Saturday, March 20, 2010

गणपा ह्ये शेलिब्रीटि म्हंजी काय असत?

गणपा ह्ये शेलिब्रीटि म्हंजी काय असत राव ?
काल बगा सांच्याला गावच्या चावडीवर 
गप्पा माराय बसलू हुतो आण माझ्या मैतारान ह्यो परसन हिचार्ला 
महाया दुसर्या मैतराला त्याच नाव हाय शिरपा ...
आण शिरापांन सांगीटल शेलिब्रीटि म्हंजी काय असत ते,,,,
हे पाए गणपा शेलिब्रीटि म्हंजी बग,,,
१-त्यों बी आपल्या सारखाच शेतकरी अस्तुया ,,
पण ह्ये बेन हाय नव्ह ह्ये सरकार र आपल 
त्याला बघ बेघर करतया त्ये म्हंजी शेलिब्रीटि,,,,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग 
ज्याची साठी पार झालिया तरी लोकांच्या दारावर 
जावून श्यान गोल्या चालकेट  ईकतोया,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग
शिनुमात नातीच्या वयाच्या पोरी संगाट  
ज्याच अस्ताया झेंगाट
शेलिब्रीटि,,म्हंजी बग 
जे सोताच्या बापाला न्हाई  जमल 
जे सोताच्या पोराला न्हाई जमल 
त्ये समद जो करून दवातो त्यों म्हंजी,,,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग 
फर्स्ट हैण्ड घरात आण सेकण्ड हैण्ड ज्याच्या दारात
असती त्यों ,,,,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग 
 जो सोता लम्बू अस्तुया आण ज्याची बायको 
गुड्डी बूढी अस्तिया त्यों,,,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग 
सोता तर चुकतोच वर बायकुच्या चुकांवर
जो सोता माफी मागातु त्यों,,, 
शेलिब्रीटि,,म्हंजी बग 
जो कंडोम बरोबरच सोताच्या पोराच लग्न बी ईकतो 
त्यों म्हंजी ,,,,?
२-आता दूसरा 
शेलिब्रीटि,,म्हंजी बग
जो सतत किरकेट खेळत असतु,,,
चोव्का आण छका जाव मरतो तवा 
त्वांड वर करून आभालातल्या बापा कड़े बघतो,,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग  
आधी मधी जाव बी टाईम मिळल
तवा त्यों बी कोक आण पेप्सी ईकतो,,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग 
आणखी थोडा वेळ असाल तर 
बूस्ट काय त्ये ईकतो वर दोरीच्या उड्या बी मरतो,,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग 
सम्द्याना ब्याटणी उत्तर देतु आण
मुंबई सर्वांची म्हान्तु,,,,
शेलिब्रीटि,,म्हंजी बग
आर आर बस की आता तुज त्वांड हाय का भिताड 
बर त्ये जावू दे मला एक सांग 
म्हणजे ह्ये दोग बी घरी ईवुन सामान ईक्नारे 
ईक्रेते म्हंजी सेल्समन हायेत म्हण की,,,
मग मला ह्ये कळल न्हाई
थोडक्यात म्हंजी 
डोक्या पास्न पाया पतुर ह्ये समद सामान ईखातात 
तर ह्यांच त्या पुण्यातल्या ८३ व्या साहित्य समेलनात ह्या दोगांचा काय काम हाय? 
ह्ये बाबा ह्ये नाग ईचारू ईचार करुनश्यान डोस्क फुटायची पाली आलिया 
आण तू कशापाई डोस्क खातुया ?
गप गुमान जा बगु तुझ्या घराला 
ह्यो सुनील बी ह्योच प्रस्न हीथ घिवुन आलाया 
आण तू कशा बिगर डोस्क खावु रहिलासा जाकी घराला 
   

No comments:

Post a Comment