्यामुळे आणी अमेरिकेचा दबाव या दोन कारणामुळे
महाराष्ट्र सरकार कोकणातील जनतेच्या मुळावर उठलेली आहे .
पैसे घेवून बातम्या देणार पत्रकार आणी मिडिया जाणूनबुजून
बदनामीच्या बातम्या देत आहेत.

ऐनर्रॉन ने देशाच काय भल झाल कुणाच भल झाल माहित नाही
परंतु पुढच्यास ठेच मागचा शहाणा याचा निदान जपान वरून तरी विचार करावयास काहीच हरकत नव्हती,,,,
जैतापुरातील माडबन परिसरातील लोकांचा या प्रकल्पास कडाडून विरोध आहे.
अणुऊर्जा प्रकल्पाच्या विषारीपणामुळे त्यांची शेती, आंबा बागायती कायमच्या नष्ट होतील ही भीती तर आहेच पण
या अणुऊर्जेमुळे बाहेर पडणार्‍या किरणोत्सर्गामुळे भावी पिढ्यांचा विध्वंस होईल ही भयंकर भीती असल्यामुळेच हा विरोध आहे.
पण शेतजमिनी जीवनाचे स्मशान करून उद्योग उभारणे एका बाजूला मानवी हक्काची कव्वाली गायची व दुसर्‍या बाजूला
जैतापुरातील मानवी हक्काची खांडोळी करायची हे कसले धोरण?
मानवी हक्क की काय म्हणतात ते फक्त जम्मू-कश्मीरातील पाकड्या अतिरेक्यांच्या बाबतीतच किंवा
मुंबई-गुजरातेत पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या ‘लांड्या’ अतिरेक्यांनाच आहेत काय?
बाकी इतरांनी कसेही मरावे व मरताना अन्यायाविरुद्ध ‘ब्र’ही काढू नये असे दिल्लीश्‍वरांचे म्हणणे आहे काय?
जैतापूरची जनता आक्रोश करीत आहे, टाहो फोडून सांगत आहे की, अणुऊर्जेचा हिरोशिमा-फुकुशिमा बॉम्ब आमच्या आयुष्यावर टाकू नका.
पण लोकशाहीत सामान्य लोकांचा आवाज आणि आक्रोश दडपण्यासाठी सरकारने अत्यंत खालची पातळी गाठली आहे.
जैतापूर ग्रामसभांनी ठराव करून सांगितले की, हा प्रकल्प आम्हाला नको.
ग्रामसभा म्हणजे गावची संसद. पण या ग्रामसभेच्या भावना जयराम रमेश मानायला तयार नाहीत.
कायद्याने ग्रामसभेला अधिकार दिले आहेत,
पण तो मुद्दा येथे म्हणजे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात चालणार नाही अशी टगेगिरीची भाषा जयराम यांनी केली.
लोकभावनेची अशी टिंगलटवाळी करून या जयरामने लोकशाही व राज्यघटनेची विटंबनाच केली आहे.
जैतापूर प्रकल्पास लोकशाही मार्गाने विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलीस अतोनात त्रास देत आहेत.
त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकून त्यांना अटका होत आहेत. तडीपार्‍यांचे फतवे निघाले आहेत.
म्हणजे लोकशाहीचे स्वरूप आता ठोकशाहीत बदलले आहे व
जनतेचा विरोध मोडून बेकायदेशीरपणे या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
विरोधी बाजू ऐकायचीच नाही व विरोधी सूर काढणार्‍यांना ठेचूनच काढायचे.
ग्रामसभांचे म्हणणे ऐकायचे नसेल तर पंचायतराज खाते बंद करा.
मग पंचायतराजची नाटके चालवताच कशाला? जैतापुरात २०३० पर्यंत टप्याटप्प्याने १६५० मेगावॅटचे सहा संच येणार आहेत.
जपानमधील फुकुशिमा अणुप्रकल्पातील भयावह अनुभव लक्षात घेता,,
जैतापूरमधील संपूर्ण प्रकल्पासाठी एकच सुरक्षा यंत्रणा न उभारता
सहा संचांसाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे रमेश म्हणतात.
म्हणजेच धोका मोठा आहे व राहणार.आणि तरीही,,,,,,हा
बोलका पत्थर
त्या अणुभट्टीच्या तोंडी कोकणी जनतेला का द्यायला निघाला आहे ?
फुकुशिमात या अणुऊर्जा प्रकल्पाने भयंकर संहार केला व जपानची जनताही अणुऊर्जेविरुद्ध रस्त्यावर उतरली.
संयमाच्या बाबतीत जपानी जनतेचा हात कोणीही धरणार नाही.
त्या जपानी जनतेच्याही संयमाचा बांध सुटला व त्यांनी अणुऊर्जेविरुद्ध दंड थोपटले.
जगभरात विरोध होत असताना जयराम अणुऊर्जा प्रकल्पाचा पाळणा का हलवीत आहेत?
ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही नुकतेच सांगितले की,
‘फुकुशिमातील संहार पाहिल्यानंतर जैतापूरविषयी आपण सावध पावले उचलायला हवीत.
’ शिंदे यांच्यापाठोपाठ याच जयराम रमेशने जैतापूरविषयी नरमाईची भूमिका घेतली.
‘फुकुशिमापासून आपण धडा घ्यायला हवा व एकाच ठिकाणी एवढा मोठा प्रकल्प उभारावा की नाही याचा फेरविचार करायला हवा.
’ ही शहाणपणाची भूमिका घेणारे जयराम इतक्या लवकर पलटी मारू शकतात हे धक्कादायक आहे.
उपोषणास बसणार्‍या नेत्यांपुढे सरकार चार दिवसांत गुडघे टेकते व आक्रोश करणार्‍या जैतापूरवासीयांना चिरडण्याचे आदेश देते.
लोकशाहीचा डंका वाजला म्हणतात तो हाच का,,,,,,,,?
काल परवा अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध जैतापुरात आंदोलनाचा भडका उडाला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नराधमी सरकारने आज सैतानालाही लाज वाटेल असे अमानुष अत्याचार केले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकीर्दीवर पडलेले हे रक्ताचे डाग त्यांना कधीच पुसता येणार नाहीत..........
ह्या अशा तर्हेने कोकणचा क्यालिफोर्निया करणार का?कोकण वाचवा जैतापुर रोखा ...


No comments:

Post a Comment