असंख्य शिक्षित (सुशिक्षित हा शब्द जाणीवपूर्वक टाळलाय याची नोंद घ्यावी ) तावातावाने व मनापासून इंग्रजी माध्यमाचे समर्थन करताना दावा करतात की,
१) इंग्रजी ज्ञानभाषा आहे,
२) इंग्रजी भारतातील व्यवसायाची भाषा आहे
३) इंग्रजी जागतिक भाषा आहे
वगैरे वगैरे ..... म्हणून इंग्रजीवर प्रत्येक भारतीयाचे प्रभुत्व हवे !
यांचे दावे काहीही असोत, प्रत्यक्ष वस्तुस्थिती सांगते की इंग्रजी ही केवळ एक भाषा असून वरीलप्रमाणे हौशा गवशांनी ती विशेष भाषा असल्याचे भासवणारे केलेले दावे फोल व निरर्थक आहेत.
१) मुळात ज्ञानभाषा म्हणजे काय ? ती कशी असते ? ज्ञानभाषेचे काय निकष आहेत ? त्यातील कोणते निकष इंग्रजीला लागू होतात ? इंग्रजी सोडून इतर भाषा अज्ञानभाषा असतात का ? याची गंधवार्ता या शिक्षितांना नसते !
यावर कडी म्हणजे भाषांमध्ये ज्ञानभाषा असा काही प्रकारच नसतो याचीही जाणीव यांना नसते !
२) भारतातील सर्व दुकाने, आस्थापना, कार्यालयांत बहुतांशी संपर्क, संवाद भारतीय भाषांत होतो आणि अतिशय नगण्य प्रमाणात लोक इंग्रजीला प्राधान्य देतात.
अर्थातच ही भारतातील व्यावसायिक भाषा नाही ! तसे असते भारतीय भाषांमधून जाहिराती करायला हजारो कोटींचा खर्च बहुराष्ट्रीय उद्योगांनी केला नसता !
३) जगातील १२६ देशात दैनंदिन लोकव्यवहारात मुळीच न वापरली जाणारी भाषा जागतिक भाषा असूच शकत नाही हेही, ऐकीव माहितीवर इंग्रजीची भलावण करणाऱ्यांच्या गावी नसते ! शिवाय, प्रत्येक देशागणिक इंग्रजी वेगळी असते ! भारतात तर ती प्रांतागणिक वेगळी असते. शिक्षणाच्या संदर्भात पाहता बोर्डागणिक इंग्रजीचे वेगवेगळे अवतार आढळतात.
इंग्रजीवर प्रभुत्व असणे इतर कोणत्याही कौशल्याहून अतीव महत्वाचे अशी अंधश्रद्धा जोपासणाऱ्यांना हे प्रभुत्व मिळण्यासाठी इंग्रजी माध्यम शाळा हेच एकमेव खात्रीचे साधन वाटते ! स्वतःच्या मनातील गैरसमजामुळे, इंग्रजी माध्यमाच्या शाळांत अर्धवट शिकलेले शिक्षक असले, त्या शाळा मनमानी पद्धतीने आर्थिक लूट करत असल्या, मुले ताणात राहत असली, मुले अबोल होत असली, मुले मनापासून खळखळून हसू शकत नसली तरीही आपल्या मुला - मुलीला कोणत्यातरी विना अनुदानित धंदेवाईक इंग्रजी माध्यम शाळेतच अडकवले पाहिजे असे अशा शिक्षितांना मनापासून वाटते व इतरांनीही तसेच करावे असा त्यांचा सल्ला असतो !
प्रत्यक्षात अशा बहुसंख्य इंग्रजी माध्यम शाळांत इंग्रजीवर प्रभुत्व वगैरे असलेले शिक्षक नसतातच ! इंग्रजी तर सोडाच पण कोणत्याही विषयावर प्रभुत्व असलेले शिक्षक विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत सापडणे अतिशय अवघड बाब असते ! त्या शाळांमधून इंग्रजीवर प्रभुत्व मिळण्याजोगे किंवा अन्य विषयांतील बारकावे कळणारे शिक्षण मिळणे जवळजवळ अशक्य असते !
असो, पण मुळात जगभरातील सर्व मानवांचा विचार केल्यास इंग्रजीवर प्रभुत्व असणे कोणाला आवश्यक आहे ?
इंग्रजी भाषा विषय शिक्षक, इंग्रजी आशय निर्मितीशी जोडलेले लेखक, संपादक आणि वक्ते ! अशा व्यवसायातील लोक समाजात दहा हजारात एक असून इतर लोकांना दैनंदिन व्यवहारापुरते आणि भारतातील कोणत्याही माध्यमाच्या शाळेतील इंग्रजी भाषा विषयाच्या अभ्यासक्रमात शिकवलेले आणि अक्षरशः काठावर उत्तीर्ण होण्यापुरते इंग्रजी सामान्य व्यवहारात पुरेसे असते !
ज्या नोकऱ्या अथवा ठेकेदारीत मुलाखती, दरपत्रके, करार याबाबतीत इंग्रजीचे मोठे अवडंबर माजवले जाते त्याच नोकऱ्या आणि ठेकेदारी संबंधातील बहुतेक सर्व कामकाजात स्थानिक भाषेतच संभाषण होत असते ! इंग्रजीचा संबंध केवळ छापील नमुन्यांत काही लिखाण करण्यापलिकडे येत नाही.
इंग्रजीची मुळीच तोंडओळख नसणाऱ्यालाही जर सर्व कामकाज इंग्रजीतून चाललेल्या ठिकाणी कामकाजात सहभागी व्हावे लागले तर शालेय कनिष्ठ पातळीवरील इंग्रजी व्याकरण पुरेसे ठरते आणि इतपत इंग्रजी प्रौढ व्यक्तीला दोन महिन्यात शिकता येते (हीच पद्धत जगातील १२६ देशात वापरतात ). अशा इंग्रजीच्या सामान्य जुजबी कौशल्यासोबत त्या उद्योग व्यवसायात वारंवार वापरले जाणारे काही इंग्रजी शब्द नव्याने माहिती करून घेणे, इंग्रजीतून ( खरेतर कोणत्याही अपरिचित भाषेतून) चालणाऱ्या कोणत्याही कामकाजात पुरते !
साधारणपणे मराठी अथवा बिगर इंग्रजी माध्यमात १० ऊत्तीर्ण झालेल्या भारतीयाला सामान्य जनसंपर्कासाठी १० वी पर्यंतचे शिकलेले जुजबी इंग्रजी पुरेसे असते !
या व्यतिरिक्त उच्चशिक्षण अथवा नोकरी व्यवसाय निवडल्यावर संबंधित क्षेत्रात वारंवार वापरले जाणारे फारतर ५०० शब्द समजावून घ्यावे लागतात.
असे जीवनाच्या प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रातील सुमारे ५०० शब्द त्या त्या क्षेत्रात शिरल्यावर माहीत झाले तरी पुरेसे असते ! सर्व व्यावसायिक क्षेत्रातील सर्व शब्द शालेय वयातच माहीत असणे आवश्यक नसते आणि शाळेचे माध्यम इंग्रजी केल्यास जगभरातील सर्व व्यावसायिक क्षेत्रातील इंग्रजी शब्द माहीत होणे अभ्यासक्रम मर्यादेत अशकूय असते ! अशा प्रकारे इंग्रजीचे जेवढे अवडंबर माजवले जाते व सर्वांनी जन्मापासून किंवा त्याही अगोदरपासून इंग्रजी शरण असायला पाहिजे अशी असंख्य शिक्षितांची समजूत आहे, तितकी इंग्रजी शरणतेची गरज ९९.९९९९ % लोकांना नसते !
तरीही भारतात काही हितसंबंधी मंडळींनी इंग्रजीचे अवडंबर माजवण्याचे कारण फार वेगळे आहे !
लग्न ठरवताना नकार देण्यासाठी पत्रिकेचे कारण पुढे करतात तसेच नोकरी देताना नको असलेला उमेदवार नाकारताना इंग्रजी कच्चे हा शेरा मारला जातो.
खरे पाहता नोकरीसाठीच्या ९९.९९९९ % मुलाखती काही इंग्रजी भाषा, इंग्रजी साहित्य यातील कौशल्यावर आधारित नसतात त्यामुळे अशा मुलाखतींमधून किंवा नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव, अपेक्षा लिहिलेल्या नोकरीसाठीच्या अर्जातून इंग्रजी पक्के का कच्चे याचा पत्ता लागण्याची शक्यताच नसते !
शहाण्यांना मूर्ख ठरवण्याची एक सोय या पलिकडे अशा व्यवहारात इंग्रजीला काडीचे महत्व नसते !
याची काही ठळक उदाहरणे आहेत. भारतातील सर्व बँका कर्मचारी भरतीसाठी लेखी परीक्षा व मुलाखती इंग्रजीत घेतात. कर्मचारी बँकेत नोकरीला लागेपर्यंत त्याच्याशी सर्व संभाषण व पत्रव्यवहार कड्डक इंग्रजीत चालतो !
कर्मचारी बँकेत काम करताना मात्र चार छापील चिठोरी इंग्रजीतून वापरत असला तरी कर्मचाऱ्यांचा आपसातील व ग्राहकांशी संवाद स्थानिक अथवा हिंदीतच चालतो !
तीच कथा कॉल सेंटर प्रकाराची ! तिथे भरती परीक्षा व मुलाखती कड्डक इंग्रजीत होतात पण निवडलेल्या ग्राहक सेवा प्रतिनिधीचे, परदेशी ग्राहक वगळता भारतीय ग्राहकांशी होणारे ९९ .९९९९ % संभाषण एखाद्या भारतीय भाषेतच होते !
नोकरी किंवा अन्य संधी देताना नकार देण्यासाठीची उपयुक्त सबब या धूर्त कारणाशिवाय इंग्रजीचा ९९.९९९९ % कामकाजाचा इंग्रजीवर प्रभुत्वाशी सुतराम संबंध नसतो !
इंग्रजी कच्चे आहे असे सांगितल्यावर कोणताही भारतीय माणूस त्या कारणासाठी दिलेला नकार सहज स्वीकारतो आणि त्याच्यापेक्षा टुकार इंग्रजी येत असलेल्या वशिल्याच्या तट्टूला संधी दिली तरी गप्प राहतो हे कधीतरी नोकऱ्या देणाऱ्या मालक वर्गाच्या लक्षात आले ! याचा अभ्यास केलेल्या मालक वर्गाने या कारणासाठीच इंग्रजीचे अवडंबर माजवले व ते कालांतराने समाजमनाने निमूट स्वीकारले !
तरी यापुढे सर्वांनी लक्षात घ्यावे की आपले एखाद्या कामातील कौशल्य अत्यंत महत्वाचे आहे आणि इंग्रजी भाषाविषयक कौशल्य ही बाब जितकी भासवली जाते तितकी महत्वाची नाही. तसेच हेही लक्षात घ्यावे की
इंग्रजीचे जितके जुजबी व किमान कौशल्य आवश्यक आहे ते मिळवायला इतर सर्व शैक्षणिक बाबींशी तडजोड करून अपुरी पात्रता असलेल्या विना अनुदानित इंग्रजी माध्यमातील शिक्षकांच्या हातात मुलांच्या शिक्षणाची धुरा देणे अनिवार्य नाही ! याबाबत आंधळेपणाने निर्णय न घेता शिक्षकांची स्वतःची शैक्षणिक पात्रता शिक्षकाच्या पदासाठु निश्चित केलेल्या किमान पात्रते इतकी किंवा अधिक आहे हे पुराव्यानिशी शोधल्याशिवाय केवळ इंग्रजीविषयक समजुतींवर विसंबून विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेवर वीश्वास ठेवणे शिक्षितांनी तरी टाळावे !
पालकांनो, इंग्रजीच्या अवडंबराचे ओझे मनावर न बाळगता अनुदानित मराठी माध्यमाच्या सर्व बलस्थानांचा लाभ मुलांना अवश्य मिळवून द्या !
कमी खर्चात , कमी वेळात ताणरहित व आनंदी शिक्षण आपल्या लाडक्या छकुल्यांना द्या !
यापूर्वी तुम्ही मुलांना अनुदानित मराठी माध्यम शाळेत मुलांना घातले नसेल, शिक्षकांची शैक्षणिक पात्रता याबाबत माहिती न घेताच विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत मुलांना अडकवले असेल तर या वर्षी तरी संबंधित शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती घ्या, शासनाने वेगवेगळ्या इयत्तांना शिकवण्यासाठी निश्चित केलेल्ली पात्रता शोधून काढा. तुमची मुले शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेपेक्षा कमी असेल तर शाळा बदला व अनुदानित मराठी माध्यम शाळा निवडा !
अनुदानित मराठी माध्यम शाळांबाबत अशा शाळेत गेल्या वीस वर्षात पाऊल न ठेवलेले अनेक शिक्षित वाटेल ते प्रतिकूल शेरे मारत असले तरी अशा शाळेत शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेचे शिक्षक असतात व त्यांना नियमित प्रशिक्षणही दिले जाते. उस वरून ओबडधोबड दिसत असला तरी त्याचा रस मधुर असतो तशीच स्थिती अनुदानित मराठी माध्यम शाळांची आहे.
काय भुललासि वरलिया रंगा
उस डोंगा परि रस नही डोंगा
हा विचार करा. पुरेशी माहिती घ्या आणि मगच लहानग्यांच्या पहिल्या शाळा प्रवेशाबाबत, माध्यम निवडीबाबत आणि इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यम स्वीकारण्याच्या बदलाबाबत गंभीर विचार करावा असे मी सर्व शिक्षितांना सुचवतो !
शिक्षित असणाऱ्यांनी किमान इतकी पारख तरी केलीच पाहिजे ना ?
अनिल गोरे (मराठीकाका )

No comments:
Post a Comment