Tuesday, May 1, 2012

महाराष्ट्र आधार या भारताचा,,

||सीमावासीय नमः||
महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले |
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले|
खरा वीर वैरी पराधीनतेचा |
महाराष्ट्र आधार या भारताचा ||
अस सेनापती बापटांनी लिहून ठेवलय ते केवळ त्याचं
या महाराष्ट्रावर मराठी मातीवर प्रेम होत म्हणू नव्हे,
मनात आल चला या मराठी मातीची महाराष्ट्राची
स्तुती करावी म्हणून नव्हे ,,,
तर हे साक्षात ईतीहासांने या राज्यच केलेल मुल्यमापन आहे
त्याला शब्दबद्ध केले ते सेनापती बापटांनी ,,,,
खरतर महाराष्ट्राचा हा मान अभिमान स्वाभिमान दिल्लीपतींना कधी
बघवलाच नाही,श्रेष्ठांना शत्रू फार त्यामुळे महाराष्ट्रच हे
श्रेष्ठत्व कधी कुणाला मान्यच नाही झाल,,
त्यामुळे जस जमेल तस आणि जमेल तेव्हा महाराष्ट्राबद्दलचा
आकस ईतर प्रांतांनी आणि त्यांच्या नेत्यांनी वेळोवेळी केला
आणि मराठी माणसाला त्याचा कुणी सन्मान नाही ठेवला तरी
चालेल पण अपमान कुणी करू नये असा स्वभाव,,,
या मराठ्यांच्या मुंबई संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना
महाराष्टाचा मुंबईवर हक्क असताना
मुंबईतील मराठी माणूस मराठी विरहीत मुंबईची
कल्पना हि सहन न करू शकत असताना ,,
गुजरातीही मुंबईवर हक्क सांगत होते ,
केंद्राला निर्णय घेण अवघड गेल आणि त्यांनी त्री राज्य योजना
आणली,, मग केंद्र शासित मुंबई असे पर्याय सुचवत
केवळ मराठीच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न केला,,
आंदोलन,हरताळ ,मोर्चे आणि कित्येकांचे प्राण ,कित्येक
जखमी झाले,,केंद्र विरुध्द महाराष्ट्र असा संघर्षच पेटला,,
नेहरू संतापाच्या भरात मराठ्यांना दूषण देवू लागले
"हे महाराष्ट्रीय हिंसक आहेत यांना देश तोडायचा आहे,
अशा वल्गना करू लागले,,
आणि मग एका आकसाने सतत महाराष्ट्राच्या मागण्या मागेच ठेवण्यात येवू लागल्या,,
न्याय देत आहोत हे भासवत सतत अन्यायच करत आले,,
आणि मग आला दैभाषिक तोडगा,,,,,,
मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यावर सार्या कोंग्रेसींच एकमत होत,
आणि १९५६ मध्ये मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय
नेहरूंनी परस्पर घेतला,,
महाराष्ट्राच्या एका गंभीर प्रश्नाबद्दल केंद्रात वित्तमंत्री असलेले
सी.डी.देशमुख यांना याबाबत साध विचारण्याच सौजन्य हि दाखवलं नाही आणि रागावून देशमुखांनी आपला राजीनामा दिला

(फेकला नेहरूच्या तोंडावर)
आणि हळू हळू मग लोकमान्य जहालमतवादी,
सावरकर हिंदुत्ववादी,अशी लेबल मग कोंग्रेस सरकार
मुद्दाम लावून महाराष्टला डावलू लागल,,
नद्यांच्या पाणीवाटपा बाबत महाराष्ट्र विरोधात जाणे,
आत्ता अण्णा हजारेंच आंदोलना चिरडण्याचा आणि फसवण्याचा
प्रयत्न करणे आणि सीमा प्रश्न,,,,?
या सारखी हरामखोरी तर आज पर्यंत झाली नसेल
काहीही कारण नसताना आज सीमा बांधव कर्नाटकात डांबला गेलाय
पण त्यावर तोडगा काढायचा राहिला पण
मुद्दाम मराठी कसे हिंसावादी आहेत,कसे भांडकुदळ आहे,
हे चित्र रंगवल जातंय आणि महाराष्ट्र हि त्याला
बर्यापैकी साथ देतोय ईतकी उदासीनता मराठी लोकांच्या
मनात आहे या प्रश्नाबद्दल कि कोंग्रेस नाव ठेवण जड जाव,,,
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळाले तरी बेळगाव,बिदर,भालकी,कारवार ,निपाणी महाराष्ट्रात न आल्यामुळे अजूनही संयुक्त महाराष्ट्राचा लढा बाकी आहे.
आणि आजही तो लढा सीमाप्रांतात लढला जातोय.
आणि आम्ही काहीच न झाल्यासारखे सीमावासियांना कर्नाटकात स्वस्थ बसून रहा असले शहाणपणाचे सल्ले देतोय(कनसे प्रमुख)...
ते तिथे अपमानाचे जीवन जगतायत..
आणि आम्हाला त्याची काही पडलीच नाहीय.
आमचे काय जातेय ??अशी आमची स्वार्थी वृत्ती ....
आणि हरामखोर भाजपा ईथे सेने बरोबर राहून स्वतःची ताकद वाढवतेय स्वतंत्र तेलंगणाला पाठींबा देतेय
संसदेत तसा ठराव मांडते आणि कर्नाटकात मात्र मुग गिळून गप्प राहते देशात स्वतंत्र संघ राज्य असावीत हि त्यांची भूमिका
पण कर्नाटकात मात्र चुकून राहिलेला सीमाभाग कर्नाटकातच असावा हा आग्रह धरते
काय चुकले हो या सीमावासीयांचे?????????
एक टीचभर भूमी महाराष्ट्रातला घाला म्हणून मागली केली होती.

वेगळी भूमी तर नाही मागितली ?
स्वतंत्र राज्य तर नाही मागितलं?
या महाराष्ट्र सरकारने उत्तर भारतीयांना सांभाळले,,,,,
एवढेच काय देशाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या कलमाडीसारख्याला सांभाळले,,,,,
देशाच्या पाहुण्यांचे आणि सैनिकांची बळी घेणाऱ्या कासाबला पंच पक्वाने चारलीत,,,,
सीमावासीय यांना जड झाले??????
आज सीमाभागाला महाराष्ट्रात त्यांचे हक्काने स्वागत करणारी जनता हवी आहे.
त्यांना पाहुणचार नको आहे,
कुठे मोठी राजनैतिक प्रतिनिधित्व हि नको आहे,(राज ठाकरे हे तुमच्यासाठी)
महाराष्ट्र सरकारचे अनुदान हि नको आहेत,,,,
महाराष्ट्रात मराठी म्हणून राहायला भेटले तरी ते पुरेसे आहे. 
लक्षात ठेवा
छत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या नंतरही
या देशावर भगवा झेंडा फक्त मराठ्यांनीच फडकवून दाखवला ,,,,
आणि देशालाच नव्हे तर जगाला दाखवून दिले राज्य केवळ
आणि केवळ मराठेच करू शकतात ,,
म्हणून तर पानिपतात हार झाल्यानंतरही
दिल्लीच तख्त परत जाताना मुसलमानांनी परत मराठ्यांच्या हवाली केल,,,
आणि परत हिंदुस्थांकडे वाकड्या नजरेने पाहिलं नाही,,,



No comments:

Post a Comment