Monday, October 10, 2016

काही सीमा ह्या पाळायच्या असतात तर काही ओलांडायच्या असतात

🚩विजयादशमीच सीमोलंघन🚩

देव दानवांच्या लढाईत दानावांचा विजय होत गेला आणि महिषासुर देवलोकाचा प्रमुख झाला त्याला इंद्रपद मिळाले तो जगाचा स्वामी झाला ,उन्मत्त बनला,त्याच्याशी लढणं आणि तेही एकेकट अवघड होऊन बसलं,,
तेव्हा देवांनी निर्णय घेतला एकेकट लढण्यापेक्षा मिळून सारे आपण त्याचा खातमा करू,,
त्यातून एका शक्तीचा उदय झाला आणि या संघटित शक्तीने महिषासुराचा वध करवला
महिषासुराची हि कथा सर्वांचं माहीत आहे,
ह्या माहिषासुरमर्दिनीला श्री शंकरा पासून मुख ,श्री विष्णूपासून बाहू, अग्नी पासून डोळे, वायू तेजाने कान,
अस सर्व देवदेवतानी आपापल्या सामर्थ्याने देवीची निर्मिती केली
सर्व देवांच्या तेजाचे आणि शक्तीचे एकत्रीकरण होऊन निर्माण झाली ती आदिशक्ती,, 
तिने नऊ दिवस माहिषासुरशी युद्ध केले त्या युद्धाची आठवण म्हणून
हा नवरात्र साजरा केला जातो,,
आणि दहाव्या दिवशी विजयाचा आंनद म्हणून विजयादशमी,,
आणि म्हणूनच सिमोल्लंन्घनाचा अर्थ आज पुनः समजून घेतला पाहिजे,,
स्त्री हीच शक्ती आहे हेच नवरात्र सांगतो,,
आज प्रत्येक देशाला आपापली सीमा आहे तीच रक्षण तो तो देश प्राणाची बाजी लाऊन करत असतो ,, परंतु
दुसर्या देशाने आपल्या सीमेवर हल्ला करेपर्यंत वाट पहायची आनि नंतर
हल्ला करायचा या सिमोल्लंन्घन म्हणत नाहीत,,
युद्ध अनिवार्य असेल तर नव्हे ते आहेच
कधीही शत्रूने हल्ला करायची वाट न पाहता त्याच्यावर चढाई करून त्याचा पराभव करण्यात खरी कुशल राजनीती आहे ,,
आपल्या राज्यात घुसून लूटमार त्यांच्यावर हल्ला करण्याइतके काही आपले पूर्वज मूर्ख नव्हते तर शत्रूचा दुरव्य्वहार कळताच त्यांच्या सीमेवर जाऊन सीमोल्लंघन करावे आणि विजयश्री खेचून आणावी हे त्यांना कळत होत हेच सांगण्याचा हा दिवस आहे,,,,
प्रभू श्रीराम यांच्या पासून हि सुरवात झाली श्रीरामांनी रावणावर हल्ला करण्यासाठी हाच दिवस निवडला,
छत्रपती शिवरायांनी पापी औरंग्याला
मारण्यासाठी हाच दिवस निवडला,,
1639 चा दसरा साजरा करून शहाजी राजे यांनी बंगळुरास प्रयाण केले,,
1656 साली मोहीम काढून शिवरायांनी सुपे जिंकले,,
1673 बनकापुरीवर याच दिवशी राजांनी स्वारी केली1681 च्या दसऱ्याला संभाजी राजांनी बुर्हाणपुरावर चाल केली
पुराणकाळात देखील राघरजाने सीमोल्लंघन केले,,
त्यामुळे प्रत्येक राजा सीमोल्लंघन करायचा लूट घेऊन यायचा
आपल्या देशाच्या सीमा रेषा तो तलवारीने राखायचा
ती लूट तबकात टाकली जायची उरलेली राजमुलखाला दिली जायची
त्यामुळे सीमोल्लंघन म्हणजे आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या देशाची सीमा ओलांडणे
बाकी सर्व सीमा ह्या पाळायच्या असतात मात्र देश रक्षणाची सीमा हि ओलांडायची असते आणि त्यासाठी सतत सतर्क आणि सज्ज असलं पाहिजे फक्त उत्सव आला की,,
जय भवानी जय शिवाजी करत भगवे फेटे आणि फेसबुकी तलवारी ज्याला आधीच व्हाट्स अपी लिंबू लावलं आहे त्या उपसून सारे सेल्फी काढण्यात मश्गुल होण्यापेक्षा किमान त्या तलवारी चालवता आल्या लाठी काठी चालवता आली तर जास्त बर,,
अती विश्वास अति चांगुलपणा हा आपल्याला कायम मूर्खच बनवत आला आहे हे निदान आता तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे
या विजया दशमिनिमित्ताने इतका विचार जरी केलात तरी कदाचित
पुढच्या विजयादशमीच चित्र नक्कीच वेगळं असेल
चला तर मग आई भवानीलाच साकडं घालू
हे दुर्गे ...
हे चंडमंड भंडासुरमर्दिनी,,
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला.....
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला......
आज आम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी.....
 पुन्हा या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत लाखो धर्म रक्षक ,राष्ट्र प्रेमी आणि देशभक्त जन्माला यावे म्हणून विजयादशमी (दसरा) आम्ही तुला आवाहन करत आहोत
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
धारकरी
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुम्बई


No comments:

Post a Comment