Wednesday, September 22, 2010

एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी


एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी
वृत्तसंस्था
Wednesday, September 22, 2010 AT 08:43 PM (IST)
नवी दिल्ली- अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकी हक्क प्रकरणीच्या निकालापूर्वीची खबरदारी म्हणून केंद्र सरकारने एकगठ्ठा (बल्क) एसएमएस व एमएमएस पाठविण्यावर पुढील तीन दिवसांसाठी बंदी घातली आहे. संपर्क मंत्रालयाने गृह मंत्रालयाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

पुढील ७२ तासांसाठी देशातील कुठल्याही भागात एकगठ्ठा एसएमएस वा एमएमएस पाठविण्यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेशपत्र संपर्क मंत्रालयाने मोबाईल दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या सर्व कंपन्यांना पाठविले आहे.

रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादग्रस्त जागेच्या मालकी हक्कासाठीच्या खटल्याचा निकाल २४ तारखेला अलाहाबाद उच्च न्यायालयात दिला जाणार आहे. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही अफवा पसरविण्याची संधी समाजविघातक घटकांना दिली जाऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, या निकालावरून कोणत्याही गैरकृत्यासाठी प्रवृत्त होऊ नये व सामाजिक सौहार्द कायम राखावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. 

 

1 comment:

  1. चाहे बाधायें लाख आये,
    मंदिर वही बनायेंगे !!
    जय श्रीराम.

    ReplyDelete