Thursday, October 21, 2010

निवडणूक आयोगाद्वारे जनहितार्थ ........

सध्या निवडणुकीचा हंगाम आहे 
नव्हे नव्हे तो आमच्या कडे 
बारमाही असतो निवडणूक मग ती 
पोटनिवडणूक असेल लोकसभेचे असेल, 
नगरसेवकाची असेल अगदी कुठल्याही प्रकारची
त्यासाठी काही काही नियम अटी .

१- उमेदवाराचे नाव.
----------------------------
२-आजचा पत्ता.
    जेलच  नाव
    कोठी नं .
    बिल्ला नं
----------------------------
३-राजकीय पार्टीच नाव
   (कृपया आधीच्या ज्या पार्ट्या सोडल्या असतील
त्याची क्रमवार नाव लिहा )
४-पार्टी सोडायचं कारण?
(कृपया कुठल्याही एकावर टिक करा )
---- त्या पार्टीतून का काढल ?
---- त्या पार्टीतून तुम्ही बाहेर निघालात कि
---- तुम्हाला काढाल गेल ?
---- काय केलत म्हणून तुम्हाला काढल गेल?
----तुम्ही कुणाला विकले गेले आहात का?
----या पैकी कुणीही नाही
----यापैकी सर्व बरोबर आहे मी सगळ केल आहे
५ - लिंग काय?
    १-पुरुष
     २-महिला
     ३- अन्य
      ४-मायावती
६ -राष्ट्रीयता
     भारतीय कि
     ईटालियन
७ -तुम्ही निवडणूक का लढवत आहात ?
     १-जनतेची सेवा करण्यासाठी?
     २-पैसे कमावण्यासाठी?
    ३- जेल मध्ये जाव लागू नये म्हणून?
     ४-पदाचा गैरवापर करण्यासाठी?
     ५-आपल्या आप्तांना जेल पासून वाचवण्यासाठी ?
 (वरील पैकी क्रमांक एक हे उत्तर असेल तर ,,,
कृपया आपले मेडिकल कागद जोडा कि तुम्ही वेडे नाहीत)
८-जनतेची सेवा करताना किती वर्षे झाली ?
    १- कधी केलीच नाही
    २- करायची ईच्छा नाही
     ३-माझे नातेवाईक हीच माझी जनता आहे
     ४-स्वतःची सेवा हीच मोठी सेवा      
९-तुमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल आहे का?
    १-हो
    २-नाही
(जर हो असेल तर गुन्हे आणि त्या बाबतची कायदेशीर कारवाई
केलेली कागद पत्र जोडावीत)
१०-तुम्ही कुठल्या घोटाळ्यात अडकला होता का?
११- तुमची वार्षिक कमाई काय आहे?
    १- १००\५०० करोड?
     २-५००\१००० करोड?
     ३-मोजू शकत नाही
(कृपया डॉलर ला रुपयात बदलून लिहा )
१२- तुम्ही देशा साठी काय करू ईछिता ?
खालील रिकाम्या जागी लिहा
(------------)
निवडणूक आयोगाद्वारे जनहितार्थ.

No comments:

Post a Comment