Sunday, September 18, 2016

आरक्षण आणि ब्राम्हण समाज

Image result for चाफेकर बंधूचापेकर बंधु नावाचा चित्रपट येत्या २३ तारखेला येत आहे. 
आपणा सर्वांच दुर्दैव हे की जास्त कोणाला हे माहित देखील नाही. 
या  चित्रपटाच कुठेही नावदेखील दिसत नाही. 
आता आपणच याची publicity करू. 
कोणतेही भिक्कारडे फालतू  चित्रपट जर ५०० कोटी मिळवू शकतात 
तर मग या चित्रपटाने काय पाप केलय?
 हा तर उलट खर्या Heroचा चित्रपट आहे. 
तरी कृपया या चित्रपटाची योग्य ती publicity करून चित्रपटाला हजेरी लावावी.

https://youtu.be/udNWnMkUDkY

समाजासाठी झटून देखील ज्यांचे नाव नाकारले जाते अशा वीरांसाठी : 
बुद्धीप्रामाण्यवादाचा सर्वप्रथम स्वीकार केला तो चार्वाक ब्राह्मणाचा  
केला ज्याने प्रथम जातीभेदावर घाव तो  
महात्मा बसवेश्वर ब्राह्मणाचा 
गीता केली सर्वास मोकळी तो 
ज्ञानेश्वर  ब्राह्मणाचा 
प्रथम जेऊ घातले आपल्या घरी पद-दलितास तो  एकनाथ ब्राह्मणाचा 
घराचा हौद दलितांना प्रथम मोकळा केला तो एकनाथ ब्राह्मणाचा 
दलितांसाठी झटली जी प्रथम  स्त्री ती 
संत बहिणाबाई ब्राह्मणाची 
सर्वप्रथम धनगरास स्वपंक्तीत जेवायास घेऊन बसला तो वीर बाजीराव पेशवा ब्राह्मणाचा 
सर्वप्रथम विधवा विवाह केला तो 
महर्षी कर्वे ब्राह्मणाचा 
विधवांच्या दुखः ला फोडली वाचा तो  
आगरकर ब्राह्मणाचा
दलितांच्या हक्कासाठी सर्वांशी लढला तो सावरकर ब्राह्मणाचा 
ब्राह्मण लोकांनीच सर्वप्रथम जातीभेद आणि अनिष्ठ रितीना विरोध केला आहे त्यावर तयार केलेले हे गद्य काव्य :
एक ब्राह्मण ज्याने पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा 21 वेळा संहार केला आहे ते भगवान परशुराम.
एक ब्राह्मण होता ज्याने निजाम, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांचे कर्दनकाळ ठरुन दिल्ली जिंकून औरंगजेबाचे साम्राज्य उध्वस्त केलेे. संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड घेतला. 41 लढाया लढून शंभर टक्के यश मिळविणारा आणि एकही लढाई न हरणारे थोर धुरंधर, अपराजित योद्धे बाजीराव पेशवे.

एक ब्राह्मण होता ज्याने ब्रिटन मधून भारतात शस्त्रे पाठविली, ती शस्त्रे नाशिकमध्ये क्रूर ब्रिटीश अधिकारी यांना मारण्यासाठी वापरली होती. त्याने २७ वर्षे अंदमानात काढली. ते स्वात्यंत्रवीर विनायक दामोदर सावरकर.

एक ब्राह्मण होता, ज्याने इंग्रजां विरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता त्याला इंग्रजांनी एडन येथे फाशी दिली. ते वासुदेव बळवंत फडके.

एक ब्राह्मण होता ज्याने १८९९ मध्ये पुण्यात गणेश खिंड रस्त्यावर रँड साहेबाचा गोळ्या घालून वध केला होता आणि स्वतः फाशी गेला होते ते चाफेकर बंधू

एक ब्राह्मण अग्रगण्य राजकीय पुढारी,भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्य सेनानी असे बाळ गंगाधर टिळक

ह्या सर्व महान व्यक्तींना शतशः प्रणाम.
एका ग्रुपवर चाफेकरांवर चित्रपट येतोय हे ऐकून काही सुचलं ते अस
कि,,,
# मला ब्राह्मण बांधवांचे नेहमी कौतुक वाटते !! 
 देशातील ब्राह्मण समाज. 
लोकसंख्या दोन-अडीच टक्के. तरीही जगातील सर्व क्षेत्र त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर काबीज केले आहेत. त्यांना ना कुठले आरक्षण आहे ना कुठल्या विशेष सवलती. पण साक्षरता ९९.९९ %. जन्मजात धार्मिक संरक्षणामुळे त्यांच्यावर युगानुयुगे टीका होत आली आहे, होते आहे पण या टीकेची परवा न करता ब्रह्मण मंडळींनी आपली चौफेर वाटचाल सुरूच ठेवली. त्यांच्यापैकी अनेकांनी पौरोहित्य सोडले आणि उद्योग धंद्यांची कास धरली. कधी काळी विदेश गमन पाप आहे असे सांगणा-यांनी अवघे जग पादाक्रांत केले. 
कोणतेही घोषित आरक्षण नसताना खुल्या संवर्गातील ९० % जागा त्यांनी आपल्या गुणवत्तेने काबीज केल्या आणि काही लोक त्यांच्याशी खुली स्पर्धा करण्यापेक्षा मागास वर्गावर कुढू लागले. 
पण आरक्षणाच्या विरोधात ब्राह्मणांनी आपले मोर्चे कधीच काढले नाही ना कधी आंदोलन केले. 
त्यांना मी रडताना पहिले नाही. प्रत्येक आंदोलनात ब्राह्मण माणूस पुढे आहे. मग ते अंध श्रद्धेचे आंदोलन असो कि अंधश्रद्धा विरोधाचे, सुधारणेचे असो कि सुधारणेला विरोध करण्याचे !! 
आंतर जातीय विवाहातही त्यांनी कधीच खडखड केली नाही. पण अविचारी लोकांच्या लक्षात या गोष्टी कधीच येणार नाहीत. 
Image result for आरक्षण क्या हैविशेष म्हणजे या देशात ब्राह्मणांना इतके बडवले जात असतानाही आज देशाची कमांड त्यांच्याच हातात आहे. खरेच मला या समाजाच्या वाटचालीचे नेहमीच कौतुक वाटते.
आरक्षण हटाव देश बचाव
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर





No comments:

Post a Comment