Thursday, January 27, 2011

आईच अंगाई गीत नको तर शीला कि जवानी हवी

काल कुंकू मालिका पाहत होतो तशी ती मी आवर्जून पाहत असतो
पण काल जो त्या मालिकेने संदेश दिला ते पाहून डोक चक्रावल
खरतर हे कालच लिहिणार होतो पण थोडा कंटाळा केला आणि
आज परत संध्याकाळी एक २५\३ वयाची बी आपल्या मुलाला शाळेतून घरी जात होती .
आणि मी तीच्या बाजूने चालोलो होतो आणि माझ डोक परत भिरभिरल,,,,,,,
जो प्रसंग पाहून मला राग आला होता तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडत होता ,,,
कोणता प्रसंग,,,,,,,,,,,,,,,,,,?
मालिकेत ते गण्या नावच पात्र जे दाखवलय ते जानकीच्या हातातील चीउला
चक्क " शीला शीला कि जवानी "अस म्हणत तिला झोपवायचा
प्रयत्न करताना दाखवलाय  ,,,,,,,,,,? आणि ती अमृता हि त्याला साथ देवून
अरे ते नको "मी झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लीये म्हणायचा आग्रह धरते "
आणि दुसरी घटना त्या बाईची शाळेतून घरी जाणार मुलगा
५\६ वर्षाचा असेल तोही
"शीला शीला कि जवानी चा गाण म्हणत चालला होता,
म्हणजे आता लहान बाळांना झोपवायच असेल तर
"आईच अंगाई गीत नको तर शीला कि जवानी हवी
हाच संदेश त्या मालिकेला द्यायचा नसेल?
आणि द्यायचा काय मुलांनी तो अमलात आणला देखील
ज्या कुणाला शीला कि जवानी काळात हि नाही ते
हि गाणी म्हणत रस्त्याने चालतात
आणि त्यांच्या आया त्यांना काहीही म्हणत नाही,,,,,,,,,?
अंगाई गीत कदाचित आजच्या आयांना येत नसेलही
आग्रह नाही पण,,,
शीला कि जवानी म्हणत मुलांना झोपवायच?
मी झंडू बाम हुई म्हणणाऱ्या मुलाला आईला दोन धपाटे देता येत नव्हते?
का तिलाच हे गाण आवडत होत?
आधी मराठी माध्यमाच्या शाळा पालकांनी ईंग्रजीच्या नादात
बंद केल्या ,,,,,,,,,,,
मराठी पेपर वाचणे बंद केले,,,,,,,,,,
मराठी मुलांशी विवाह करणे जवळ जवळ बंद झाले,,,,,,,
एकमेकांशी मराठी बोलणे बंद केले,,,,,,,,
मुंबईतल आपल बस्तान हलवून पार विरार वसईच्या हि पुढे
आपापली बुड टेकवली,,,,,,
आपली राहती घर परप्रांतीयांना राहायला दिली ,,,,,,,,,
स्वतःचे धंदे दुसर्याला चालवायला दिले,,,,,,,,,,,,
अरे निलाजर्यांनो निदान आपल्या पोरांना भले
रामरक्षा शिकवत येत नसेल तर निदान "शीला कि जवानी वर तरी अटकाव करा?
अरे कसा शिवबा परत या महाराष्ट्र जन्मला यायचा?
आणखी एक घटना एक माझ्या मित्राची मुलगी आली आणि मला म्हणाली ,
हयेपी रिपब्लिक डे माझा स्वभाव माहित असल्या मुळे ती लगेच
म्हणाली सॉरी हा मला मराठीत नाही बोलता येत,,,,,,,,,,
मी म्हणालो हरकत नाही म्हण,
"प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा "
तिने १० वेळा प्रयत्न करूनही ते तीला  म्हणता आले नाही,,,,,
बर अस्सल ९६ कुळी मराठा मुलगी होती ती
आणि चाललोय आपण २१ आणि २२ व्या शतकाकडे?
आम्हाला आमची माती आमची भाषा आमची गाणी आमची माणस
यातच आपली संस्कृती राष्ट्राभिमान लपलेला आहे
हे कधी कळणार,,,,,,,,?
ज्या देशात राष्ट्राभिमान कशाशी खातात हे ज्या
देशवासियांना माहित नसत त्या देशातील जमीन
दहशतवादी कारवायांसाठी अत्यंत सुपीक असते,,,,
मग ते दहशत वादी या गाण्यांच्या आडूनही येतील कदाचित
हि गाणी कुठल्या दहशत वाद्यान पेक्षा कमी नाहीत 



2 comments:

  1. khara aahe he,sanskruti mhanje kay hech aata visarat chalalo aahe apan.hyachya shivay lajirvani gosht kuthalich nahi.
    mi pan ek udharan deto.
    parva mi mazhya bhava kade gelo tar,tithe mi sangitale ki"mi girnar chya 16hajar payarya chadalya",tar tyacha muline vicharale hajar mhanje kiti??
    aani tithech eka bahini kade gelo tithe pan vicharale,"kasa aahe ga suvarna mandir amritsar che?,tar tichi mulgi mhanate"te tar amhi bhagitalech nahi??"aata bola hyala kay karayache??

    ReplyDelete
  2. दादा अतिशय योग्य म्हणदादा अतिशय योग्य म्हणत आहेस तू आपले भारतीय प्रजा कधी सुधारणार?

    ReplyDelete