Monday, March 29, 2010

वरातिचा घोडा

                                             ||श्री:||
प्रसिद्द कवियत्री शांताबाई शेळके यांच्या बाबतीत घडलेला किस्सा ,,,
काही वर्षापूर्वी शांताबाई कोल्हापुरात साहित्य संमेलनाला 
जायला निघाल्या होत्या 
कोल्हापुर स्टेशन वर उतरल्यावर त्या बग्गित बसल्या 
पण त्या बग्गिचा घोडा 
काही केल्या पुढे सरकेना आणि अचानक घोड़ेवाला 
खाली उतरला आणि गल्याताला लाल रुमाल काढून 
त्याच्या समोर नाचू लागला.
आणि आश्चर्य घोडा चालायला लागला ,,
शांताबाईनी विचारल हा काय प्रकार आहे ?
बग्गिवाला म्हणाला बाई साहेब हा रोजचा घोडा नाही 
हा वरातिचा घोडा आहे याच्या समोर नाचल्या शिवाय पुढे नाही जात....
हा किस्सा आठवतच मी सहजच टिव्ही लावला 
आणि काय आश्चर्य ,,,?
सगळ्या हिंदी चानेलवर मराठी साहित्य संमेलनाचे ,
लाइव दर्शन होत होते ,,,,
कारण त्यांचा अमिताभ भैया बोलत होता,
आजू बाजुला आपले भालदार चोपदार होतेच 
डॉ.सतीश देसाई आणि सुधिरजी गाडगीळजी,,,
आणि दं.भी .कुलकर्णी,,,?
यांचा चेहरा तर तोंडात तम्बाखुची गोली ठेवली की काय 
अशी शंका यावी असा होता ,,
आणि हा वरातिचा घोडा हिंदी च्यानेल समोर
मराठीची आय झेड करीत अग्निपथावर चालत होता ,
कुणाचा साप तर कुणाला मुंगुस उपमा देत होता 
नाचत होता गात होता एकंदरच संमेलनाची बग्गी जोरात खेचत होता .
सुरेश भट साहेबांच्या 
दोनच ओळी त्याही त्याला धड म्हणता येत नव्हत्या ,,
(अर्थात हे येर्या गबाल्याचे काम नोहे)
त्याच बरोबर 
"राकट देशाची ही ,,,"वाट लावत होता 
आम्ही सारे इतके मंत्रमुग्ध झालो होतो की ,,,
ऐकतो मराठी अमिताभचे अशी भाव समाधी आमची लागली होती.
धन्य ती बग्गी, ,धन्य तो घोडा ,,
धन्य ते भालदार चोपदार 
धन्य मराठी जाहली......


 

No comments:

Post a Comment