Sunday, August 28, 2016

*हि कसली छायाचित्रकारिता??*

*हि कसली छायाचित्रकारिता??*

न्यायलायचा आदेश धुडकावून गोविंदांनी सण साजरा केला,,,
आणि पोलिसांनी त्याच छायाचित्रण केलं,,,
*हा न्यायालयाचा अपमान नाही का???*
जर न्यायालयाने बंदी घातलीच होती
तर गोविंदाला रोखलं का नाही??
  त्यांचं चायचित्रन करण्यामागे
नक्की काय हेतू होता??
कारण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी होती
*गोविंदवाले स्वतः पोलिसांना फोन करून सांगत आहेत की आंम्हला पकडायला घरी येऊ नका तुम्ही सांगाल तिथे आम्ही येऊ अशी गयावया करत होते*
हेच अपेक्षित होत का त्यासाठी
न्यायालयाला देखील पोलिसांनी गृहीत धरलं तर चालत का??
*छायाचित्रण महत्वाचं कि न्यायालयाचा आदेश?? याच उत्तर ४ तला लहान मुलगा हि देईल*
आणि मग हेच करायचं होत
तर,,
*सर्वधर्म समभावाच्या नावाने जसे मोहल्ल्या कमीट्या बनवल्या जातात*
*गोविंदा सुरक्षा मंडळ बनवायचं होत ना??*
 मी स्वतः पूर्वी गोविंदा खेळत असे
कामाच्या रंगाड्यात प्रापंचिक प्रश्नात आता ते जमत नाही पण आता माझ्या मुलीने हट्ट केला की मला खेळायचा आहे मी नकार दिला,,
आंम्हला इतकं डोकं तरी नक्कीच दिलंय कि किती धोके आणि दुखापती आहेत ते कळायला,,
खरतर हे जे दुखापतीविषयी जे बोलून पुतनेच प्रेम दाखवतात त्यांनी
*पाय घसरून पडू* या भीतीने उडी मारून देवळातली घंटा देखील वाजवलेली नसते,
ते (अ)धिक्कारवाणीने बोलत असतात ठीक आहे ना मग आधी ठरवा पाठीचा कणा कि संसाराचा कणा महत्वाचा,,,
दहिहांडिची दुखापत मोठी कि
आ हुसेन करत लहानगे अंगावर चाकुसुरे चालवून घेतात ते किती बरोबर आहे
दुखापत होत नाही अपंग होत नाही असं क्षेत्र कुठलं आहे ते तरी कळू द्या जरा ,
*का फक्त बंदी हा एकच उपाय??*
हे काय बंदीछंदी सरकार आहे की काय? आधी प्रायोजक म्हणून पुढे यायचं पैशाची लालूच दाखवायची
आणि असे गोविंदा सांभाळता आले नाही की घाला बंदी
आणि खरतर ज्यांना नन्तर गोविंदाच्या नावाने अपघात झाला म्हणून शिमगा करायचा असेल त्यांनी
गोविंदा खेळूंच नये आणि दवाखान्यातून मुलाखती देऊन गोविंदा बदनाम करू नये,,
कुणी कुणाला गोविंदा खेळायला जबरदस्ती करत नाही त्यामुळे नन्तर पश्चातप करण्यापेक्षा लांब रहा गोविंदाचीही बदनामी होणार नाही
तेव्हा बंदी आणण्यापेक्षा
*तो उत्सवाचा खेळ आहे हे समजून घ्या उणिवा आहेत प्रत्येकात त्या यातल्याही समजून त्यावर काही उपाययोजना करता येतात का पहा, ८/९ तास काम करून कधी प्रसंगी काम (पगार) बुडवून शेवटचा महिनाभर ते सराव करतात स्पेन सारखे ते अजूनही प्रोफेशनल का नाही ते समजून घ्या यात दुखापत होऊ नये याची काळजी कशी घेता येईल ते सांगा मात्र त्यावर बंदी आणि छायाचित्रणाची भीती घालणे हा उपाय नव्हे*
आम्ही कश्मिरी अतिरेक्यांशी बोलू,,,
आम्ही पाकिस्तान बरोबर चर्चा करू,,
पण आम्ही
गोविंदावर गणेशोत्वावर निर्बन्ध आणू
मग भले अजांणचा लाऊडस्पीकर
पहाटे पहाटे ऐकून आमची झोपमोड झाली हरकत नाही,,
रस्ते अडवून नमाज पढले चालतील,,
पण आम्ही हा विचार नक्कीच नाही करणार
*१२५ कोटींच्या देशाला केवळ दोन पदक का मिळतात??*
त्यातही
*न्यायालयाने गोविंदा खेळणं म्हणजे ओलीम्पिक खेळण्यासारखं आहे का?*
हे विचारणं हि विचारसरणी
या देशात खेळाला किती प्राधान्य दिलं जातं तेच दर्शवते
आपलाच एक गोविंदा
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:

Post a Comment