Monday, August 29, 2011

अण्णा कि पाठशाला ,,२ मै हु अण्णा ,,

||श्री नथुरामाय नमः||
दिल्लीला गेलो होतो अण्णांना पाठींबा द्यायला
त्या दरम्यान आलेले अनुभव भाग २
परवाच मी अण्णा टोपी विषयी लिहिल होत .
आज तीच टोपी आणि हातात तिरंगा घेवून मी जेव्हा दिल्लीच्या गल्ली बोळातून फिरत होतो .
तेव्हा मला विलक्षण अनुभव आला
येथून जाताना मला माझ्या मुलाच कौतुक वाटत होत मी येणाऱ्या जाणार्या
सार्या माझ्या मित्रांना मी सांगत होतो अरे माझ्या मुलाने भ्रष्टाचाराची हंडी
फोडायचं ठरवल आहे त्यासाठी त्याने काही पोस्टर बनवले आहेत
त्यावर लिहिल आहे मै हु अण्णा ,,देश का आचार भ्रष्ट आचार,,
अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,,,
मी कोड्यात पडलो कारण त्याच वय पाहता मी मनात म्हणालो
याला काय कळतो काळा पैसा आणि भ्रष्टाचार ?
पण दिल्लीत गेलो आणि माझीच विकेट पडली
माझा मुलगा निदान १३\१४ वर्षाचा असेल पण तिथे गेलो तर
रस्त्याने चालताना प्रत्येक ३\४ वर्षाचा मुलगाही मला पाहून
त्या वेषाला डोक्यावर अण्णा टोपी, आणि हाती तिरंगा ,,,,,,
लगेच तो म्हणायचा ,,
अण्णा तू आगे बढो हम तुम्हारे साथ है,,,
अण्णा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है,,
मै भी अण्णा तू भी अण्णा अब तो सारा देश है अण्णा ,,,,,,,
माझा गर्व क्षण खाली आला अरे काय कळत होत ?
त्या चिमुरड्यांना ?

आज अण्णांना जे भाग्य लाभलाय ते या देशातल्या एकही नेत्याला नाही लाभल .
आणि लाभणार हि नाही,,
आज सारा भारत उच्चरवाने आवाज देत है मै हु अण्णा ,,,,,,,

या देशातला कुठल्याही पार्टीचा माणूस गर्वाने आपल्या नेत्याच नाव
घेवून मी तो नेता आहे अस बोलू शकत नाही कारण ,,,
सगळ्यांनाच माहित आहे आपल्याही नेत्याचे पाय मातीचेच आहेत.
आणि अण्णा,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
म्हणजे मूर्तिमंत निस्पृहता ,,
"उदारास्य तृनं वित्तं ,
शूरास्य मरनं तृनं ,
विरक्तस्य ट्रुम भार्या ,
निस्पृह्स्य तृनं जगत  "
उदार माणसाला धन तुच्छ वाटते,
शूराला मरण तुच्छ वाटते,
विरक्ताला स्त्री तुच्छ वाटते,
आणि निस्पृहाला सार जग तुच्छ वाटते अण्णा तसेच तर आहेत .

आणि यासार्याचा अनुभव सारा देश घेत होता .
आज सार्या देशाला अण्णांच्या रुपात दुसरा साधू मिळाला आहे.(गांधी नव्हे?)
आधी मिळाले होते विनोब भावे,,,,,,,,,,
गांधी टोपी विषयी तर काळ संगीतालाच आहे
पण हातात तिरंगा घेतल्यावर सुद्धा विलक्षण अनुभव आला
वाटल खरच आज माझ्या हातात आहे तो देशाचा तिरंगा आहे..
आज पर्यंत वाटायचं नाही काही झाल तरी हा कोन्ग्रेस्सी झेंडा आहे ,
पण ज्या आदराने लोक पाहत होते माझ्या कडे त्याला तोड नाही
अगदी मुरली मनोहर जोशींबरोबर हि मी काश्मीर मध्ये तिरंगा
फडकवायला गेलो होतो अगदी त्याही वेळी दिल्लीत हा अनुभव आला नव्हता .
मला त्या वेशात बघितलं कि लगेच अरे अण्णाजी चलो आगे चलो आपको कौन रौकता है .
यामुळे खरतर बैलगाडी बरोबर चालणार्या कुत्र्याला जस वाटत कि मी बैलगाडी खेचतोय
माझी अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती.
लोकांच ते प्रेम ते मला नव्हत अण्णांना होत
हातात धरलेल्या झेंड्याला होत
डोक्यावर घातलेल्या अण्णा टोपीला होत.
अण्णांच्या बाजूने उभा राहणार्याला होत.

आव अण्णाजी बैठो ,,पोलीस लष्कर कुतूहलाने विचाराचे
कि क्या हाल है अण्णाजी का बताव हमे तो कुछ पता नाही चालता.
कुछ मसाला हल हुवा के नही?
तिथली घोषणाच होती ये अंदर कि बात है पुलिस हमारे साथ है...
आणि तीथे रामलीला वर तर ,,,,,,
सारे मै हु अण्णा नव्या महाभारताच्या लढाईसाठी सज्ज होते .
एका अण्णा साठी ,,,,,,,मै हु अण्णा  म्हणत होता .
सार्या दिल्ली करांनी त्यासाठी सक्तीची आठ दिवसांची सुट्टी घेतली होती,,,
लहान थोर सारेच मै हु अण्णा चा नारा घुमवत होते ,,,,,
शाळा कॉलेज मधील मुलमुली शाळा कोलेज बुडवून रोज हजर राहत होते,
 चांगले सुटा बुटातले लोकही त्या दिल्लीच्या पावसात आणि
रामलीलाच्या चिखलात पाय रोवून उभे होते,,,,,
एका अण्णा साठी ,,,,,,,मै हु अण्णा
म्हणत होता .
सारे दिल्लीकर तुम्हाला काय हव नको ते पाहायला तयार होते
चहा पाणी जेवण नाष्टा फळ फळावळ,  सारे हात जोडून
आग्रहान देत होते लोजी अण्णाजी म्हणत होते ,
महापलिका तर सोडा येणारा सुद्धा कुठेही कचरा होणार नही स्वतः काळजी घेत होता .
एका अण्णा साठी ,,,,,,,मै हु अण्णा म्हणत होता .
हे सार प्रेम अनुभवताना एक खंत मात्र जुनी जखम ताजी करून गेली,,,
आजची हि सारी मदत त्यावेळी पानिपतावर मराठ्यांना मिळाली असती तर,,,,,,,,,?
नुसत्या विचाराने अंगावर रोमांच उभे राहतात

आज अण्णा जसे एक मराठा माणूस देशाच्या भल्यासाठी लढत आहेत .
तसेच मराठेही त्यावेळी देशाच्या भल्यासाठी महाराष्ट्र सोडून
दिल्लीला आले होते हरामखोर नजीब्या आणि अब्दालीला धूळ चरायला ,,
पण हाय रे दैवा दिल्लीकरांना काय किंवा उत्तरेतील एकही प्रांताला राजाला
मराठ्यांना मदत करावी असे वाटले नही आणि आपल पानिपत झाल,,,,,
पण त्या अपमानाचा बदला अण्णा सारख्या एका सध्या माणसाने
घेतला असच म्हणाव लागेल त्यावेळी योग्य मदत दिल्लीकरांनी
उत्तरेतील राजे राजवाड्यांनी केली असती तर आजच चित्र नक्कीच वेगळ असत .
सारे हरामखोर भ्रष्टाचारी नेतेही याच जातीतले नजीब्या आणि अब्दालीच्या .
असो हि परिवर्तनाची लढाई सार्यांची होती आणि सार्यांनी मिळून जिंकली
हेही काही कमी नही......

एका अण्णा साठी ,,,,,,,मै हु अण्णा .


3 comments:

  1. दिल्लीचे हि तख्त राखतो महाराष्ट्र माझा

    ReplyDelete
  2. आणि अण्णा,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    म्हणजे मूर्तिमंत निस्पृहता ,,
    "उदारास्य तृनं वित्तं ,
    शूरास्य मरनं तृनं ,
    विरक्तस्य ट्रुम भार्या ,
    निस्पृह्स्य तृनं जगत "
    उदार माणसाला धन तुच्छ वाटते,
    शूराला मरण तुच्छ वाटते,
    विरक्ताला स्त्री तुच्छ वाटते,
    आणि निस्पृहाला सार जग तुच्छ वाटते अण्णा तसेच तर आहेत .

    ReplyDelete
  3. उदार माणसाला धन तुच्छ वाटते,
    शूराला मरण तुच्छ वाटते,
    विरक्ताला स्त्री तुच्छ वाटते,
    आणि निस्पृहाला सार जग तुच्छ वाटते अण्णा तसेच तर आहेत .
    आणि यासार्याचा अनुभव सारा देश घेत होता .
    आज सार्या देशाला अण्णांच्या रुपात दुसरा साधू मिळाला आहे.(गांधी नव्हे?)

    ReplyDelete