Friday, March 19, 2010

वेताळ आणि मी

वेताळ आणि मी  
या इंटरनेटच्या प्रेमात काय पडलो अज काल
मला देखिल वेताळ रोज भेटू लागला आहे
त्या राजा विक्रमादित्याला मढ़ी उकरायाची सवय आणि मलाही
असो तर काल तो नेहमी प्रमाने आला आणि माझ्या मानगुटीवर बसला 
आणि मला म्हणाला ,सुनील आज मात्र मी तुला खिंडित गाठले आहे 
आज माझ्या प्रश्नांची उत्तर नाही दिलीस तर माहित आहे ना?
तुझ्या डोक्याची शंभर शकल होतील आणि तुझ्याच पायाशी,,,,?
अरे बस रे मला माहित आहे सगळ पुढे बोल मी जरा घुश्यातच बोललो ,,,
आणि आज मी फसलो तुम्ही आज मायबाप मित्रहो मदत करा .
नाही तर माझ आज काही खर नाही ,,
तर झाल अस 
आज नेहमी प्रमाने 
मी ८३ व्या आखिल भारतीय मराठी समेलानाला 
सेलिब्रेटिन्ना बोलवायला बरोबर होते माझ्या 
श्री.अधीर गाडगिल (माफ करा सुधीर असे वाचावे )
म्हणून गेलो तर हा वेताळ आधीच तिथे हजर 
मला म्हणतो कसा समेलानाच मढ़ मी तुला अस उचलु देणार नाही 
आधी मला सांग ,,,,
१-या सेलिब्रेटिन्ना का बोलावले आहे यांचा साहित्याशी काय संबंध,,,?
२- आज पर्यंत कुठल्या चित्रपटसृष्टिच्या समेलानत कुठल्या साहित्यिकाला
सेलिब्रेटी म्हणून बोलवले आहे ,,,?
३-क्रिकेट विश्वात कुठल्या समारंभात कधी तरी सेलिब्रेटी म्हणून 
साहित्यिकाला बोलवले आहे,,,?
४-राजकार्न्यानी तरी कधी काली कुठल्या साहित्यिकाला 
सेलेब्रेटी म्हणून बोलावले आहे का,,?
आधी या प्रश्नांची उत्तर दे नाहीतर ,,,,,,?
मी म्हणालो वेताला अरे हे श्री .अधीर गाडगीळ(सुधीर) माझे मित्र 
ते म्हणाले चल म्हणुन ,,,
अरे त्याना सगळी गीळ -बीळ  माहित असतात सेलिब्रेटींची त्यांचा धंदा आहे तो 
म्हणु तर त्यांचा आडनाव गाडगीळ आहे 
माझ्या पेक्षा हेच तुला सांगतील अस म्हणून 
त्याच्या कचाटयातुन मी माझी मान सोडवीण्याचा
केविलवाणा प्रयत्न केला आणि मान वळवुन बघतो तो काय ,,?
श्री अधीर गाडगीळ (सुधीर यार,, आता पुन्हा नाही सांगणार समजल ना ?)
केव्हाच ढुंगनाला पाय लावून पलाले होते 
मला वेतालाच्या कचाट्यात अडकवून म्हणून मित्रहो ,,
आजच्या दिवस मला वाचवा वरील प्रश्नांची उत्तर असतील तर कळवा,
माझा ईमेल आहेच आपल्याकडे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे 
मदत कराल ना? आपला 



No comments:

Post a Comment