Tuesday, August 2, 2011

ईलाज होनेसे मतलब है,,,,

||श्री नथू रामाय नमः ||
ईलाज होनेसे मतलब है,,,,
स्वामी प्रसादानंद (उर्फ)
प्रसाद कुलकर्णी, गुड मोर्निग या सदरात
११ जुलै २०११ च्या सकाळच्या वृत्तपत्रात आपण अक्कल पाजळलीत
आणि म्हंटल आपण हि आपल्या सुरीला जरा धार करू या ,,,
असा बत्तथड दगड परत कुठे मिळणार आपल्या सुरीला धार करायला ?
पण मध्ये बरीच एक एक काम निघाली आणि राहून गेल ,,,,
तर सांगायचं अस
आपल तत्वज्ञान ,बहुमोल विचार ,चिंतन वाचले आणि
भरून आल तो भगवान श्री कृष्ण खरा द्रष्टा म्हंटला पाहिजे
त्याला पक्क माहित होत कलियुगात आपल्या सारखे बोरुबहाद्दर 
त्याला लालु यादावच्या पंगतीला बसवतील म्हणून सार्या यादवान सकट त्याने द्वारका बुडवून टाकली ,,,,,,,,,,

"भारतीय राजकारणात लालुन सारखा दुसरा व्यवहारी माणूस नाही
एका ठराविक मर्यादे पलीकडे आपण तत्वांना चिटकून बसु नये.
आपली तत्व लवचिक असावीत  कायद्यांना वास्तवाची झालर असावी .
गरज पडली तर शिष्टाचारांना ,संकेतांना बगल द्यावी .
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर व्यवहारी असल पाहिजे.
आणि या सार्या व्यवहारी माणसांचा बाप श्री कृष्ण,,,,,,,,,,,?
आणि समर्थनार्थ दाखले देखील,,,,,,,?
जस काही चालू चालीसा आणि महाभारत कोळून प्यायले आहत?
बर एकट्या श्री कृष्णाला नाही तर सार महाभारतच आम्हा वाचकान समोर मांडलत.,,,,,,द्रोणाचार्य,धर्मराज,अश्वथामा, 

यानाही लालूच्या मांडीला मादी लावून बसायचं भाग्य मिळवून दिलत
आपण थोर आहत आपण दाखवून दिलत अक्कल घोड्या पुढे कशी धावते ती
काय पण आपली अक्कल आपल लालू प्रेम कदाचित आम्ही समजू    शकतो. परंतु त्याची बरोबरी श्री कृष्णा बरोबर ?
आणि समर्थनार्थ दाखले देखील,,,,,,,?
आणि शेवटी लाकडाचा दांडा कोपर्यातला खोबणीत फिट्ट बसत नसेल तर थोडा कापावा लागतो .
फिट आणि सलामत राहायचं असेल तर थोड लवचिक बनायला शिका
ईलाज होणे से मतलब है खरच हे ईतका सोप्प आहे ,,,,,,?
मग हळूच मनात विचार आला आपण अजून
रामायण काळा पासून असता तर कुणाला काय काय काय सल्ले दिले असते ?

रामाला म्हणाला असता अरे रामा
सीतेला पळवल तर काय झाल राहणार तरती बायको म्हणूनच न?
मग बायको तुझी असली काय आणि ती रावणाच झाली काय?
बायको आहे ना बस तर मग,,,,,,,,,
नशीब महाराजांच्या काळात नव्हता नाहीतर आपण त्यांना हि बोलला असता
काय करायचे किल्ले घेवून आणि ते तुम्ही घेतलत काय आणि
मोघलांनी घेतले काय राहणार तर महाराष्ट्रातच  ना?
किल्ल्ये येथे राहण्याशी मतलब ,,,,,,,,,
कसबाला म्हणाल बा कसबा
"तू खुशाल बॉम स्पोट कर येथे मुंबईत केले काय भारतात 

आणि केले काय ?
बॉम स्पोट होनेसे मतलब है,,,,,,,,,,,,,,,
आदमी मरणे से मतलब है,,,,,,,,

कलमाडी तू आमच्या खिशात हात घालून चोरी केलीस काय
आणि आणि देशाला नागव केलस काय
लोकांना फसवण महत्वाच ,,,,,,
गोरगरीब जनता लुबाडली जाण हे महत्वाच,,,,,,,
आणि याच चालीवर हे सार मी तुमच्या बाबतीत हि बोलू शकतो
पण ,,,,,,,समजून घ्या मला काय बोलयाचे आहे ते ?
नाही तर सांगा मी समझवून सांगेन,,,,,,,,,,,,,
शेवटी काय ईलाज होनेसे मतलब ,,,

ज्या महाभागाने गाई गुरांचा चाराही नही सोडला
अशा लालूची तुम्ही भलामण करता ?
मी नाही तर माझी बायको ,मेहुणा ,तात्या नाना अप्पा जे कुणी त्याचे नातेवाईक असतील
त्यांची वर्णी राजकारणात लावून देशाला लुटलं तो बदमाश तुम्हाला
श्रीकृष्ण समान वाटतो?
निदान आई वडिलांनी तुमच नाव प्रसाद ठेवल याची तरी लाज बाळगा?
अरे वरून येताना थोडा तरी अकलेचा प्रसाद घेवून यायचं होत,,,


2 comments:

  1. amit gokhale to me

    show details 10:53 AM (10 hours ago)

    priya sunilji,
    computer madhe marathi lipicha font vaparta yet naslyane english lipi vaparat aahe. tevdhech engrajila marthit valavilyache samadhan. tumche blogs mi nehemi vachto. khup apratim asatat. mi te majhya mitranna forward pan kelet. hardik abhinandan. asech mails pathvit raha.
    amit gokhale

    ReplyDelete
  2. "भारतीय राजकारणात लालुन सारखा दुसरा व्यवहारी माणूस नाही
    एका ठराविक मर्यादे पलीकडे आपण तत्वांना चिटकून बसु नये.
    आपली तत्व लवचिक असावीत कायद्यांना वास्तवाची झालर असावी .
    गरज पडली तर शिष्टाचारांना ,संकेतांना बगल द्यावी .
    आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर व्यवहारी असल पाहिजे.
    आणि या सार्या व्यवहारी माणसांचा बाप श्री कृष्ण,,,,,,,,,,,?

    ReplyDelete