Wednesday, December 15, 2010

ऑनलाईन अंत्यविधी

दचकलात ना ? 
पण हे शक्य आहे
सकाळ मध्ये रोज बातमी  येतेय
गुजरातच्या धर्तीवर आधी बदलापूर मग महाराष्ट्रभर ,,,,,,,,,
तुमच्या आमच्या नाकर्ते पणाचा फायदा घेत
कोन्ग्रेस सरकार ज्या कुणाला थेट आपल्या माणसासाठी
स्मशानात जाता येत नाही त्यांच्या साठी हि खास सोय करणार आहे .
चला तर मग आता ऑन लाईन अंत्यविधीच्या कार्याला हात भार लावू,,,,,,
खरतर मरण आणि दारी तोरण असेल ते दार चुकवायचे नाही

अशी आपली परंपरा
मग तो शत्रू का असेना ,,,,,, 

पण माय बाप सरकारने तुमचा अमुल्य वेळ वाचवला आहे
तुमच्या प्रिय व्यक्तिच दर्शन घरबसल्या घ्या.
जमल्यास ते रेकोर्ड करून ठेवा आणि 

सवडीने त्या प्रिय व्यक्ती साठी अश्रू ढाळा.
कारण तुमचे चार अश्रू ते हि सरकारला खूप किमती आहेत.
ते असल्या फालतू कारणासाठी वाया जावू नये .
तुमचा स्मशानात जायचा वेळ वाचवा
या शुध्द हेतूने ते करत आहेत,,
कायद्याच्या पळवाटा चोरांनाच ठावूक असतात
अगदी त्या प्रमाणेच लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा उद्योग सरकार करत आहे.
आज देश भरात उघडकीस येणारा भ्रष्टाचार
रोजची लफडी,
टीव्ही वर येणाऱ्या बातम्या ,
त्यातून राजकारण्यांचा होणारा पर्दा फाश,,,,,
आणि त्यातून उफालणारा जनक्षोभ त्यांच्या डोळ्यातून पडणार्या
अश्रूत यांचे राज्य वाहून जावू नये त्यासाठी हा जालीम उपाय
कोन्ग्रेस सरकार करत आहे ,
तेव्हा मित्रांनो
आपल्या लाडक्या व्यक्तीचा अंत्यविधी 

ऑनलाईन पहा आणि दुखः विसरून जा.
मग भले आज पेट्रोल ३ रु. वाढले तुम्ही काही बोलू नका
रागावू नका कारण तुमच्या डोळ्यात दिसणाऱ्या रागावर
हा जालीम उपाय आहे ,,,,,,
बर यात गैर ते काय सारच ऑन लाईन पहायची सवय झाली आहे आपल्याला .
अगदी चवीन बघतो हि,
आणि या ऑन लाईन कार्यक्रमात आपली ,,,,,,?
राखी सावंत अगदी फिट्ट आहे .
तिच्या मुळे महाराष्ट्र देशात ओळखला जावू लागला आहे .
राखी सावंत म्हणजे महाराष्ट्र असा समज सर्वदूर पोहचला आहे .
कलर्स वर सेलिब्रेटिनची धमाल आम्हाला नवी नाही.
मालिकांमधला नायका नायिकांचा मोकळा ढाकळा वावर
कमरेखालचे विनोद ,,,,,,आपण सारे
पाहतच असतो कि. मग अंत्य विधी बघूं या कि!
बर मोबाईल आल्या पासून अशा ऑनलाईन गोष्टींना
बरेच सरावलेले आहोत (सुज्ञास अधिक सांगणे ना लागे)
तेव्हा हे सार पाहता सरकारला विनंती आहे ,,,,,,,,,
त्यांनी आता आमच्या मुला बाळांचा जन्म
त्याच बारस
त्याच शाळेत जाण
त्याच हसन रुसन रागवण,
त्याचा वाढदिवस
त्याची मुंज
आणि लग्न हि ऑन लाईन दाखवाव
आणि मग आणखी एक काम राहील कि राव,,,,,,,,,,?
अरे हनिमून तो हि दाखवावा कि आम्हाला ऑनलाईन ,,,,

आमच्या आप्त जणांचा हनिमून हि पाहू द्या कि?
त्यामुळे सरकारचा फायदाच होईल
हे
चालू सरकार,,,,,,
आमच्या दुखतच नाही तर सुखात हि सहभागी आहे
अस चित्र जनतेच्या मनात उभा राहील आणि ,,,,,,,,,
पुढच्या वर्षी आणखी जोमाने कोन्ग्रेस निवडून येईल .
हो नक्कीच येईल कारण जी अक्कल जनावराला आहे

ती आम्हाला नाही

आमच्या कडे गावात कोन्ग्रेस नावच गावात उगवत

जनावर त्याला तोंड लावत नाही कारण त्याने दुध कडू येत .

वास्तविक हे दुध आपण पिणार असतो पण जनावर

त्याला आपल्यासाठी तोंड लावत नाही आणि आपण

आपली नव्या पिढी समोर नेमका काय आदर्श ठेवणार आहोत?

आपल्या नाही नाही वाटत या आदर्श शब्दाला बदनाम करण्यात आपलाही तितकाच हात आहे?

आणि तास वाट नसेल तर चला तयारीला लागा

उद्या कदाचित सरकार तुमचा हनिमून हि ऑनलाईन दाखवेल........





  

1 comment:

  1. Starred
    www.Marathi Mann.in
    to me

    show details Dec 16 (12 days ago)

    mitra chhan ekdum jhakkkkkkkkkkkkkkkas

    ReplyDelete